Skip to main content

दु:ख

दु:ख

Published on 03/11/2009 - 20:45 प्रकाशित मुखपृष्ठ
दु:ख स्वतःला वेदना होऊ नये म्हणून प्रयत्न करतात रक्त वाहू नये म्हणून पट्टी बांधतात दु:ख दिसले की त्यावर इलाज करतात सज्जन माणसे! पण लोकांना दु:ख दिसत नाही अथवा बंद डोळ्यामागे जागे असते दु:ख!- इथेच सगळी गोची आहे रक्ताने माखलेले सैनिक आक्रोश करणारी लहान मुले भूकबळी, हुंडाबळी, आत्महत्या करणारा शेतकरी खाटिकाकडे बांधलेली मुकी जनावरे सगळे जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा शांत झालेले असते सजलेले, सजवलेले , फोटोच्या चौकटीत असते मोहवणारे असते खर आहे- लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!
लेखनविषय:

याद्या 3005
प्रतिक्रिया 11

लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते! अगदी, अगदी! आवडला हा विचार! सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

In reply to by सन्जोप राव

लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!
हीच ओळ हृदयाला भिडली !! - गप्झोप राव जेवण गरम आहे, तोवरंच खाण्यात मजा आहे.

छान कविता... मलईची भूक यांना दु:खाचा तर कधीच विसर पडला... केंद्रात जरी मंत्री असले, तरी महाराष्ट्रात यांचा जिव अडकला... मरतो शेतकरी अन् अंधार जरी दाटला खात्यांचा लोभ मात्र एकच प्रश्न मोठा !!! मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

सुवर्णमयी, प्रयत्न आवडला. आपण ब्लेकची 'On Another's Sorrow' ही कविता वाचली आहे काय? खाली काही ओळी देत आहे. Can I see another's woe, And not be in sorrow too? Can I see another's grief, And not seek for kind relief? ............................. लोक चलाख असतात, दु:ख वाईट नसते!

आवडली --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

खर आहे- लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!
वा! तात्या.

छान आहे कविता आवडली. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही