इक जरा छींक ही दो तुम - गुलजार ह्यांची अंतर्मुख करणारी एक कविता

व्यंकट's picture
व्यंकट in जनातलं, मनातलं
9 Mar 2008 - 11:06 am

चिपचिपे दूध से नहलाते हैं
आंगन में खड़ा कर के तुम्हें ।
शहद भी, तेल भी, हल्दी भी, ना जाने क्या क्या
घोल के सर पे लुंढाते हैं गिलसियां भर के

औरतें गाती हैं जब तीव्र सुरों में मिल कर
पांव पर पांव लगाये खड़े रहते हो
इक पथरायी सी मुस्कान लिये
बुत नहीं हो तो परेशानी तो होती होगी ।

जब धुआं देता, लगातार पुजारी
घी जलाता है कई तरह के छौंके देकर
इक जरा छींक ही दो तुम,
तो यकीं आए कि सब देख रहे हो ।

देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात पण तिरकस हल्ला करणारी गुलजार ह्यांची ही कविता, श्रद्ध असलो, तरी मला भावते. गुलजार एखाद्या गारूड्यासारखे आपला एका पेटार्‍याच्या आतला दुसरा पेटारा उघडत उघडत ही कविता फुलवतात.

नुसतच पहिलं कडवं वाचलं तर काहीच ध्यानात येत नाही की हा देवाचा अभिषेक आहे की एखाद्या नववधूचा हळद लावायचा कार्यक्रम आहे की अजून काही ? पुढे काय लिहिलं असेल त्याची उत्सुकता शब्दागणीक वाढत जाते. दुसर्‍या कडव्याच्या पहिल्या ओळी पर्यंत नववधू की देवाची मूर्ती हे कुतुहल कायम रहातं. ' पांव पर पांव लगाये खड़े रहते हो ' पासून कृष्ण मूर्ती मनात तयार होऊ लागते. कृष्णजन्माष्टमीचे दृष्य डोळ्यासमोर उभे राहते.

' बुत नहीं हो ' पर्यंत गुलजार ह्यांनी प्राणप्रतिष्ठापना करून टाकतात. येवढेच नाही तर ' परेशानी तो होती होगी ' मध्ये ते जगन्नाथाला ताटकळत उभं रहावं लागल्याची काळजी सुद्धा वाहू लागतात. तिसर्‍या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींत गुलजार आपल्या देवाला पुढे टाकायच्या गुगलीची पार्श्वभूमी तयार करतात.

केवळ १२ ओळींत गुलजार ह्यांनी देव, धर्म आणि रुढींची विकेट घेतलेली असते.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 11:41 am | विसोबा खेचर

थोडक्यातच परंतु चांगलं रसग्रहण!

परंतु व्यंकटराव,

नुसतच पहिलं कडवं वाचलं तर काहीच ध्यानात येत नाही की हा देवाचा अभिषेक आहे की एखाद्या नववधूचा हळद लावायचा कार्यक्रम आहे की अजून काही ?

आपला हा मुद्दा एरवी पटला असता परंतु सुरवातीलाच राधाकृष्णाचा जो फोटू आपण दिला आहे त्यामुळे इतर वाचकांचं माहीत नाही परंतु निदान मला तरी गुलजार साहेब देवाच्या अभिषेकाबद्दलच बोलत आहेत हे समजले. माझ्या मते आपण हा फोटू द्यायला नको होता. तो दिला नसतात तर कदाचित आपला वरील मुद्दा व्हॅलिड ठरला असता!

असो...

देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात पण तिरकस हल्ला करणारी गुलजार ह्यांची ही कविता,

मला तरी त्यांच्या कवितेत कुठे तिरकस हल्ला दिसला नाही. उलटपक्षी श्रीकृष्णाचे थोडेसे कौतुकच दिसते! :)

असो, प्रत्येकाचा बघण्याचा नजरिया वेगळा!

गुलजार एखाद्या गारूड्यासारखे आपला एका पेटार्‍याच्या आतला दुसरा पेटारा उघडत उघडत ही कविता फुलवतात.

अगदी सहमत आहे...

केवळ १२ ओळींत गुलजार ह्यांनी देव, धर्म आणि रुढींची विकेट घेतलेली असते.

हम्म! कविता वाचून मला तरी व्यक्तिश: तसं वाटत नाही...

असो, आपण आपल्या नजरेतून चांगलेच रसग्रहणवजा विवेचन केले आहे...

पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा!

आपला,
(गुलजारप्रेमी) तात्या.

प्राजु's picture

9 Mar 2008 - 8:48 pm | प्राजु

कविताही खूपच सुंदर आहे आणि तुमचे रसग्रहणही...

- (सर्वव्यापी)प्राजु