मौनी कुंभ

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
30 Jan 2025 - 11:36 am

मोक्षाची ती घाई,
संगम त्रिवेणी नेई,
मौनी डूबकी देही,
अमृतस्नान ।।

नेत्यांचे स्नान,
गर्दी ही बेभान,
गमावले प्राण,
निष्पाप तीस ।।

सर्वा तीच वेळ,
मग तोच खेळ,
कसा करील मेळ,
प्रशासन ।।

मौनी अमावस्या,
मोक्षाची समस्या,
कीव आली मत्स्या,
तैरतांना।।

कविता

बनेश्वर मंदिर (तळेगाव दाभाडे) भटकंती

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
29 Jan 2025 - 10:55 pm

मॉल मधली थोडीफार खरेदी संपल्यानंतर बाहेर पडताना मोबाईल वाजला बघितला बघितला तर बबनचा फोन. घाईत होतो, त्यामुळे प्रश्न पडला फोन घ्यावा की नाही. पण मग घेतला फोन. उत्तरलो " मार्केट मध्ये शॉपिंगच्या गडबडीत आहे. घरी गेल्यावर फोन करतो "

बबन म्हणजे माझा जुना दोस्त. गेल्या अनेक वर्षाचा सहवास. आमचं बोलणं सुरू झालं की खूप वेळ चालायचं.. म्हणजे एक तासाच्या वरच. वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा रंगायच्या.

शॉपिंग आटोपून घरी गेल्यावर त्याला फोन केला.

इतिहासमाहिती

हिरकमहोत्सवाची सांगता..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
29 Jan 2025 - 8:20 pm

आमच्या शाळेचा हिरकमहोत्सव होता. मला निमंत्रण आलं होतं ते बघून मला खूप आनंद झाला. कुणाकडून तरी माझा व्हाॅटस्ॲप नंबर मिळवून शाळेच्या निमंत्रण विभागाच्या कोऑर्डिनेटरांनी मला हिरकमहोत्सव सोहळ्याला बोलावलं होतं. माझी शाळेची वर्षं म्हणजे पाचवी ते अकरावी इयत्तेपर्यंतची वर्षं. एकूण सात वर्षं मी त्याच शाळेत शिकत होते. शाळेची आठवण मला मी इतकी मोठी झाले तरी अधुनमधून यायची. पण हे निमंत्रण पाहून ती तीव्रतेनं आली. माझी शाळेतली वर्षं फार चांगली गेली होती. सगळे शिक्षक चांगले होते. मला त्या शाळेत कधीही, कुठलीही शिक्षा झाली नाही. माझ्या शाळेबद्दलच्या आठवणी मधुर होत्या.

समाजजीवनमानतंत्रप्रकटनविचार

कल्पकता

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
28 Jan 2025 - 9:54 am

असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली.

डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे...

=============

कल्पकता
======

जीवनमानविचार

Lessons in Chemistry!

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
28 Jan 2025 - 7:44 am

बऱ्याच दिवसांनी एक चांगली heartwarming सिरीज बघितली. ८ भागांच्या ह्या सिरीज मध्ये ६० च्या दशकातील अमेरिकेतील काळ उत्तम उभा केला आहे. Brie Larson(Captain Marvel फेम) ने Elizabeth Zott हे केमिस्ट्री मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या पण विविध कारणांमुळे डावलले गेलेल्या आणि नंतर एक यशस्वी पण वेगळा कुकिंग शो चालवणाऱ्या कणखर स्त्रीचे पात्र साकारले आहे.

कलाचित्रपटआस्वाद

हस्ताक्षराचा ऱ्हास - एक Pen-demic

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
26 Jan 2025 - 10:50 pm

नुकत्याच पार पडलेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने ...
तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण करता का? पेन, पेन्सिल वापरून कागदावर लिहिता का? एखादे पत्र लिहून पाठवता का? खरीखुरी रोजनिशी लिहिता का?

भाषाशिक्षणप्रकटनविचार

कोष

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
25 Jan 2025 - 4:23 pm

दर्द में डूबे हुए नग़मे हज़ारों हैं मगर
साज़-ए-दिल टूट गया हो तो सुनाए कैसे |
अनेक शायरांची प्रतिभा अशा डिप्रेशस मूड मधूनच फुलली.गम / उदासी ची पण एक नशा असते त्यांना.हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम असतो. सब्लिमेशन म्हणतात त्याला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही फेजेस या ना त्या प्रकारे कुठल्याना कुठल्या टप्प्यात येतात.

समाजजीवनमानविचारआरोग्य

मंजर-ए-सुब्हा उर्फ मांजरसुंबा किल्ला

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
25 Jan 2025 - 12:20 pm

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गड किल्ले गर्दीने भरून जातात.तेव्हा ट्रेक कॅम्पने आदल्या दिवशीच छोटासा मॉर्निंग ट्रेक घेतला...मांजरसुंबा गड!
आ

प्रवासआस्वादमाहितीसंदर्भ

प्लॅनेटरी अलाईनमेंट: सोशल मीडियाची कमाल!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
25 Jan 2025 - 10:44 am

नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून सतत एक मॅसेज व्हायरल होतोय की, २५ जानेवारीला सगळे ग्रह एका रेषेमध्ये येणार आहेत, खूप अभूतपूर्व दृश्य असेल वगैरे. काही वेळेस तर त्याचे फोटोज- व्हिडिओजही व्हायरल होत आहेत. अनेक जणांना त्यावर उत्तर दिल्यानंतर शेवटी हे लिहावसं वाटलं. वस्तुस्थिती सांगण्यापूर्वी तो कंटेंट बनवणार्‍यांचं खरंच कौतुक! अगदी सगळीकडे तो मॅसेज गेलेला आहे. अगदी शाळेतल्या मुलांपर्यंतही! भले तो मॅसेज चुकीचा असला तरी त्या निमित्ताने लोक आकाश बघणार आहेत, ग्रह शोधणार आहेत, हेही नसे थोडके! असो!

तंत्रभूगोलमाध्यमवेधलेख

शोध

शाहिर's picture
शाहिर in जनातलं, मनातलं
24 Jan 2025 - 9:30 pm

गंगाेत्त्रीच्या त्या बर्फाच्छादित प्रदेशात सूर्य अस्ताला जात होता. हिमालयाच्या शांत, पण भीषण वातावरणात मी विचारमग्न होऊन चालत होतो..घर सोडून 9 महिने होऊन गेले होते. आयुष्याच्या गुंत्यात गुरफटलेलो, अपराधी भावनेने पछाडलेलो. काहीतरी हरवले होते माझे पण शोधायचे कुठे ते कळत नव्हते त्याचा शोध घेत मी इथवर आलो होतो.

"कोणता शोध आहे तुझा?"

एक शांत, पण गूढ आवाज ऐकू आला. मी वर पाहिलं. समोर शुभ्र वस्त्रांमध्ये एक योगी उभा होते.. पांढर्‍या दाढीचे लाटा वाऱ्यासोबत हेलकावत होते. त्यांच्या डोळ्यांत खोल तलावासारखी शांती होती.

"माहिती नाही" विषण्णतेने उद्घागरलो..

कथाबालकथामुक्तकप्रकटन