सिक्स सिग्मा

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in काथ्याकूट
15 Dec 2009 - 11:08 am
गाभा: 

सिक्स सिग्मा म्हणजे काय?

http://en.wikipedia.org/wiki/Six_Sigma इथे थोडी माहिती आहे.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

15 Dec 2009 - 1:06 pm | प्रकाश घाटपांडे

आजच्या दैनिक सकाळ मध्ये यावर लेख आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

15 Dec 2009 - 1:12 pm | अवलिया

श्री रा रा प्रकाशजी घाटपांडेजी

आपल्या बहुमोल माहितीबद्दल धन्यवाद. दैनिक सकाळच्या आंतरजालीय आवृत्तीत ही माहिती आहे काय याचा खुलासा करावा आणि आपल्याला शक्य असल्यास त्या पानाची लिंक द्यावी.

केवळ छापिल आवृत्तीत सदर लेख असल्यास आपण तो स्क्यान किंवा युनिकोदात टंकुन मिपाच्या वाचकांना उपलब्ध करुन देवु शकाल काय ? कारण, अशा पद्धतीनेच ज्ञानाचा प्रसार होतो आणि ज्ञान प्रसारासाठी आपण फार तळमळीने कार्यरत आहात असे मिपाकरांचे आजवरचे आपले लेख आणि प्रतिसाद पाहुन मत आहे.

धन्यवाद.

--अवलिया

प्रकाश घाटपांडे's picture

15 Dec 2009 - 2:04 pm | प्रकाश घाटपांडे

आजच्या पुणे आवृत्तीत जॊब झेड पुरवणीत डॉ श्रीपाद धर्माधिकारी यांचा गुणवत्ता व्यवस्थापनासाठी सिक्स सिग्मा असा लेख आहे. http://72.78.249.125/esakal/20090914/5235098964527067229.htm याठिकाणी त्यांची डॉ हॅरीशी एक चांगली मुलाखत आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

15 Dec 2009 - 2:10 pm | अवलिया

श्री रा रा प्रकाशजी घाटपांडेजी

आपल्या बहुमोल माहितीबद्दल धन्यवाद.

--अवलिया

JAGOMOHANPYARE's picture

15 Dec 2009 - 4:03 pm | JAGOMOHANPYARE

धन्यवाद.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

अभिषेक पटवर्धन's picture

15 Dec 2009 - 3:47 pm | अभिषेक पटवर्धन

सिक्स सिग्मा हि जरी गुणवत्ता प्रणालि असलि, तरी या नावाचा उगम स्टॅटिस्टिक्स मधे आहे. स्टँड्र्ड डेविएशनशी (SD) निगडीत हि संज्ञा आहे. एस. डी. ला तांत्रिक भाषेत सिग्मा अस म्हणतात. कोणत्याही dataset (population) मीन (average) पासुन १ सिग्मा अंतरामधे साधरण ६६% डेटापॉईंट्स समाविष्ट होतात. हे अंतर जसंजसं वाढत जाईल (२ सिग्मा, ३ सिग्मा) तसे तसे समाविष्ट डेटापॉईंट्स वाढत जातात. ६ सिग्मा एवढ्या अंतरावर ९९.९९९६६% पॉईट्स कवर होतात, म्हणजेच ०.०००३४% एवढे पॉईट्स बाहेर रहातात. याचाच अर्थ, १०,००,००० पॉईट्स मधे ३ पॉईंट्स बाहेर रहातात....(१०,००,००० वस्तु बनवताना ३ वस्तु चुकिच्या बनतात, १०,००,००० डबे पोचवताना ३ ड्बे चुकिच्या ठिकाणी पोचतात)

(मी लिहिलय खरं, पण लोकाना समजेल अस लिहिलय कि नाही काय माहिती?)

अधिक माहीती साठी खरड किंवा व्य.नि.

JAGOMOHANPYARE's picture

15 Dec 2009 - 4:01 pm | JAGOMOHANPYARE

हे लक्षात आले...

अधिक माहितीसाठी खरड कशाला, इथेच लिहा, म्हणजे सगळ्याना समजेल.

