मराठी कुठं बोलावं..
या विषयावर मिपावर खूप वेळा चर्चा झालेली आहे पण आज असा एक अनुभव आला की हा लेख लिहावासा वाटला..
आज आमच्या हापिसामधे चहा-पानाच्या वेळी घडलं हे:
मी, २ अमराठी सहकारी (जे माझे ब~यापैकी चांगले मित्र आहेत) आणि ३ मराठी सहकारी असे कट्टा करुन चकाट्या पिटत होतो.. वातावरण खेळीमेळीचं होतं.. आणि वायफ़ळ विषयावर विनोद वगैरे चालू होते.. त्यात मी एका मराठी सहका~याशी मराठीत विनोद केला (काय ते आता माझ्याही लक्षात नाहीये, काहीतरी फ़ुटकळच होतं) तर ही अमराठी मैत्रीण म्हणाली "तुम्हारा ये मराठी मंडल कही और लेके जाओ. (ती मजेत बोलुन गेली असावी)".. मला खरतर असं काही अपेक्षित नव्हतं पण मग प्रसंग सावरण्यासाठी मीही बोलुन गेले "हम दोनो (मी आणि माझा मराठी मित्र) राज ठाकरे को support करते है..(जे मनात ते जनात)" पण मग हा विनोद न राहता विषय वाढत गेला आणि त्याचं वादात रुपांतर झालं.. ते दोघे (अमराठी मित्र) राज विरोधात बोलत होते (जे मुद्दे हिंदी वाहिन्या नेहमी प्रसारित करते), मी माझ्या बाजुने माझे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला.. आता अबु आझमीला कानफ़टात लावणे माणुसकीच्या दॄष्टीने चुकीचं असलं (त्यांच्या भाषेत) तरी मला प्रामाणिकपणे ती बातमी ऐकुन आनंद झाला होता.. आणि माझा राज ठाकरेला पाठिंबा हा फ़क्त मराठीची सक्ती या एका मुद्द्यावरुन नाहीये.. हे मी सांगायचा प्रयत्न केला.. पण ते दोघे ऐकत होते, समजुन घेत नव्हते.. असो.. थोड्या वेळाने चर्चा गंभीर आणि जास्त गरम वळण घेतेय हे पाहून आम्ही विषय बंद केला आणि आपापल्या जागी गेलो..
पण माझ्या डोक्यातून हे काही सहजासहजी गेले नाही.. म्हणून हा लेखप्रपंच.. (कसंय समविचारी लोकांना संगितलं की जरा बरं वाटतं.. :))
त्यातले काही मुद्दे असे
१) त्यांचा मुद्दा: मी महाराष्ट्राबाहेर खूप दिवस राहिले नाही म्हणून मला बाहेरच्या लोकांचे problems माहीत नाहीत..
-- असेल कदाचित पण माझे बरेच अमराठी मित्र-मैत्रिणी आहेत आणि आमच्यामध्ये भाषेवरुन कधीच वितुष्ट आले नाही.. आणि मी तरी बाहेर राज्यात गेलेच तरी माझ्यासाठी मराठीत बोला असा आग्रह करणार नाही..
२) मी अमराठी आणि मराठी अशा mixed group मधे मराठी सहका~याशी मराठीत बोलते म्हणजे मी मराठी attitude दाखवतेय आणि अमराठी लोकांना मी काय बोलतेय हे कळु नये म्हणुन मुद्दाम मराठीत बोलतेय..
-- यावर हसावं की रडावं हे कळालं नाही. मला स्वत:ला मराठी वापरणे सुट्सुटीत वाटते आणि मराठीत बोलायला आवडतं (मायबोली म्हणून किंवा मराठी भाषेचं सौंदर्य कळतं म्हणून असेल).. काही वाक्य/शब्द मराठीतच ठसकेबाज वाटतात.. प्रत्येक भाषेचं आपापलं वैशिष्टय असतं हे माझं मत..
३) मराठी बोलणा~यांना अमराठी लोकांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते (हापिसात, दुकानात, रिक्षावाल्यांकडून वगैरे)..
-- असेल.. स्वाभाविक आहे.. मी तरी असं करत नाही.. आणि हे सगळीकडेच होत असणार.. हातावर पोट चालवणा~या लोकांनी ह्यांच्यासाठी हिंदी/इंग्रजी/पंजाबी वगेरे शिकावं अशी यांची अपेक्षा.. स्वत: मात्र पुण्यात आल्यापासून (म्हणजे दीड वर्षं ) एकदाही मराठी शिकण्याचा प्रयत्न केलेला नाहीये..
४) mixed group मधे common भाषा वापरणे म्हणजे "group manners"..
-- असेल.. मला वाटायचं भाषेपेक्षा भावना महत्वाच्या.. गप्पांच्या ओघात मी मराठी बोलले, पण मी मराठी लोकांशी कोणत्या भाषेत बोलावं हे ठरवण्याचा हक्क मला नाहीये का?
