रिती पोकळी
रिती पोकळी तशी दशा या आयुष्याची
उद्या वेगळी पुन्हा दिशा या आयुष्याची
इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?
जरा लाभले म्हणे म्हणेतो दुरावलेही,
हमी द्यायची कुणी अशा या आयुष्याची?
प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते,
हवा नेतसे तशी दिशा या आयुष्याची
कुठे कालच्या उन्मादाचा कैफ उडाला?
कशी आज ना चढे नशा या आयुष्याची?
वाचने
2770
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वा!
क्रान्ति तै लै दिसानी आलासा
व्वा...
सन्माननीय
In reply to सन्माननीय by विजुभाऊ
विजुभाऊ
In reply to विजुभाऊ by क्रान्ति
पण पोकळी
वा...
क्रांतीतै..
सुरेख
मलाही दुसरा व पाचवा 'शेर' आवडला
नितांत
अप्रतिम!!
खुबसुरत