सिक्स सिग्मासाठी आता कोर्सेस निघाले आहेत. त्यांचा व्यावसायिक संधीमध्ये काही उपयोग होऊ शकतो का?

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

स्वाती२'s picture

15 Dec 2009 - 5:36 pm | स्वाती२

तुम्ही quality field मधे असाल तर उपयोग होतो. फक्त कोर्स करताना त्या सर्टीफिकेटला खरच काय किंमत आहे ते माहित करुन घ्यावे. कारण आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा लगेच धंदा होतो आणि लुबाडणूक होते.
माझ्या नवर्‍याचे ASQC Six Sigma Black Belt Certification आहे. त्याने बर्‍याच वर्षांपूर्वी Quality Manager असताना केले. दर तीन वर्षांनी renew करावे लागते.

विकास's picture

15 Dec 2009 - 7:26 pm | विकास

थोडक्यात पण चांगली माहीती दिली आहे.

(यावरून अशी कल्पना मनात आली की, उद्या मराठी संकेतस्थळांच्या लेखांसाठी तसेच प्रतिसादांसाठी सिक्स सिग्माचा उपयोग केला तर? म्हणजे असे की एकूण १०,००,००० लेखांमधे केवळ तीनच लेख हे एक ओळीचे आणि १०,००,००० प्रतिसादात केवळ तीनच प्रतिसाद हे असंबंद्ध संदर्भरहीत आहेत असे जाणवेल की ते पाच-चार-तीन-दोन-एक सिग्मा असेल. का वन ओव्हर सिक्स सिग्मा (म्हणजे १/सिक्स सिग्मा) अशा प्रकारचे पण काही असते :? )

सुनील's picture

15 Dec 2009 - 8:34 pm | सुनील

छान माहिती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रविवारी दाखवत असत. त्याच्या सहाव्या भागाला बहुधा सिक्स सिग्मा म्हणत असावेत. न चुकता प्रत्येक रविवारी ती मालिका मी बघत असे.
वेताळ

adwait gole's picture

15 Dec 2009 - 6:55 pm | adwait gole

i hav som material of six sigma....giv me ur mail addr wll send u..pakka

JAGOMOHANPYARE's picture

16 Dec 2009 - 9:02 am | JAGOMOHANPYARE

माझा ई मेल आय डी तुम्हाला पाठवला आहे.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

सुधारक's picture

18 Dec 2009 - 6:54 pm | सुधारक

हे एक नवे खूळ अमेरिकेत तग धरून आहे. त्यात जास्त गणित शिकलेला एक बाह्मण वर्ग असतो. त्याला ब्लॅक बेल्ट वगैरे सारखी नावे आहेत. मग हे पुरोहित सुधारणांचे पौरोहित्य करतात व कंपनीत वाहवा मिळवतात. बाकीच्या लोकांना अक्कल नसल्यासारखे वागतात. अनेक सिक्स सिग्मा समजणार्‍या कंपन्या बुडीत जातायत हे कोणाच्या लक्षात पण येत नाही. मुंबईचे डबेवाले सिक्स सिग्मा लेवलला आहेत हा एक गोड गैरसमज प्रसारमाध्यमांनी करून दिला आहे. त्याचा बकरा प्रिन्स चार्लस पण झाला. जर सिक्स सिग्माने कंपनीची प्रगती होते तर डबेवाल्यांना एव्हढे हलाखीचे जीवन कां बरे जगावे लागते?

स्वाती२'s picture

18 Dec 2009 - 7:03 pm | स्वाती२

बाह्मण वर्ग
जातीवाचक उल्लेखाला माझा आक्षेप आहे.

विकास's picture

18 Dec 2009 - 8:31 pm | विकास

जातीवाचक उल्लेखाला माझा आक्षेप आहे.

सहमत.

बाकी सुधारकांच्या प्रतिसादाला प्रतिसादः

हे एक नवे खूळ अमेरिकेत तग धरून आहे.

सिक्स सिग्मा हे १९८६ पासून म्हणजे २३ वर्षे अस्तित्वात आहे. २३ वर्षाच्या पोराला कोणी तान्हे बाळ म्हणत नाही. :-)

अनेक सिक्स सिग्मा समजणार्‍या कंपन्या बुडीत जातायत हे कोणाच्या लक्षात पण येत नाही.

अगदी सहज शक्य आहे. पण त्या सिक्स सिग्मा मुळे बुडीत जात असतील असे वाटत नाही. मी काही सिक्स सिग्मा वगैरे मधे काम करणारा/वापरणारा नाही, पण एक नक्की कुठलीही व्यवस्थापकीय व्यवस्था (मॅनेजमेंट सिस्टीम) कोणी इमाने इतबारे वापरली तर गोत्यात येण्याची शक्य कमी असे वाटते. आता विचार करा भारतात अनेक कंपन्या या ISO 14000 / Environmental Management System ने certified असतात. पण त्यांचे प्रदुषण आणि त्या परीसरातील त्रास कमी असतो असे म्हणायचे आहे का? तात्पर्य नुसत्या सर्टीफिकेशनने काहीच होत नसते.

जर सिक्स सिग्माने कंपनीची प्रगती होते तर डबेवाल्यांना एव्हढे हलाखीचे जीवन कां बरे जगावे लागते?

सिक्स सिग्मा हे चुका टाळण्यासाठी आहे. चुका कमी झाला की धंदा वाढतो आणि जर चुका वाढल्या तर धंदा कमी होतो आणि त्याचा परीणाम कर्मचार्‍यांवर होतो. माझ्या माहीतीप्रमाणे डबेवाल्यांच्या धंद्याची आजही वार्षिक १०% वगैरे वाढच होत राहीली आहे.

मुंबईचे डबेवाले सिक्स सिग्मा लेवलला आहेत हा एक गोड गैरसमज प्रसारमाध्यमांनी करून दिला आहे.

खालील चित्र हे डब्बेवाल्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतले आहे. (डबे देण्यात जरी चूक होत नसली तरी ISO 2000 असे म्हणून चूक केली आहे असे वाटते कारण तसे सर्टीफिकेशन माझ्या माहीतीत नाही. एकतर ते ISO 9000:2000 असे हवे अथवा ISO 20000 असे असावे असे वाटत.) :-)

अवांतरः डब्बेवाल्यांची काळजी मला त्यांच्याच संकेतस्थळावरून Ultra-Left eyeing the Dabbawalas? ही बातमी वाचून वाटली...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुनील's picture

21 Dec 2009 - 6:52 am | सुनील

Pride of Maratha's Icon of Hard Work
अरेच्चा, मला वाटत होतं की, एकजात सगळे मराठी कामचुकार असून उत्तर भारतीय तेवढे कामसू, मेहनती वगैरे वगैरे असतात!!

बाकी सिक्स सिग्मा हे औद्योगिक उत्पादन पद्धतीत जितक्या प्रभावीपणे वापरले जाऊ शकते तितके सेवाधारीत उद्योगांमध्ये वापरले जाऊ शकणार नाही, हे माझे मत. सेवाधारीत उद्योगांनी आपली कार्यपद्धती लिखित करावी आणि त्याची काटेखोरपणे अंमलबजावणी करावी.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुधारक's picture

19 Dec 2009 - 9:08 pm | सुधारक

विकास हा अजून एक बकरा. मी तग धरून आहे म्हटले. जरी मोटारोला तेवीस वर्षांपासून करत असले तरी मी स्वतः ब्लॅक बेल्ट झालो २००० साली तेव्हा या विषयावर एकही पुस्तक बाजारात नव्हते. म्हणून त्याला नवे खूळच म्हणायला पाहिजे.

धंदा १० टक्क्यांनी वाढतो यात चलनवाढीचा हातभार जास्त असतो.

सिक्स सिग्मा टोळी ( यात जातीवाचक काही नाही ) इतर ठिकाणी जी मोजमापाची पराकाष्ठा करतात ती डब्बेवाल्यांच्या बाबतीत इतकी शिथील केली आहे की कोणी काहीही म्हणावे.

