Skip to main content

"ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!"

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 21/04/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
इन्द्रराज पवारांचा (http://misalpav.com/node/12007)पिंडदानाचा अनुभव एक अशीच आठवण जागी करून गेला. त्यांनी पिंडदानाचे दोन वेगवगळे विधी का असा प्रश्न विचारला आहे. मला त्याचे उत्तर असे द्यावेसे वाटते की विधी ज्या समाजाची जशी समूहदृष्टी तसे आकार घेतात. सतरा अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. माझ्या एका काकांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव वैकुंठावर घेऊन गेलो तेव्हा त्या दिवशी गर्दी अशी नव्हती पण क्यु मध्ये ४-५ पार्थिवे होती. काकांच्या पार्थिवा अगोदर एका वृद्धम्हातार्‍या मजुराचे पार्थिव होते. तो एका सोसायटीचा वॉचमन म्हणुन काम करत होता.

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 21/04/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती!!

लेखक नीधप यांनी बुधवार, 21/04/2010 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे. आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=63… या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं.

दै. प्रहार दक्षिण भारतातसुद्धा?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/04/2010 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या दै. प्रहार ची ऑनलाईन आवृत्ती बघीतली असता खालील प्रमाणे दिसली. daily prahara 21042010 दै. प्रहार दि. २१/०४/२०१० सकाळी ८ वाजता! (वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै.

युगलगित: रानातले खेळ जरा खेळू

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/04/2010 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगित: रानातले खेळ जरा खेळू हिरो: अग ए मैना जरा इकडं ये ना जावूया राना नको म्हणू नको ना गंमत म्हणून जरा खेळ खेळू ना
गोड गोड पोळं झाडावर उभं काढायंचं कसं म्हणतीस का गं कडेवर तुला घेतो अन लाव त्याला हातं टपटप मध चोखून घे ना चल मधमाश्यांचे पोळं जरा काढू ना आता नको नको म्हणू नको ना गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना
हिरवीन: नको रे सजना आले मी राना कुणा सांगता विना सांगल कुणी तर माझा बा येईल ना (दांडकं घेवून माझा बा येईल ना)
काव्यरस

ही लपवाछपवी कशाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 21/04/2010 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
टोपणाचं काम फक्त बूचासारखं, बाटलीबंद करून आतल्या द्रावाची ओळख लपविण्यापुरतं ! मी म्हणतो हे झाकण आपल्या ओळखीला तुम्ही लावताच का म्हणून ? अरे आपण सिँहाचे छावे आहोत, समोरासमोर गर्जना करायची आपण ! आपण सगळे मराठमोळे मावळे आहोत, खऱ्‍या समशेरी घेऊन हल्ला करायचा आपण ! आपल्या आवाजात आसमंत दणाणून टाकणारी जरब असावी, वाघांची ती डरकाळी व्हावी,मांजराची मँव मँव नाही ! मग कशाला हे वाघाचं बेगडी कातडं पांघरता? ही लपवाछपवी कशासाठी? अरे स्वतःची ओळख ठासून सांगा.. अशी पुळचट अन् हसण्यावारी नेणारी नावे धारण करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व दुभंगू देऊ नका. जे बोलायचंय ते स्वतःच्या खऱ्‍या ओळखिनिशी बोला.

मुंज

लेखक प्रभो यांनी बुधवार, 21/04/2010 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात एक पत्रिका आली घरी. गुल्ट्या रूमीला मराठी वाचता येत नसल्याने कोणाच्यातरी लग्नाची पत्रिका वाटली त्याला. मी घरी आलो तर बोंबलत विचारलं..'किसका शादी है? इनव्हिटेशन आया है.' त्याच्याकडून पत्रिका घेऊन पाहिली तर ताईने पाठवलेली. राहुलच्या मुंजीची. पत्रिका वाचताना मन हळूच मगे गेलं ...१९९३ मधे. मुलगा आठ वर्षाचा झाला की मुंज करायची असा आमच्या घरचा रिवाज. आजोबा लवकर वारल्याने वडिलांची मुंज खुपच उशिरा झालेली. त्यामुळे त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा होती की आपल्या मुलाची मुंज एकदम धुमधडाक्यात करायची. माझी तिसरीची परिक्षा संपली आणी सगळ्यांनाच वेध लागले मुंजीचे.

दिलीपकुमार आणि चंदेरी वर्ख निघालेले अन्य कुणी....

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 20/04/2010 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
आज एका धाग्यावरील दिलीपकुमारच्या उल्लेखाने , एकेकाळच्या टॉपच्या असलेल्या या अभिनेत्याच्या नाण्याची आजकालची किंमत काय असावी याचा अंदाज आला. या निमित्ताने लोकप्रियतेचे तात्कालिक स्वरूप , व्यक्टींच्या आवडीची व्यक्तीसापेक्षता या सर्वांबद्दल विचार दाटून आले. इतर अनेक गोष्टींप्रमाणे दिलीपकुमार या नटालाही या गोष्टी लागू होणार हे निश्चित होतेच. परंतु , त्याबद्दलच्या मतभिन्नतेच्या संदर्भात इतके टोकाचे ऐकायला मिळावे हे रोचक वाटले. दिलीपकुमारबद्दलच्या विरोधी शेरेबाजीकरता पवारसाहेबांचा चित्रपटविषयक धागा उघडून पाहता येईल. त्या नटाची योग्यता वर्णन करणारा सन्जोप राव यांचा खालचा परिच्छेद वाचनीय आहे.

पिंडविधी आणि कावळा ~ दोन अनुभव !!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी मंगळवार, 20/04/2010 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
२१ व्या शतकाच्याबाबतीत असे म्हटले जात आहे कि विज्ञान कल्पनेपेक्षाही जास्त प्रगती करणार आहे आणि संपूर्ण जगच आता एक छोटेसे खेडे वाटावे अशा रीतीने जुळले जाणार आहे किंबहुना ती प्रक्रिया काही प्रमाणात सुरु झाली आहे असे म्हणण्यासही प्रत्यवाव नसावा.

रेड सन च्या निमित्ताने

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 20/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओरीसाचे सध्याचे डी जी पी पूर्वी राज्याचे गुप्तचर प्रमुख होते. राज्याच्या नक्षलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी एक सूचना प्रसारीत केली – रात्रीच्या वेळी गस्त घालताना किमान दोन पोलीस एकत्र असायला हवेत. एके रात्री साहेब सहज बाहेर फिरायला पडले. साध्या वेषात. भुवनेश्वरमध्येच. रात्रीचा दीड दोनचा सुमार असावा. एका पोलीसाने हटकले. बंदूक रोखली. साहेब थांबले. त्याला जवळ येऊ दिला. एका क्षणात त्याची बंदूक यांच्या हातात आली. त्याच्यावर रोखून विचारले, दुसरा कुठे आहे? तर तो दुसऱ्या गल्लीत होता. साहेब हताश झाले. सूचना बाजूला राहू देत; कॉमन सेन्स नको का?