Skip to main content

मस्यशेती विषयी माहिती हवी आहे

लेखक संजा यांनी बुधवार, 10/03/2010 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो नमस्कार मला मस्यशेती विषयी मराठीतून शैक्षणीक, व्यवस्थापन, मार्केट, मस्यप्रकार अशी संपूर्ण माहीती देणार्‍या संस्थळा विषयी माहिती हवी होती. जाणकारांनी क्रुपया मदत करावी (माहीती मिळालावर धागा ऊडवला तरी चालेल.) संजा.

अस्वच्छते बद्दल चे लेख मिपावर धडाक्यात प्रसिद्ध होत आहेत त्यात आणखी एकाची भर........

लेखक मंगेशपावसकर यांनी बुधवार, 10/03/2010 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
we ve 6.300 garbage collection points in the mumbai and its suburbs. as per ma knowledge ... all we Citizens, committees in the suburbs are all rooting for better garbage disposal systems in mumbai . now what? आज काल कच-या बद्दलचे व अस्वच्छते बद्दल चे लेख मिपावर धडाक्यात प्रसिद्ध होत आहेत त्यात आणखी एकाची भर......... सत्यस्तिथी सांगतो मी म्हणायला तर मुंबई मध्ये राहतो ( maximum tax payers city ). व वेळेत आपला कर भरतो. पण सुविधेच्या नावाखाली ह्या गैरसोयी....... कचरा - मी रहात असलेल्या सोसायटीच्या गेटवरच कच-याचा भला मोठा ढीग आज काल दिसू लागला आहे.

परम सन्तोश

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 10/03/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
परमसंतोष ज्ञात असते ती शोक इतुका, करणार माझ्या मरणावरी गाठले असते मृत्यो तुला भेटुनी वरचेवरी !

शब्दबंध २०१०

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 10/03/2010 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे. =========================================================================== २००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०! परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय.

भग्न किनारे

लेखक जयवी यांनी बुधवार, 10/03/2010 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
का उदास वाटते नयनी पाणी दाटते असून घोळक्यातही एकलेच वाटते बोलणे नको नको मौन सुखद वाटते विचारही मनी नको रितेच मुक्त वाटते शांत सागरातही भोवरे नवे नवे वादळे जुनी परी भग्न किनारे नवे उजाड माळरान हे गंध, गारवा नको श्रावणातही घना बरसणे तुझे नको जयश्री
काव्यरस

साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!

लेखक प्रसाद यांनी मंगळवार, 09/03/2010 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत. तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती! [तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...

आठव

लेखक आमोद यांनी मंगळवार, 09/03/2010 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
वारा भन्नाट भन्नाट, फांदी फांदी धुमशान्, सखी तुझीया केशांचा, येई आठव बेभान . थेंब थेंब सुईगत, अंग अंग शहारत, सय तुझिया स्प्रशाची, माझ्या मनी उफाळत. गती वाढत वाढत तना मनात भीनते, तुझ्या सवेच्या दीसांतच, मन का हे डोकावते? चिंब ओलेत्या ढगांची, इथं गळाभेट होते, तुझिया मिठीची ओढ, मात्र फोफावत जाते. ह्या अचाट पाण्यात, दंगा माझिया मनात, फुफाटत वेडा खुळा, अग्निलोळाचा प्रपात.
काव्यरस

साडेतीन टक्क्याचे ब्रॉडबँड आणि मराठी ब्लॉग्ज्स वगैरेची चर्चा

लेखक रामदास यांनी मंगळवार, 09/03/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी संध्याकाळी मी चर्चासत्रात भाग घेण्यासाठी म्हणून टॅक्सीच्या शोधात होतो तेव्हा स्ट्रँड बुकस्टॉल च्या जवळ माझा वरळीचा एकविसाव्या मजल्यावर राहणारा मित्र मला भेटला. "काय कुठे ?" त्यानी मला विचारलं. "काही नाही आपलं एक चर्चासत्र आहे दादरला .जरा जाऊन येतो." मी हळूच उत्तर दिलं. तसा मी प्रसिध्दीचा झगमगाट टाळतोच म्हणा. पण हा म्हणजे प्रसिध्दीवाला मित्र .तो म्हणाला "म्हणजे ते गांगलांच्या साईटच्या उदघाटनाला जातोयेस म्हण की." मी मान डोलावली. "मग घाई काय आहे .जरा स्वागतमध्ये इडली खाऊ. मग जा दादरला.मी माझ्या गाडीतून सोडतो."त्याने प्रस्ताव मांडला . माझ्या मनात दोन विचार आले.

२२ जून १८९७

लेखक मराठे यांनी मंगळवार, 09/03/2010 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मी २२ जून १८९७ हा सिनेमा "राजश्रीमराठी.कॉम" वर पहिला. चाफेवर बंधूंवर बनवलेला खरं म्हणजे बराच जुना सिनेमा आहे पण मी आधी कधीही ह्याचं नाव कधी ऐकलं नव्हतं. चाफेकर बंधूविषयी मला माझ्या दुर्दैवाने फार माहिती नव्हती. ह्या सिनेमात तत्कालीन सामाजिक परिस्थिती मात्र छान रंगवलेय. विशेषत: ब्राह्मण समाजाविषयी गैर ब्राह्मण लोकांचा दृष्टीकोन कसा होता हे सुध्धा चांगल्या पद्धतीने सांगितलेय. सिनामात विखुरलेली गाणी पण खूप चांगली आहेत. (खरं म्हणजे त्या ओव्या आणि तत्सम घरगुती गाणी आहेत. पार्श्व संगीत असं नाहीच आहे.) पण माझं प्रामाणिक मत सांगायचं तर मला हा सिनेमा पाहून थोडा विरसच झाला.