टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
हिरवी जिद्द
प्रेषक स्वाती फडणीस ( शनी, ०७/१९/२००८ - १८:१०) .
.
सिमेंटच्या शेवाळल्या थरात....
मातीचा बोटभर तुकडा शोधून,
उंच उंच जाणार्या इमारती मधल्या
फुटभराच्या रोपट्या....
किती रे सुंदर दिसतोस!
तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं
''जीव शिंपडलाय या देखाव्यात''
जमिनीला घट्ट धरून ठेवणारी तुझी मुळं...
आणि काळपट-करड्या पार्श्वभूमीवरच..
ते टोकाचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सौंर्दयाचा कळस!
आहा... !
डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून.
बर आहे..., तू चित्रात आहेस!,
असाच रहशिल कायम...
असच राहील तुझ चैतन्यमयी हास्य,
तुझ कोवळे पण..
तुझी हिरवी जिद्द!
न जराठता , कोमेजता!
=====================
स्वाती फडणीस ............ ०८-०५-२००८
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


आवडली
बर आहे..., तू चित्रात आहेस!,
असाच रहशिल कायम...
चांगली कलाटणी...
कविता आवडली.
असेच
स्वातीताई,
सहजरावांशी सहमत आहे. कलाटणी काहीशी अनपेक्षित म्हणता येईल (देखाव्यातून काहीशी अपेक्षा होतीच कलाटणीची तरीही); पण आवडली.
सिमेन्टचा शेवाळला थर आणि तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं ''जीव शिंपडलाय या देखाव्यात'' हे विशेष वाटले.
(आस्वादक)बेसनलाडू
हेच म्हणतो..
स्वातीताई,
जग फारच फास्ट झालयं नाही..
चांगली कलाटणी...
कविता आवडली.
(वाचक)केशवसुमार
स्वगतः केश्या तु इथे प्रतिसाद द्यायच्या आधीच ताईंनी तुझा दुसरा प्रतिसाद वाचला सुध्दा..
हेच म्हणते..
कलाटणी चांगली आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मनापासून आभार
छान
वा छान कविता.. मांडणी आणि कलाटणी.. आवडली
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
+१
मांडणी आणि कलाटणी आवडली.
चित्रात नसलेले खरेखरचे पिंपळाचे रोप इमारतीच्या भिंतीत उगवले की थोडेसे घाबरायला होते. ही चिवट रोपे भिंत फोडायला कमी करत नाहीत.