मग मी असा विचार केला, या लोकांना राज आणि मराठी यांच्याबद्दल तेच माहीत आहे जे वृत्तवाहिन्यांनी दाखवले आणि त्यांच्या जागी ते कदाचित बरोबर ही असतील.. मी स्वत: व्यक्तीला भाषा आणि बाकी सांस्कृतिक भिन्नतेपेक्षा जास्त महत्व देते. त्यामुळे या दोघांबद्दल अढी नाहीये.. पण या प्रसंगावरून मराठी अस्मिता, स्वाभिमान या शब्दांचे अर्थ कळू लागलेत.. मी सगळ्या भाषांचा आदर करते आणि तशीच अपेक्षाही करते.. पण सगळे तसा विचार करत नाही हे दुर्दैव..
या विकतच्या वादामुळे जरा मनस्ताप झाला खरं.. आणखी खेदाची गोष्ट म्हणजे हे सगळं चालू असताना बाकीचे दोघे मराठी शांतपणे बघत होते..
मिपाकरांना काय वाटतं हे जाणून घ्यायची इच्छा आहे.. मी क्षमाशीलतेचा आव आणून गप्प बसायला हवं होतं की दगडावर कशाला डोकं फ़ोडा या विचाराने दुर्लक्ष करायला हवं होतं की जे केलं ते बरोबर केलं.. सध्या मी "आपण खूप महान आणि ते लोक" अग्यानी (अडाणी) असं समजून हा विषय परत येवू द्यायचा नाही असं ठरवलयं.. :D
अजून एक प्रश्न: मराठी-अमराठी लोक एकत्र असताना (कार्यालयाबाहेर) कोणती भाषा वापरावी?
अवांतर: मी मिपाची नियमित वाचक आहे, पण लिहायचा हा नवखा प्रयत्न आहे.. चू. भू. दे. घे.
याद्या
9801
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
मिपा वर
खरंतर हे
कॉमन ठिकाणी कॉमन भाषाच
In reply to खरंतर हे by टारझन
जमेल तसं.....
जिथे
मी चार
असेच
In reply to मी चार by Nile
मित्रांच्
In reply to असेच by विकास
नाईलच्या
In reply to मी चार by Nile
हे लोक
In reply to नाईलच्या by शाहरुख
आजूबाजूला
मिपावर
हेच म्हणतो
In reply to मिपावर by प्राजु
संवाद
बरोबर आहे..
In reply to संवाद by तिमा
+१ सहमत
In reply to संवाद by तिमा
मला एक प्रश्न पडला आहे माणुसघाणे साहेब.
In reply to संवाद by तिमा
माझ्या
In reply to मला एक प्रश्न पडला आहे माणुसघाणे साहेब. by वेताळ
मधलेच
In reply to मला एक प्रश्न पडला आहे माणुसघाणे साहेब. by वेताळ
हिंदी
हिंदी
In reply to हिंदी by विजुभाऊ
हेच हिंदी
मराठी कुठं बोलावं..
टपली?
आमची अडचण उलटीच
आपला गोंधळ
आवडला प्रतिसाद..
In reply to आपला गोंधळ by छोटा डॉन
आपला गोंधळ समजला! :)
In reply to आपला गोंधळ by छोटा डॉन
लैच्च लैच्च लैच्च गोंधळ झाला आहे भौ !
In reply to आपला गोंधळ समजला! :) by Nile
नाही अजून मिटला..
In reply to लैच्च लैच्च लैच्च गोंधळ झाला आहे भौ ! by छोटा डॉन
पण म्हणुन "तुम्हारा ये मराठी मंडल कही और लेके जाओ"?
In reply to नाही अजून मिटला.. by शाहरुख
चांगला अनुभव..
In reply to पण म्हणुन "तुम्हारा ये मराठी मंडल कही और लेके जाओ"? by प्रसन्न केसकर
अनुभव
In reply to चांगला अनुभव.. by शाहरुख
अगदी बरोबर
In reply to पण म्हणुन "तुम्हारा ये मराठी मंडल कही और लेके जाओ"? by प्रसन्न केसकर
अहो पण ...
In reply to नाही अजून मिटला.. by शाहरुख
अजून थोडे...
In reply to लैच्च लैच्च लैच्च गोंधळ झाला आहे भौ ! by छोटा डॉन
सहमत
पुन्हा
श्री रा रा
In reply to पुन्हा by धमाल मुलगा
श्री रा रा
In reply to पुन्हा by धमाल मुलगा
"आज बोललात,
In reply to पुन्हा by धमाल मुलगा
+१ सहमत!
In reply to "आज बोललात, by विशाल कुलकर्णी
आपलं कार्यालय
वाह!
In reply to आपलं कार्यालय by प्रसन्न केसकर
ग्रेट!
In reply to आपलं कार्यालय by प्रसन्न केसकर
पुनेरी साहेबाशी सहमत.....
बिनधास्त
मराठी
या
दणका!!!
In reply to या by श्रावण मोडक
तुम्हाला,
In reply to या by श्रावण मोडक
क्युबेक
छान माहिती...
In reply to क्युबेक by विकास
पुढे...
In reply to क्युबेक by विकास
कॅनडा
In reply to पुढे... by श्रावण मोडक
धन्यवाद!
In reply to कॅनडा by विकास