Skip to main content

आपले बुवा बरे आहे...

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 02/04/2012 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रच आता मित्रांचा खून करतात आणि वर खंडणी पण घेतात... आपले मित्र अजून पण टिकून आहेत.. मैत्री खातर जान द्यायला पण तयार आहेत.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... बायकोने प्रियकराला हाताशी धरले आणि नवऱ्याला ठार मारले आपली बायको मात्र अजून पण रात्री २ पर्यंत जेवायला थांबते.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... मुलाने केला आईचा खून कारण आला दारू पिवून.. माझी मुले काही असे करत नाहीत कारण ती अद्याप लहान आहेत.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... भाजीचे हे भाव वाढले, सरकारने पण हात टेकले... आपण काही भारतात नोकरी करत नाही शेजारी उपाशी राहिला तरी आपल्याला फरक पडत नाही.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... असते खूपच

फोटोशॉप किडे - २ ( ब्लर फिल्टर)

लेखक स्पा यांनी सोमवार, 02/04/2012 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोशॉप किडे - १ मागच्या भागात आपण "इरेझर " टूल आणि black न white इफेक्ट पहिला होता, आज आपण "फोटोशोप फिल्टर" चे उपयोग पाहू आता अशी कल्पना करू कि माझ्याकडे SLR कॅमेरा नाही , एक साधा डीजीकॅम आहे (खरही तसाच आहे ;) ) पण मला अस दाखवायचं आहे कि मी एका भन्नाट वेगाने जाणार्या कार ला माझ्या कॅमेरात त्या क्षणापुरत बंदिस्त केलंय.. करता येईल का? हो येईल कि ..

आयुष्य

लेखक विदेश यांनी सोमवार, 02/04/2012 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य मी चालत आहे , सोबतीला चंद्र चांदण्या - मी नाही कंटाळलो, बिचारा चंद्र मूक राहिला ! पाठवून दिले त्याने माझ्या सोबतीला - विनातक्रार शांतपणे किरणांसवे सूर्याला ! ...आता मला सोबत करताना

बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 02/04/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा :- ज्यांना गरज आहे त्यांनी शोधावी. (मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही.
काव्यरस

काही नोंदी अशातशाच... - ९

लेखक श्रावण मोडक यांनी सोमवार, 02/04/2012 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
दहा दिवस झाले वास्तवात या गोष्टीला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू व्हायचा होता. पण त्याची हवा तयार होत गेली होती. या आंदोलनाचा, खरं तर आंदोलनामागील मागणीमागील विचाराचा, विरोधक हीच माझी त्या वर्तुळात प्रतिमा होती आणि आहेही. स्वाभाविकच ते सारे एका बाजूला आणि मी एका बाजूला अशी चर्चा सुरू होती. चर्चा नव्हे, किंचित वादच. समोर एक वकील होते, त्यांचे दोघे-तिघे समर्थक, एक प्राध्यापक. भ्रष्टाचाराची कीड वगैरे शब्दप्रयोगांपलीकडे सारा विषय. त्यामुळे मुळात जनलोकपालाची गरज कशी आहे, त्यासाठी कायदा कसा झाला पाहिजे हे ते मला पटवून देत होते. म्हणजे, माझं मतपरिवर्तन करण्यासाठी नाही.

राम जन्मला गं सखे,राम जन्मला ।

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 01/04/2012 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
तर श्रोतेहो,आज जी राम-जन्म कथा परिचित करवुन देतोय,ती आहे एका वेगळ्या राम जन्माची... पिंपरी/चिंचवड महानगरपालिकेच्या इमारती मागिल P.M.T म्हणजेच परफेक्ट मशिन टूल्स कंपनीमधे हा रामजन्माचा कार्यक्रम(सोहळा नव्हे हो...!सोहळे रामाच्या नावा-वर निघालेली मंडळं करतात,भक्त नव्हे..!) गेली चाळीसएक वर्ष हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे,त्याची...! ऐकुन तंसं फारसं काही विशेष वाटणार नाही,हो ना..? ''एखाद्या कंपनीत वर्षानुवर्ष एखादी पुजा होते काय..? आणी तीचं खास लिहावं,असं विशेष ते काय..?'' असा प्रश्न माझ्याही मनात आलावता खरा.

तू घे विसावा जरा........!

लेखक रसप यांनी रविवार, 01/04/2012 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
होते रोज सुरू पहाटसमयी गर्दी इथे धावती सारे शांतपणे कसे समजुनी वेगास त्या पाळती ? कंटाळा करती कधी न बसती काट्यासवे चालती पाहूनी तुज वाटले गजब ना ही मुंबईची गती ? जागेला धरण्यास लोकलमधे घेती उड्या धावुनी हॉटेलात कधी पहा बसुनिया खाती भुका मारुनी जो-तो येउन हो अधीर बनुनी होतो उभा मागुनी घाई ही कसली असे?
काव्यरस

सूडाची ठिणगी - उत्तरार्ध

लेखक योगप्रभू यांनी रविवार, 01/04/2012 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
सम्राज्ञी गांधारीदेवींच्या भेटीला जाताना आपल्या मनातील योजना संशय येऊ न देता कशी मांडायची, यावर भानुमतीने बारकाईने विचार करुन ठेवला होता. राजमाता कुंतीदेवी आणि पांडव स्त्रियांनी आपला अपमान केला, हे गांधारीदेवींना सांगून चालणार नव्हते. तसं सांगितलं असतं तर उलट 'बरी जिरली सुनेची' म्हणून थेरडी मनातून सुखावली असती. त्यातून पांडवस्त्रियांचे एकवेळ ठीक, पण कुंतीदेवींबद्दल उलटसुलट सांगून चालणार नव्हते. सुनांवर दबाव ठेवण्यात या म्हातार्‍या नेहमीच एकमेकींच्या मैत्रिणी असतात.

एप्रिल फूल -

लेखक विदेश यांनी शनिवार, 31/03/2012 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही पान नाही, पाकळी नाही, देठही नाही - अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना ; फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते - एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते, मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते !

( प्रवास विडंबनाचा....)..

लेखक रामजोशी यांनी शनिवार, 31/03/2012 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
लिहिण्याची लय उसवली असं जाणवताच बोटे सरसावतात विडंबन करायला काही येणारच आडवे त्यांच्या शिवाय मजा ती कसली अपरिहार्य लेखनातील लोणची खायचीच जणू बिघडतेच तेही लेखक मात्र तसाच अखंडित त्याच प्रतिचा येणार जळके शब्दटणकार धनुष्यी कवितेस विडंबनाची भेट घडवून आणण्याची सर्कस आणि झिम्मा फक्त त्याचाच फसवल दोस्तांनी ना की मग सहज जमत अतृप्त रहायला
काव्यरस