पालकांची भाजी
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात पाचवी यादी लागली आणि सकाळी साडेसहा वाजता एका पालकांचा फोन आला. नाव आहे यादीत. पण एक शंका विचारायची होती. या कॉलेजचे कॅरेक्टर कसे आहे हो?
ऍडमिशन म्हटलं की पालकांच्या हुशारीला मर्यादा पडतात आणि मूर्खपणाला सिमा उरत नाहीत. मी डॉक्टर नाही , सायकॅट्रीस्ट नाही,प्रोफेसर नाही.तरीपण या सर्व संबोधनांचा मालक आहे.कंठशोष करून हे सांगीतलं तरी पालक मंडळी ऐकत नाहीत.जनसंपर्काने साधलेल्या असंख्य अनुभवाचे पोतडे पाठीवर घेऊन हिंडणारा एक सर्व सामान्य पालक आहे मी. WHOमधलादोन वर्ष काउंसेलींचा आणि त्यानंतर एशीयाच्या एका प्रख्यात हॉसपीटलचा प्री अँड पोस्ट ऑपरेटीव अँक्झायटी काउंसेलर म्हणून दिवसाला सोळा सोळा तासाचा अनुभव मला पालकांची आणि विद्यार्थ्यांची अवस्था बघून स्वस्थ बसू देत नाही.जून जुलाई आणि ऑगस्ट बायको रोज दोन रुमाल खिशात ठेवते एक घाम पुसण्यासाठी आणि दुसरा अश्रू पुसण्यासाठी.
पुढच्या दोन वर्षाचे भाकीत आत्ताच करून ठेवतो.
नव्वद टक्के मार्कांनी पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या जागा जवळ जवळ त्याच राहणार आहेत,यावर्षी गूड कॉलेजच्या जागा अपूर्या पडल्या आहेत . दोन वर्षांनी पालकांचे पैसे अपूरे पडणार आहेत गूड कॉलेजच्या आयटी आणि काँप्युटरच्या इलेक्ट्रॉनीक्सच्या ऍडमिशन साठी.मला पण चिरंजीवांसाठी मनस्ताप झाला तो वेगळ्याच कारणासाठी.
ऑफीसमध्ये एक पालक भेटले .ते आत येत असतानाच त्यांच चेहेरा बघीतल्यानंतर खुर्चीचे दोन्ही हात घट्ट पकडले.उगाच ऑर्थोपेडीक सर्जनची धन नको म्हणून.
पहीले वाक्य. डॉक्टर माझ्या मुलाला गणिताचा डिसलेक्शीया झाला आहे.तुमचे नाव ऐकून आलो. आठवी पर्यंत सर्व ठिक होते.धरणी दुभंगल्याचा भास झाला. सर्दी खोकला मलेरीया ,काविळ हे होतात ऐकून होतो पण गणिताचा डिसलेक्षीया तो पण डायरेक्ट नववीत? शांतपणे विचारले डीसलेक्शीया चे निदान केले कुणी?
उत्तर आले शाळेच्या काऊंसेलरनी.
नारुचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा ही मोहीम माहिती होती पण तशी मोहीम शिक्षण मंडळानी काढली आहे काय?
आमचे लव्हाटे सर असला डीसलेक्शीया दोन फटक्यात बरा करायचे त्यांना डस्टरचा फळा पुसण्याचा एकेरी उपयोग मान्य नव्हता.असे शिक्षक होणे नाहीत.
हा गणिताचा डीसलेक्शीया नसून आळ्सेक्षीया असे निदान करून मी सरावाचे प्रिस्क्रीप्शन दिले. नंतर कळले की हे सद् गृहस्थ माझ्या उत्तराने निराश होऊन मुलाला सायकॅट्रीस्ट कडे घेऊन गेले तिथे काहीतरी गोळ्या इंजेक्षनची ट्रीटमेंट चालू आहे .देवनार कत्तलखान्यात चालवत नेल्या जाणार्या मेंढारांना सुद्धा एव्हढे असुरक्षीतता नसावी.
तारे जमीपर्(एक सुंदर कलाकृती )नंतर जरा मार्क कमी मिळाले तर डीसलेक्शीया शोधायचे खूळ तर मूळ धरत नाही ना?
जाता जाता: वरील पेशंटला संध्या़काळी आठ वाजता नंतर कोपरी पूलाखाली अंधारात दमयंती बरोबर पाह्यला.एकदा औषध नलगे मजला चा प्रादुर्भाव झाला की कसलं गणित आणि कसला अभ्यास.
वाचने
4253
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मस्तच..
In reply to मस्तच.. by बिपिन कार्यकर्ते
हेच म्हणते..
हा हा हा
खूळ
मस्तच्
मस्तच
तारे
पालकाची भाजी
बापरे
वा विनायकजी छान लेख!