Skip to main content

२२ जून १८९७

लेखक मराठे यांनी मंगळवार, 09/03/2010 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मी २२ जून १८९७ हा सिनेमा "राजश्रीमराठी.कॉम" वर पहिला. चाफेवर बंधूंवर बनवलेला खरं म्हणजे बराच जुना सिनेमा आहे पण मी आधी कधीही ह्याचं नाव कधी ऐकलं नव्हतं. चाफेकर बंधूविषयी मला माझ्या दुर्दैवाने फार माहिती नव्हती. ह्या सिनेमात तत्कालीन सामाजिक परिस्थिती मात्र छान रंगवलेय. विशेषत: ब्राह्मण समाजाविषयी गैर ब्राह्मण लोकांचा दृष्टीकोन कसा होता हे सुध्धा चांगल्या पद्धतीने सांगितलेय. सिनामात विखुरलेली गाणी पण खूप चांगली आहेत. (खरं म्हणजे त्या ओव्या आणि तत्सम घरगुती गाणी आहेत. पार्श्व संगीत असं नाहीच आहे.) पण माझं प्रामाणिक मत सांगायचं तर मला हा सिनेमा पाहून थोडा विरसच झाला.

विचारवंत म्हणजे नक्की कोण?

लेखक मुत्सद्दि यांनी मंगळवार, 09/03/2010 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
विचारवंत म्हणजे नक्की कोण? मागे एकदा "तेंडुलकरांना" असा प्रश्न कोणितरी विचारल्याचे स्मरणात आहे. त्यावर त्यांचे उत्तर काय होते हे आता आठवत नाही.(कोणी ह्याबाबत त्यांच्या उत्तराचा दुवा दिला तर बरे होईल) परंतु आजकालचा एकंदर कल पाहता "विचारवंत" असण्यासाठी (तथाकथित) धर्मनिरपेक्षवादी (त्यातही अल्पसंख्यांक समाजाची बाजु घेणारे) वा अल्पसंख्यांक समाजाचे असणे आवश्यक आहे का? उदा.तिस्ता सेटलवाड,जावेद अख्तर, मेधा पाटकर, वगैरे वगैरे.... मुत्सद्दि.

चिंचोली : मोरांची आणि थोरांची

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 09/03/2010 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
मोराच्या चिंचोलीबद्दल बऱ्याच वर्षांपासून ऐकत होतो. एखाद्या गावात जाऊन मोर पाहण्याचं प्रचंड आकर्षण वगैरे नव्हतं. पण मुळात भटकायला, नवीनवी गावं नि रस्ते शोधायला आवडत असल्यानं कधीतरी एकदा तिकडे जाण्याचं डोक्‍यात होतं. परवाच्या रविवारी हा योग जुळून आला. गेल्या महिन्यात एका छोट्या ग्रुपला घेऊन मोराच्या चिंचोलीला एक सहल काढायचा बेत केला होता. तो काही कारणांनी साध्य झाला नाही. म्हटलं, वेळ आहे, तर आपणच जाऊन यावं आधी. कार हाताशी होतीच. आनंदराव थोपटे यांच्या वेबसाइटवर जरा टेहळणी केली होती. त्यांच्याशी संपर्क साधून सर्व आलबेल आहे ना, याची चौकशी केली. सकाळी 6 ते 8 आणि सायं.

जाणीव

लेखक तुका म्हणे यांनी मंगळवार, 09/03/2010 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
तू गेल्यावर शरद चांदणे, कधीच पडले नाही, पुन्हा पहाटे निशिगंधाचे फूल उमलले नाही. तू गेल्यावर पुन्हा मोगरा, तसाच सजला नाही, खिडकी मधुनी चंद्र चोरटा, कधीच दिसला नाही. तू गेल्यावर हरवून गेली, अंधारातील वाट, आकाशातील ताऱ्यानशी मग, पुन्हा न घडली गाठ. तू गेल्यावर पाउस पहिला, कधीच पडला नाही, अन भिजलेला सूर गळ्यातून कधी उमटला नाही. तू गेल्यावर कधी न घेतल्या, अंगावरती लाटा, वाळू मध्ये तुला शोधतो दूर किनारी आता. तू गेल्यावर वाटे मजला, असे हरवले काही, शोधीत फिरतो इथे तिथे, पण तरी गवसले नाही. - तुका म्हणे
काव्यरस

थेंबे थेंबे...

