Skip to main content

जुन्या पुण्यातला-जुना बाजार

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 04/04/2012 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुणं कितिही बदललं,नवनविन रुप घेत गेलं तरी पुण्याच्या काही सांस्कृतिक खुणा,किंबहुना पाऊलखुणा आहेत. त्या काळानुरुप काहि तश्याच,काही बदललेल्या,तर काही अपरिहार्यपणे पुसल्या गेलेल्याही आहेत...अशीच एक जुनी आणी खास जुन्यासाठीच प्रसिद्ध असलेली एक काळाच्या ओघातही टिकलेली खुण म्हणजे आमचा लोकप्रीय जुना बाजार... ऐतिहासिक शनिवारवाड्यापासुन पायी दहा मिनिटाच्या अंतरावर दर रविवारी आणी बुधवारी भरणारा हा बाजार म्हणजे एक प्रकारचा अघोषित सम्राटासारखा आहे... हे एक प्रकारचं गिर्‍हाईकी लोकाधारावर उभं असलेलं लोकं-राज्य आहे.

हेरीटेज पुणे: त्रिशुंड गणपती मंदिर

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 04/04/2012 20:25 या दिवशी प्रकाशित केले.

भर दुपारी बारा वाजता शनिवारवाड्यापाशी अत्रुप्त आत्म्याची वाट बघत उभा होतो. ट्रॅफिक जाम मध्ये अडकल्याने तसे थोड्याश्या उशिरानेच आत्माजी हजर झाले. कसबा पेठेतील प्राचीन शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिराला भेट देण्याचा आजच्या भटकंतीचा उद्देश होता. साततोटी हौद चौकापासून अगदी जवळच हे मंदिर आहे. त्रिशुंड गणपती मंदिर हे इ.स १७५४ मध्ये नाथपंथी गोसावींनी बांधलेले आहे. मंदिराला कळस नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरूषभर उंचीच्या दगडी जोत्यावर उभारलेले आहे. राजस्थानी, माळवा आणि दाक्षिणात्य शैलींचा संमिश्र वापर येथे करण्यात आला आहे.

आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला

लेखक मन यांनी बुधवार, 04/04/2012 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
देवाचिये दादुलेपनाचा उबारा| न साहावेचि साताहि सागरा|| भेणें वोसरूनि राजभरा | दिधली द्वारावती || (अर्थः- देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या तेजाने सातही सागर हैराण झाले व त्यांनी आपल्यातला काही भाग काढून कृष्णांस द्वारकानगरी दिली.) असे आद्य कवी नरिंद्र ह्यांना कृष्णाची स्तुती करताना म्हटलय. बहुतेक आमचेही तेज आमच्या खड्डुस बॉस व सहकार्‍यांना सहन होत नसावे.मला उत्तर भारतात तडीपारीसाठी(डेप्युटेशनवर) पाठवायची म्हणूनच ह्यांनी व्यवस्था केली आहे. मी नको नको म्हणत असतानाही बॉसनी शेवटी दिल्ली-चंदीगढचा प्रोजेक्ट(मोहिम) दिलाच. माझ्या अतुलनीय कौशल्यावर प्रसन्न होउन कंपनी मला थेट तिकडे पाठवते आहे.

सदमा.....

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 04/04/2012 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
बडीशेप चघळत बाहेर पडलो तेव्हा रात्रीचा जवळ जवळ एक वाजला होता. नाशिक पुणे रस्त्यावर संगमनेरच्या थोडे अलीकडे असणाऱ्या या ढाब्या कडे आजवर मी कधी ढुंकून बघितलं नव्हतं. पण आज इतका वैतागलो होतो, थकलो होतो की आता गाडी चालवण्याचा कंटाळा आला होता. एक तर सक्काळी चार वाजता नाशिकहून निघालो होतो. पुण्यातले काम आटोपून पुन्हा परत निघायला उशीर झालेला. पुण्याला बहुदा आजवर चालक घेऊन जावसं वाटलं नाही. त्यामुळे मी पुण्याला आलो की चालक नाशकात ऐश करतो. आम जनता बहुतेक नाशिक पुणे रस्त्याला कावलेली असते. पण मला हा रस्ता आवडतो. फुल रोमांटिक रस्ता आहे.

