Skip to main content

फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी गुरुवार, 17/12/2009 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो. मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही. तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे. सकाळी ३:०० वाजता उठायचे, चांदणी चौकमार्गे ८०-९० किमी जाऊन सुर्योदयापूर्वी त्या स्वर्गात पोचायचे असाच अगदी शेम-टू-शेम प्लॅन असायचा. तिथली अधिक माहिती या दुव्यावर मिळेल: फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव . . . सुर्योदयाच्या आधी पोचलात तर स्वर्ग जमिनीवर आल्यासारखे वाटेल... . . . मग थोडी कोवळी उन्हं चढली की सगळे अवघे जग सोन्याने न्हाऊन निघते. . . . मग आम्ही फोटोग्राफर लाईट छान मिळाला म्हणून खुश होतो. . . . आणि भंगार पाईपसुद्धा सुंदर दिसू लागतात. . . . तुम्ही पण नक्की भेट द्या... पण एकच विनंती आहे.... येताना फक्त आठवणी घ्या आणि पाऊलखुणा मागे ठेवा... © या पोस्टमधील सर्व फोटोग्राफ्सचे हक्क अबाधित आहेत. pankajzarekar@gmail.com

वाचने 8498
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

फोटो तर मस्तच आहेत. (पण खालची कॉपीराईटची टिप्पणी चांगल्या झालेल्या खिचडीतील 'खड्यासारखी' लागतेय. (फोटोत (C) आहेच ना? ) "तुम्ही पण नक्की भेट द्या... पण एकच विनंती आहे.... येताना फक्त आठवणी घ्या आणि पाऊलखुणा मागे ठेवा..." तुमच्या भावना पोहचल्या पण - पाऊलखुणा म्हणजे आपली ओळख. म्हणजे आपण तेथे (निसर्गात) काहीतरी (म्हणजे आपली ओळख पटेल असल्या) गोष्टी ठेवून यायच्या का? (बरेच जण निसर्गात गेले की ओळख पटवण्यासाठी काहीतरी बरबटून ठेवतात, प्लॅश्टीक, कचरा टाकतात म्हणून लिहीले हो.) ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

२रा फोटो शॉलिट्ट्ट्ट्ट्ट हाय... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

तुम्ही छान फोटो काढता.

सॉल्लीड फोटोशॉप वापरता राव तुम्ही :) कोणत्याही साधारण फोटो ला सुद्धा अल्टिमेट बनवु शकाल. इथे तर तुमच्या फर्स्टक्लास कॅमेरा अँगलची जोड आहे. जबरा फोटू ! आपला (छायाचित्र प्रेमी) फोटोबा ग्राफर

सुरेख... अप्रतिम फोटो आहेत. पहिला तर जबराच..!

मित्रा, फोटो निव्वळ जबरा आहेत. स्तुती करण्यासाठी शब्द नाहीत :) - सूर्य.

श्री झरेकर -जी, उत्तम फोटो. आवडले. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

अप्रतिम फोटोज! पण नक्की कुठे आहे हे ठिकाण? रस्त्यावरच आहे का? - संताजी धनाजी

कॅमेर्‍याचा अतिशय सुंदर वापर तुम्ही केला आहात. दुसरा फोटो तर मला चक्क परदेशात टिपल्याचा भास झाला. मस्त फोटो. वेताळ

In reply to by वेताळ

दुसरा फोटो तर मला चक्क परदेशात टिपल्याचा भास झाला
परदेशातील अवघे जग सोन्याने न्हायलेले आहे का ? फोटो आणि त्यावरची कलाकारी अप्रतिमच !!

फार म्हणजे फारच सुंदर फोटू! ग्रेटच! रेवती

In reply to by रेवती

अतिशय सुरेख फोटो...निळं आकाश कसलं सही दिसतंय! :)

भारी -दिलीप बिरुटे

बॉस !!! बिपिन कार्यकर्ते

क्यामेरा कोणता वापरता तुम्ही ते सांगितले तर बरं होईल. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.