Skip to main content

स्वामीं ! तुम्ही सुद्धा ? ? ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 22/04/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामीं ! तुम्ही सुद्धा ? ? ? टी व्ही वर ब्रेकिंग न्यूज, कानोंकानी खबर आली, xxxx स्वामींना गुन्हयासाठी अटक झाली. मोर्चा, लाठीमार, सारं काही झालं. पोलिसांनी तरी त्यांना गजाआड केलं ! भरल्या घरची लेक, *पोटुशी राहिली होती. अन स्वामींची तक्रार, पोलिसांत नोंदली होती. जमानत ! सुटका ! ! सारं रीतसर झालं ! ! ! स्वामींनी सगळं कसं सहज “म्यानेज ” केलं ! भरल्या घरच्या लेकीला “ गुरुमाय ” केलं. अन संग संग विमाननं “फॉरेन “लाही नेलं !

मॅजिक किंगडम!

लेखक मीली यांनी गुरुवार, 22/04/2010 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
मॅजिक किंगडम लिबर्टी स्वेयर बोटीने आम्ही मॅजिक किंगडम च्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. बोटीतून दिसलेले डिस्ने चे रेसोर्ट. गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून थोडे पुढे गेलो आणि सिंड्रेला चा महाल दिसला.

मुक्तपीठ आणि कमेंट्स

लेखक सुचेल तसं यांनी गुरुवार, 22/04/2010 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या दृष्टीने सध्या तरी सर्वात विनोदी लेखन म्हणजे सकाळच्या मुक्तपीठमधले लेख आणि (त्याहीपेक्षा) त्यावर पडलेल्या भन्नाट कमेंट्स. पब्लिक बिचारी उत्साहाने लेख लिहिते आणि तलवारी पाजळत असलेले कमेंट बहाद्दर त्यांच्या लेखाची पार खांडोळी करतात. :-) काही उदाहरणे: एक बाई मुलीच्या बाळंतपणासाठी चीनला जाऊन आल्या आणि मुलीला त्या बाळाला हाँगकाँगचा आयडी मिळावा अशी इच्छा होती त्यामुळे ती हाँगकाँगच्या एका दवाखान्यात भरती झाली. त्यामुळे त्या बाळाला चीनचा व्हिसा मिळायला ज्या अडचणी आल्या त्याचं वर्णन बाईनी लेखात केलं होत.

पुन्हा एकदा लढत ६४ घरांच्या विश्वविजेतेपदाची!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 22/04/2010 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख २० एप्रिल २०१०. तब्बल ४० तासांचा थकवणारा प्रवास करुन विश्वनाथन आनंद बायको अरुणा समवेत अखेर एकदाचा बल्गेरियाची राजधानी सोफियाला पोचला आणि माझ्यासारख्या लाखो रसिकांनी सुटकेचा निश्वास सोडला! आईसलँडमधल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने तो फ्रँकफर्टला चार दिवस अडकून पडला होता आणि शेवटी त्याला गाडीने जावे लागले. तो आणि त्याचा आव्हानवीर बल्गेरियाचा वेसेलीन टोपालोव ह्यांच्यातला विश्वविजेतेपदाचा सामना २३ एप्रिलला सुरु होतोय.

Grilled Sandwich

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 22/04/2010 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सकाळी व संध्याकाळच्या वेळेत खाण्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय म्हणून मानल्या गेलेल्या, Grilled Sandwich ची पाककृती मराठीत उपलब्ध करून देण्याची विनंती मी आपल्या मिपावरील जाणकार आणि खव्वये यांना याद्वारे करतो. प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत, इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

दोन शब्द...

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 21/04/2010 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, एवढ्या दिवसांच्या मिपाच्या प्रवासातील एक अशी माझी ओळख आज पर्यंत होती. तात्यांनी ही नवी जवाबदारी दिली आहे त्या जवाबदारीवर मी खरा उतरण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. मिसळपाव उभं करतांना ज्या उद्येश्यांना सामोरे ठेवलेलं होतं त्याच दिशेने मिसळपावची वाटचाल व्हावी अशीच भूमिका असेन या कडेही जाणीवपुर्वक लक्ष देईल. सर्वप्रथम मी सगळ्या मिपापासुन दुर गेलेल्या माजी सदस्यांना परत येण्याचे आवाहन करतोय.

स्वामी नित्त्यानंद, स्वामी तात्यानंद आणि आपली रंजिता... :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 21/04/2010 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच्या दुनियेत 'स्वामी', 'बाबा' किंवा तत्सम कुणीही धर्मोपदेशक म्हटला की तो अंमळ बाईलवेडा असतो असे आमच्या पाहण्यात आले आहे.. मग तो स्वामी नित्त्यानंद असो की आणखी कुणी स्वामी तात्यानंद असो..

शुद्ध दाद दे !!

लेखक बाळअमोघ यांनी बुधवार, 21/04/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील माझे पहिलेच लिखाण आहे. (चूभूदेघे) एक कविता आहे .. कलाकाराच्या भूमिकेतून लिहिलेली. हे गाण लवकरच दुवा स्वरुपात देइन. ताल सूर नाद्ब्रह्म , अन्तरात घे मैफल ही ईशदान, शुद्ध दाद दे !! गंधर्वच करिती गान, निर्मळ नि:स्वार्थ दान याचक हो, हो भोगी, शुद्ध दाद दे !! जन्म मला काही क्षण, सार्थक तो होइल पण निर्मि कला तव कारण, शुद्ध दाद दे !!

सावित्रिच्या लेकी ....

लेखक झुम्बर यांनी बुधवार, 21/04/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज पासून पोळ्या तु कर संध्याकाळच्या आईसाहेबांच फर्मान सुटल आणि अचानक का का का ????? काहूर उठल, अर्थात पोळ्या कारण ही फार मोठी बाब नवतीच मुळी ... पण ज्या कारण साठी मला हे काम गळ्यात घ्यायला सांगण्यात येत होत ते कारण जवळपास संतापजनक होत... हो कदाचित चाणाक्ष मिपा वाल्यांनी कारण ओळखल असेलच "जावई शोध " सुरु झाला होता... अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नवती तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का?