हिताची निगा किती करावी?

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 04/04/2012 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
. हा पर्जन्य वृक्षाच्या कटघराचा, १ एप्रिल २०१२ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास काढलेला, आजदे गावातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी मार्गावरील फोटो आहे. . हा रस्ता कदाचित डोंबिवलीतील सर्वात सरळ, सर्वात लांब व रुंद असलेला आणि दोन्ही बाजुंनी सुव्यवस्थित वृक्षारोपण केलेला सुंदर रस्ता आहे. आजदे ग्राम-पंचायतीने रस्त्याकाठच्या वृक्षांची उत्तम काळजी घेतलेली दिसून येते.

चक्रावळ

लेखक चाफा यांनी बुधवार, 04/04/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्यक्षात ही कथा मिपावर काय किंवा मीम वर काय सारखीच :) तरीही अंगातल्या खोड्या जात नसल्यानं इथे पोष्ट करतोय !
चक्रावळ
दिवसभराच्या दगदगीनं वैतागलेला निखिल शेवटी न जेवताच ताईच्या घरातून निघून रेल्वे स्टेशनवर आला. संध्याकाळपासून ज्या काही गोष्टी त्याने पाहिल्या होत्या त्या खरंच त्रासदायक होत्या. एरव्ही कधीही त्याने असा थिल्लरपणा चालू दिला नसता पण.. शेवटी हे घर त्याचं नव्हतं त्याच्या मोठ्या बहिणीचं होतं ती आणि तिचे पती ज्या गोष्टी योग्य समजतील तशाच तिथे घडणार होत्या.

पैसा कमाओ पर दुआ भी कमाओ , मिया !

लेखक पहाटवारा यांनी बुधवार, 04/04/2012 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
हैद्राबादी हिन्दी ची थोडि झलक म्हणून लिहिले आहे .. इंदुरि झलक वाचून जरा तल्लफ आली म्हणून .. स्थळ - हैदराबादेतील एक मुन्सिपल ओफिस जिथे जन्म नोन्दणी होते ते "स्स्लाम आलेकुम मिया .. खॅरियत ??" "बोलो , क्या काम है?" डोळे वर न ऊचलता साहेब बोलले .. "छोटासा काम है बस .." "अरे छोटा , बडा सब काम करने के वास्तेच बैठे है , बोलो." "मिया , ये अस्लम , मेरा छोटा भाई" "तो ?" "इनो एक छोकरि हूई परसूं को , ह्यां कोटि अस्पताल मेंईच हुई .." "हां , काम बोलो" अजुनहि साहेबाची नजर काहि वर येइना .. "ये बरथ सरटिफिकिटां ..." "फोर्म भरो .. बाहर .. " "नहि मियां .. ये सरटिफि़किटां मिलेसो है ..

स॑ध्याकाळ आणि आठवणी!!

लेखक प्रीती यांनी बुधवार, 04/04/2012 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
किती सु॑दर स॑ध्याकाळ होती आजची!!! निळ्या आकाशात पसरलेले ते गुलबी केशरी ढग , त्यातून किलकिलाट करत आपापल्या घरी परतणारे पक्षी , धु॑द करुन सोडणारा वारा आणि त्या वार् यासोबत येणारया आठवणी!!!!! मनाला हुरहुर लावणार॑ पण एकदम मस्त वातावारण!!! सोबत कोकीळेच॑ गाण॑ ! वस॑ताची आतुरतेन॑ वाट पहाणारा पक्षी म्हणुन त्याची ओळख! पण खर॑तर आपल्या सोबतीदारास , आपल्या जोडीदारास दिलेली ती साद!! या मूक भाषा!!