Skip to main content

लक्षद्वीप फिरायला जाण्यासाठी मार्गदर्शन पाहिजे....

लेखक श्रीराजे यांनी मंगळवार, 20/04/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो..! मला लक्षद्वीप फिरायला जाण्यासाठी माहिती हवी आहे.. जरी कोणाला याबद्दल माहिती असेल तर मार्गदर्शन करावे.... धन्यावाद..!

(भांडणशब्द)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 20/04/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द आणि सत्तांतर भांडणशब्द थंडावलेला॥१॥ भग्न प्रतिसाद काहीबाही॥२॥ क्षयाधिकार मवाळभाषा॥३॥ गरम माथा अखेर फडफड॥४॥ दीर्घ बतावणी हलकल्लोळ॥५॥ बधीर आवेश ओहोटी संचय॥६॥ विकल भ्रांत चिंताक्लांत॥७॥
काव्यरस

राम...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 20/04/2010 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा मनाच्या पसार्‍यात राम नाही, बहाणे मनाचे…, दिलाशात राम नाही ! सुखाचे जरी हे पुरावे हजार हाती, मनाला कसा तो भुलाव्यात राम नाही ! इशारे फुलांचे…., अता भूलणार नाही, फुलांच्या मनी राहिला आज राम नाही ! कशाला हवे चंद्र.., तार्‍यांचे चांदणेही, अता चांदण्यांच्या लकाकीत राम नाही ! हसावे, रडावे, मना त्यात गुंतवावे, उसासे फुकाचे.., खुलाशांत राम नाही ! विशाल.

कारणे....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 20/04/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
वाहणे खांद्यावरी ते, गर्भ …. कोवळ्या वासनांचे, रक्ताळलेल्या जाणीवा अन.. व्याकूळता ओल्या स्पंदनांची ! पेलणे ओझे सदाचे, माथ्यावरी संवेदनांचे.. गुंजती रंध्रात सार्‍या, गुढगर्भित कंपने… तृषार्त मुक्या शब्दांची ! सोसणे नकोसे अताशा, पराभव वेदनांचे… लढतो आहे जीव कधीचा, लढाई आपुल्याच… जिर्ण ओल्या जखमांची ! प्रश्न..प्रश्न ?; उत्तर नाही.., शोधणे नेहमीचे… शोधतो आहे आरंभापासुन कारणे … माझ्याच पराभवाची ! विशाल.

वंगणबद्ध

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 20/04/2010 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द वंगणबद्ध ही सकाळ इसबगोल थॅन्क्स हिरव्या मिरच्या गरम मसाला दीर्घपार्ट्या अ‍ॅसिडीटी गरम घशाशी गुरगुर जरा तरी बाटली बूचबंद किंचित कळ बंद दार सुलभ सुलभ अतिआनंद

फ्लोरिडा वॉल्ट डिस्ने पार्क

लेखक मीली यांनी मंगळवार, 20/04/2010 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा मार्च मध्ये फ्लोरिडा ला जायचा योग आला...म्हणजे आणावा लागला...त्याचे असे झाले कि मार्च मध्ये अमेरिकेमध्ये मुलांना स्प्रिंग ब्रेक असतो. तसे बरेच ब्रेक असतात.तेव्हडेच मुलांना हुंदडायला बरे! म्हटले यावेळी आपण का मागे राहावे!

चतुर

लेखक झकासराव यांनी सोमवार, 19/04/2010 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
घोराडेश्वरला गेलो होतो तेव्हा त्याच्या अलिकडेच असलेल्या अमरदेवी मंदिरात जाउन आलो होतो. तिथेच एका पायरीवर हा चतुर बसलेला दिसला. फार हालचाल करत नव्हता म्हणुन ह्याचा फोटो सहजगत्या मिळाला. एरवी हे चतुर भलतेच तुरेतुरे असतात. फोटो मिळण कठीण असतं. 1

काथ्या आणि कूट...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 19/04/2010 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
विनोदाला कोणत्याही शब्दाचं वावडं नसतं. काथ्या म्हणजे काय असा कूट प्रश्न आजच्या पिढीला पडणं साहजिकच आहे. कारण काथ्या कशापासून बनवतात, कशासाठी वापरतात? हे काही शालेय पुस्तकात लिहिलेले नाही. नायलॉन दोऱ्‍या वापरात असल्याने काथ्या प्रकार इतिहास कालीन चीज झाली आहे. नारळाच्या रखरखीत धाग्यांना वळून काथ्या करतात. त्या पासून कासरा बनवतात. कासरा काय किँवा सासरा काय, दोन्हीही लगाम लावणारे म्हणून परिचित. कासरा ओढला की वासराचे बेफाम हुंदडणे थांबते आणि सासरा गरजला की सून किँवा जावई थबकतो!