मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आली फिरून उत्कंठा जगण्याची

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी-शैलेंद्रसिंग) पदर ओढिला काट्यानी चाळ तोडिला पायानी उडत्या माझ्या मनाला कुणि आता नका आवरूं चालले होऊन माझे मन जणू वाऱ्या वरचे पाखरूं आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा गत रात्रीच्या कभिन्न अंधारातून देखिले चोहिकडे नयन मिचकावून बहरले जीवन फुला फुलातून निश्चय झाला मग हे देखून आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा का भारावलेले असे माझे जीवन का मोकाट सुट्लेले मी असे तुफान मन होई साशंक करीता जीवन प्रवास वाटे जाईन हरवून मी तुझा सहवास आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा श्रीकृष्ण सामंत

छायाचित्र परिक्षण - २

सूर्य ·
मँगलोरहुन उडुपीला जाताना सुरतकल येथे एन.आय.टी.के नावाचे कॉलेज आहे. कॉलेज कॅम्पसचा भाग म्हणुन एक बीच आहे. (इथे शिकलो असतो तर किती बरे झाले असते ;) ). उडुपीहुन परत मॅगलोरला येताना संध्याकाळ्च्या सुमारास इथे थांबुन सुर्यास्त बघण्याचा योग आला. कॅमेराचा उपयोग करण्याची संधी मी सोडली नाही. त्यापैकीच एक चित्र इथे ड्कवीत आहे. जरुर परिक्षण करा.

पालकांची भाजी

विनायक प्रभू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात पाचवी यादी लागली आणि सकाळी साडेसहा वाजता एका पालकांचा फोन आला. नाव आहे यादीत. पण एक शंका विचारायची होती. या कॉलेजचे कॅरेक्टर कसे आहे हो? ऍडमिशन म्हटलं की पालकांच्या हुशारीला मर्यादा पडतात आणि मूर्खपणाला सिमा उरत नाहीत. मी डॉक्टर नाही , सायकॅट्रीस्ट नाही,प्रोफेसर नाही.तरीपण या सर्व संबोधनांचा मालक आहे.कंठशोष करून हे सांगीतलं तरी पालक मंडळी ऐकत नाहीत.जनसंपर्काने साधलेल्या असंख्य अनुभवाचे पोतडे पाठीवर घेऊन हिंडणारा एक सर्व सामान्य पालक आहे मी.

आईच्या कविता-१

दिनेश५७ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
ध्यास इट्ट्ल इट्टल म्हनता, मन पार येडं झालं ध्यास लागला नामाचा, मन खुळावून ग्येलं हितं तितं सारीकडं, दिसे इट्टल सावळा झाडा पाना फुलामंदी मज भासाया लागला वाटे साजिरी फुलांनी, करू पूजा या द्येवाची परी गोंधळ्ले मन, हितंतिथं दिसे तोचि त्येच्या आंघुळीला वाटे, आणू वाईच गं पानी पान्यातच उभा व्हता, सावळा गं चक्रपाणि गंध उगाळाया हाती, घेतली ग मी सहाण तिच्यामंदी श्रीखंड्याचे, देखिले गं म्या ध्यान निवदासी आणाया, दूध ग्येले मी घरात सोता गोकुळीचा कान्हा, उबा माज्या गोकुळात कशी करू याची पूजा, मज इच्यार पडला कसा द्येव हा इट्टल, आसंल संतांनी पूजिला नको आंगुळीला पानी, नको त्याला पानं फुलं ध्यान निरखता निसत

"लाख चूका असतील केल्या"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे गृहस्थ आमचे शेजारी.शिरोडे गावाला जाताना नदी काठी एक टांक नावाचं छोटंस गांव आहे.भाऊ टांककार त्या गांवचे. आमच्या घराच्या बाजुला त्यांचे वखारवजा घर होतं. चांगलं चिरेबंदी भिंतीचं,पुढचा भाग माल ठेवण्यासाठी जरुरी पेक्षा जास्त उंच आणि ऐसपैस,आणि त्याच्या मागे पांच,सहा खोल्या आणि मागे मोठे पोरस,त्यात चार पाच माडाची फळ देणारी झाडं,मधेच एक खोल विहीर एक उंच सोनचाफ्याचं झाड,आणि कपडे धुण्यासाठी जागोजागी,ढोण्या (कपडे धुण्यासाठी सिमेंटची बनवलेली टाकी)होत्या.

आपल्याला तर बुवा नाही पटत....तुम्हाला काय वाटतं?

