पावसाळ्यातील एक दिवस
वेळेवर अलार्म झाला, कोंबडा कानि ओरडला,
पाऊसही आला मजला, उठवण्या ||१||
आवरले मग वेगात, आंघोळ उरकली झटपट,
धावलो बॅगसह पटपट, स्टेशनी ||२||
गाडी न थांबली पूर्ण, तरि कुदलो आतच थेट,
बैसण्यास 'विंडो सीट', मिळविली ||३||
अजिबात हले ना गाडी, स्टेशनात होई 'शोर',
गाडीस मिळेना जोर, धावण्या ||४||
पाऊस वाढला फ़ार, आतले प्रवासी गप्प,
'सेंट्रल'चे धंदे ठप्प, जाहले ||५||
एक तास थांबुन आत, मग मुकाट जागा सोडत,
पकडली घराची वाट, सगळ्यांनी ||६||
माझा जो झाला पोपट, कविता त्याचीच करून,
'पावा'त दिली 'मिसळू'न, चाखण्या ||७||
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
राजधानीतील महाराष्ट्र सदनातल्या दालनात नारायण राणे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांना आज त्यांचे हे नेहमीचे दालन मिळण्यास उशीर झाल्याने ते वैतागले होते. त्यातून तिथल्या कर्मचाऱ्यानं "साहेब, परवाच तर येऊन गेलात ना? मग आत्ता परत कसे? काम झालं नाही का?' असा उद्धट प्रश्न विचारल्यानं राणे आणखी अस्वस्थ झाले होते. गेल्या सहा महिन्यांसाठी आणि पुढच्या सहा महिन्यांसाठी हे दालन बुकच करून ठेवलं असतं, तर बरं झालं असतं, असा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला.