खरचं तु हवी होतीस ..
खरचं तु हवी होतीस ..
वाळुतल्या त्या शिंपल्यांना
नवे साज देण्या तु हवी होतीस ..
वाळुतल्या पावलांना घुंगरांचा
आवाज देण्या तु हवी होतीस ..
किती लाटा किना-यांवरुन,
परत फिरुन उदास गेल्या....
त्या लाटांना पावलाचा,
स्पर्श देण्या तु हवी होतीस ..
प्रकाशाने आस सोडली,
तु परत येण्याची,
अंधारल्या त्या किना-याला
कवडसा देण्या तु हवी होतीस ..
विखुरलेले शब्द सारे,
त्यांना पाश देण्या तु हवी होतीस ..
अर्थ हरविलेल्या शब्दांचे काही
आभास देण्या तु
Taxonomy upgrade extras
मिसळपाव

गंध अलौकिक याचा
क्षणभंगूर जीवन जरी
शुभ्र पाकळ्या कोमल
नाजूक नाभी शेंदरी
छंद समर्पाणाचा आगळा
वेड्याने त्या जोपासताना
मातीलाही गंध दिला
फांदीवरूनी ओघळताना
मैत्री व्हावी ऐसी
जिवाला जीव देणारी
जीवन ऐसे सार्थ व्हावे
पारिजात फुला परी...
- प्राजु