ऐका दाजीबा ·
काय पटत नाही विचारताय?? साहाजिकच आहे तुमचा प्रश्न! अहो मी बोलतोय आपल्या माय-मराठीवरच्या आक्रमणाबद्दल. हे आक्रमणकर्ते कोण? अहो बघा आजूबाजूला.. दिसले का? हे आक्रमणकर्ते दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. नाही पटत? चला तर प्रत्यक्ष उदाहरणंच पाहू... दृश्य १ - स्थळ- बाजार. एक मराठी आई आपल्या मराठी मुलांना इंग्रजीत बोलते आहे. काय हवं आहे, काय नको आहे, सर्व काही इंग्रजीतून. दुकानदाराशी मात्र इंग्रजाळलेल्या मराठीतून. दृश्य २ - स्थळ - स्थानिक बस. ऐन गर्दीत चुकून वाहकाचा हात मुलीच्या खांद्याला लागतो. मराठी मुलगी इंग्रजीतून बिचार्‍या वाहकाच्या सात पिढ्यांचा उद्धार करते.

प्रेमात...

truptiparte ·
लेखनविषय:
प्रेमात कधीच नस्त ब॑धन प्रेमात कधीच नस्ते अपे़क्षा प्रेमात फक्त असत॑ समधान प्रेमात फक्त असते प्रतीक्षा प्रेमात कधीच नस्त दु:ख प्रेमात कधीच नस्तो घात प्रेमात फक्त असत॑ सुख प्रेमात फक्त असतो विश्वास प्रेमत कधीच नसतो दुरावा प्रेमात कधीच नसतो भास प्रेमात फक्त असत॑ सोबत असण॑ प्रेमात फक्त असतो आपले पणाचा ध्यास.

उघडी पाठ

केशवसुमार ·
लेखनविषय:
स्वाती ताईंची हिरवी जिद्द बघून आमच्या वस्तिगृहातील काही आठवणी हिरव्या झाल्या रद्दीच्या साठलेल्या थरात.... मासिकाचा बोटभर तुकडा शोधून, टंच टंच दिसणार्‍या जाहिराती मधल्या वितभराच्या कपड्यात.... किती ग सुंदर दिसतेस! तुझ्या एका उघड्या पाठीनं ''जीव शिंपडलाय या देखाव्यात'' शरीराला घट्ट धरून ठेवणारी तुझी वसनं... आणि पांढर्‍या शुभ्र 'पार्श्व'भूमीवरच.. तो टोकाचा हसरा काळा तीळ, म्हणजे सौंर्दयाचा कळस! आहा...! डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून. बर आहे..., तू चित्रात आहेस!, अशीच राहशील कायम... अशीच राहील तुझी कमनीय काया, तुझ कोवळे पण.. तुझी उघडी पाठ! न जरा

(मोरपिशी साडी)

बेसनलाडू ·
मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात.... लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून, ओठांशी मस्ती करणार्‍या आरशामधल्या पाचफुटी फुला.... उगीच का अत्तर लावतोस? तुझ्या या मोरपिशी साडीनंच "अत्तर शिंपडलंय या देखाव्यात'' निर्‍या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं... आणि तांबूसकाळ्या बटांमागचं.. कानावरचं हसरं पिवळं फुल, म्हणजे सुगंधाचा कळस! आहा... ! डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून. बर आहे..., तू घरात आहेस!, असाच राहशील कायम... असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य, तुझं कोवळे पण.. तुझी मोरपिशी साडी! न विस्कटता , न कोमेजता! प्रेरणा: स्वातीताई फडणीसांची हिरवी जिद्द

"गाण्यातली लय!" - तात्या उवाच! (भाग १)

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
राम राम मंडळी, माझ्या "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ या लेखाला प्रतिसाद देताना पक्या यांनी ताल व लय यात फरक काय आहे? हा प्रश्न विचारला आहे. याचे ढोबळ मानाने उत्तर द्यायचे झाले तर प्रथम ताल म्हणजे काय हे ढोबळमानाने पाहावे लागेल. ताल म्हणजे लयीला बांधून ठेवणारी गोष्ट! एखाद्या गाण्याच्या चालीनुसार जी लय असते त्या लयीला अतिशय सुरेख रितीने व सुसुत्रततेने बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे ताल. मग तो कधी एकताल असेल, कधी त्रिताल असेल तर कधी केरवा असेल. हे सगळे तालाचे विविध प्रकार आहेत.