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 09/03/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
"कॅन हॅव सम वॉटर प्लीज?" मी हवाईसुंदरीला पाचव्यांदा पाणी मागत होतो. दर वेळेस कुणीतरी एक सुंदरी एका छोट्या पेल्यात थोडे पाणी आणून देत होती आणि माझी तहान काही केल्या इतक्या कमी पाण्याने शमत नव्हती. घरी असतांना सुटीच्या दिवशी दुपारी झकास जेवण झाल्यावर एक तांब्या सरळ तोंडाला लावून न थांबता घटाघटा पाणी पिणार्‍या मला ते चार थेंब पाणी तहानेची अधिक जास्त प्रकर्षाने जाणीव करून देत होतं. त्या सुंदर, फटाकड्या सुंदरींना वारंवार पाणी मागणं मलाही प्रशस्त वाटत नव्हतं. माझा पहिलाच आंतरराष्ट्रीय विमानप्रवास होता तो.

(मिपादिन?: नवेच आहे शत्रू नव्यांचे!! प्रस्थापित नाहीत.)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 09/03/2010 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर्सः १. कृपया ह. घेणे नाहितर जोडे तयार आहेत. १.अ. कुणाचे जोडे तयार आहेत हे विचारू नये, अपमान होईल. २. सदर विडंबन हे विरंगुळा म्हणून लिहीले आहे. वरचे दोन शब्द काही लोकांच्या नजरेआड जाण्याची शक्यता आहे म्हणून हे ही लिहीले आहे. २.अ. प्रेरणा ... लिहायलाच हवी का? बरं, वाङ्मयचौर्याचा आळ नको, ही घ्या. ३. नीरजाकडून एक कल्पना (न विचारता) उधारीवर आणली आहे, तिचे आभार. ४. सदर विडंबन आम्हाला आव्हान देणार्‍या श्री.श्री.

स्त्री - पुरुष

लेखक मंगेशपावसकर यांनी मंगळवार, 09/03/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री ही काल ही भारी होती, आजही आहे आणि नेहमीच राहील. पुरुष हा काल ही आभारी होता, आजही आहे आणि नेहमीच राहील

आई आहे तर मी आहे.........

लेखक मंगेशपावसकर यांनी मंगळवार, 09/03/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गे दुर्घटभारी तुझवीण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी.... स्त्री ची क्षत्रू स्त्रीच असते हे खरे असले तरी स्त्री शृंगार पुरुषासाठीच करते, म्हणून त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे, आमच्या वोर्क अरेना मध्येही अशाच सुंदर क्याजुअल वस्त्रे परिधान केलेल्या ललना (फ्रेंड्स ) येतात आम्ही त्यांचाशी फ्लर्ट ही करतो. पण मुक्तपणे, स्वैर, त्यानाही दुखावत नाही. परत कॅफेटेरिया मध्ये एकत्रच लंच घेतो. दोन स्त्रियांचा भांडणात त्यांचा बहुतेक वेळा विषय स्वतःचा पुरूषच असतो.

जबरा नशीला ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी मंगळवार, 09/03/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
जबरा नशीला ! ! ! इश्काची जालिम नशा, ज्या कुणाला जाहली, मद्याची सुरई त्याने पुन्हा कधी ना पहिली ! ह्यां परी कमजोर नव्हतो, नशीले आम्ही जबरा असे, सुरई करुनिया रीती, अधरांची ही प्राषिली ! !

इमर्जन्सी - २

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 09/03/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो. ------------------------- आतमध्ये गेल्या गेल्या पडद्या-पड्द्यानी बंद केलेल्या एका रूममध्ये मला नेलं. त्या गुलाबी रंगाच्या झगा घातलेल्या नर्सने पट्टेरि पट्टेरी (मुंबईचा जावई सिनेमामध्ये शरद तळवळकर ज्या प्रकारच्या अर्ध्या पँटीत हिंडत असतो तसल्या )कापडाचा गाऊन म्हणून काहीतरी घालायला दिलं. "प्लिज टेक ऑफ योर क्लोथ्स अण्ड वेअर दिस गाऊन" अशी विनंती वजा आज्ञा करून ती चालती झाली. तो सो कॉल्ड गाऊन मी उघडला.