हलाखीची परिस्थिती आहे हे त्या डब्बेवाल्यांच्या प्रमुखाच्या मुलाखतीमुळेच मला कळले. आज त्याचा तयार संदर्भ मला देत येत नाही आहे. पण ती मुलाखत वाचून मला वाईट वाटले.

काही बाम्हंणांचा अपमान झाला असल्यास क्षमस्व !

विकास's picture

21 Dec 2009 - 6:34 am | विकास

तुमच्या यातील मूळ प्रतिसादाला स्वाती२ यांनी उत्तरे दिली आहेतच त्यामुळे त्याबद्दल अधिक लिहायची गरज नाही... :-)

काही बाम्हंणांचा अपमान झाला असल्यास क्षमस्व !
स्वतः सुधारक असे नाव घेणार्‍यांनी जातीवाचक शद्बप्रयोग करणे यात स्वतः डोक्यात जातीचे किडे ठेवत, त्या शब्दाचा उपयोग करणार्‍या आणि त्याचा प्रामाणिक वापर स्वाध्यायात आणणार्‍या आगरकरादी मंडळींचा आपण अपमान करत आहात असा अर्थ होऊ शकतो असे वाटते. या विषयावर अधिक बोलायचे/लिहायचे असेल तर वेगळा विषय चालू करावात ही विनंती....

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

स्वाती२'s picture

19 Dec 2009 - 11:35 pm | स्वाती२

>>२००० साली तेव्हा या विषयावर एकही पुस्तक बाजारात नव्हते.

Implementing Six Sigma- Forrest W. Breyfogle III
Complete Guide to Six Sigma-Thomas Pyzdek

ही दोन्ही पुस्तके १९९९ ची आमच्या कडे आहेत.

Vision of Six Sigma: A Road Map for Breakthrough by Mikel J. Harry 1998
The Vision of Six Sigma: Tools and Methods For Breakthrough by Mikel J. Harry 1994

ही पुस्तके अभ्यासासाठी उधार आणली होती.
तुम्हाला पुस्तके मिळाली नाहीत म्हणजे बाजारात नव्हती असे नव्हे.

शेवटी सिक्स सिग्मा हे एक साधन आहे, उत्तर नव्हे. साधन कसे वापरायचे ते प्रत्येकाने स्वतः ठरवायचे. A fool with a tool is still a fool.
Six Sigma can not work alone. You need innovation as well, to have a successful business. But at the same time, innovation cannot stand alone without quality.

JAGOMOHANPYARE's picture

20 Dec 2009 - 9:18 am | JAGOMOHANPYARE

A fool with a tool is still a fool.

:) .. बरोबर आहे.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

सुधारक's picture

20 Dec 2009 - 8:02 am | सुधारक

डबेवाले नशिबाने सिक्स सिग्मा साधन वापरत नाही आहेत आणि ग्राहकाकडे कडे लक्ष पुरवित आहेत म्हणून टिकून आहेत. पण त्यांच्या कार्यपद्धतीला सिक्स सिग्माचे यश म्हणून घेणे याला माझा आक्षेप आहे.

२००० साली तुम्ही सांगितलेली पुस्तके पुण्यातल्या दुकानात- मॅनीज सह सर्व दुकानात नव्हती हे खरे आहे.

ज्यांना सिक्स सिग्मा प्रशिक्षणातून पौरोहित्याचे मानपत्र मिळाले आहे ते सर्व ठिकाणी सिक्स सिग्मा लावायचे केविलवाणे प्रयत्न करताना दिसतात. हातात फक्त हातोडी असली कि सर्वत्र खि़ळे दिसायला लागतात.

JAGOMOHANPYARE's picture

20 Dec 2009 - 11:48 am | JAGOMOHANPYARE

सिक्स सिग्मा इम्प्लिमेंट कसे करतात ते तरी सांगा..
सिक्स सिग्माच्या उलट असा नवा 'सिक' सिग्मा (sick sigma) चालू करता येईल का? :)

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll