विजापुरचा अजब किस्सा
हा किस्सा विजापूरला घडलेला. वडीलांचे व्यवसायाच्या कामाअंतर्गत तिथल्या एका शेतकर्याने शेतजमीन सर्वेक्षणासाठी बोलावल्याने विजापूरला जायचे नक्की झालेले. आम्हाला शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग ठरले की सकुटुंब सपरिवार विजापूरला जायचे, वडील त्यांचे काम आटोपतील आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर विजापूर-दर्शन करू.
ठरल्याप्रमाणे आम्ही चौघे लाल डब्ब्यातून विजापूरला रवाना झालो. तिथल्याच एका बर्यापैकी लॉजमध्ये उतरलो. वडीलांची विजापुरात त्यांचे शेतकरी ग्राहक सोडले तर फार कोणाशीच ओळख नव्हती. त्यांचे काम अंदाजाप्रमाणे एका दिवसात आटोपले. आता कल्ला!! मग काय, आमची विजापूर-भ्रमन्ती सुरु झाली.
IPL प्रवेश परि़क्षा
सध्या IPL चा जमाना आहे. हळूहळू हे प्रस्थ वाढतच जाणर, क्रिकेट येण्या बरोबरच नविन "रिक्रुटांचा" IQ तपासण्याची गरज भासू शकेल ती परिक्षा अशी असू शकेल.
१. इंग्लंड मधे कोणती भाषा बोलली जाते?
२. हडप्पा संस्क्रुती मधिल वास्तुशास्त्र, कला या वर चर ओळी निबंध लिहा.
किंवा
सचिन तेंडुलकर चे आडनाव सांगा.
३. पु. ल. देशपांडे खलिल पैकी कश्यासाठी प्रसिद्ध आहेत,
अ. वास्तुशास्त्र
ब. क्रिकेट
क. लेखन.
४. पोप कोणत्या धर्माशी संबधीत आहेत,
अ. हिंदू
ब. मुस्लिम
क. यहूदी
५. ०.० मीटर म्हणजे किती फूट?
६. तुम्हाला न्युटनचा पहिला सिद्धांत माहित आहे का?
अ. होय
ब. नाही.
७.
आभारी वेदनांचा !
कंटक सारे आठवांचे श्वासात सखे रुतलेले
कांगावे अन स्वप्नांचे.., आकांक्षात गुंतलेले.......
काळ ओलांडूनी मागे दिवस जुने फिरलेले
बोभाटे ओल्या स्मृतींचे अश्रुंनी ते मिरवलेले ....
श्वासही भ्रष्टाचारी माझे तुजसवेच बांधलेले
लगाम वेड्या मनाचे मम हातातून सुटलेले....
मी आभारी वेदनांचा मज तयांनी सावरलेले
तटबंदीचे कोट मनाच्या भोवती मी बांधलेले....
नको दिलासे चांदण्याचे उजेडात बरबटलेले
मळलेले बिंब प्रकाशाचे.., अंधार उजळू लागले.....
विशाल.
माझ्या गुरुजींची एक प्रसन्न मैफल
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं |
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः||

मिसळपाव