Skip to main content

" माझी माय .......!!"

लेखक जेनी... यांनी शनिवार, 07/04/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
काय कमावलं अन काय गमावलं ,ह्या एकाच प्रश्नाच उत्तर माणूस शेवट पर्यंत शोधत शोधतच वाट चालत रहातो .काही वळणावर थांबतो विसावा घेतो अन पुन्हा चालू लागतो .बस फक्त चालताना कुणाच्यातरी मायेचा हात ,कुणाच्यातरी प्रेमाची साथ एवढ मात्र कायम सोबत राहावं अशी अपेक्षा न चुकता करतो .माझ्याही पाठीवर असाच एक हात ,अशीच एक साथ , माझ सर्वस्व ,माझी माय .. अजून आठवतो ,बाबा गेले तो दिवस .मला जास्त कळत नव्हत पण माईच्या डोळ्यातन वाहणारे दुखाचे लोट , वाफाळणारे अश्रू माझ्या गालावरण खाली वाहत होते .माईला घट्ट मिठी मारून बसलो होतो मी कारण माई सारखी बाबांच्या छातीवर जोरजोरात मारत होती .मला जाम भीती वाटली तेव्हा .माईच्या

विमान प्रवास सुचना आणि (अनाहुत) सल्ले...

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 07/04/2012 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ३/४ दिवसांपुर्वी श्री.मन ह्यांनी "विमान प्रवास कसा करावा?" ह्या बाबत काही सुचना आणि सल्ले मागितले होते...असे सल्ले देण्यात मराठी माणुस नेहमीच पुढाकार घेतो, आणि मी पण त्याला अपवाद नाही...त्यांनी हे सल्ले सगळ्यांना सांगा अशी एक प्रती-सुचना केली आणि आपण पण एक १००% मराठी आहोत असे सिध्ध केले.. विमान प्रवास सुचना आणि सल्ले...वाचुन सोडुन द्या....फारच मुल्यवान वगैरे वाटल्या तर जपुन ठेवा... अ.) बैठक राखुन ठेवा.....आज-काल बैठक आधीच राखुन ठेवता येते...शक्यतो खिडकीची बैठक घ्या....(खुलासा पुढे आहे...चिंता नसावी...अगदीच घाई असेल तर (हा) कडे वळा..)... ब.) शक्यतो कानात बोळे घाला आणि फक्त १ तास ल

डॉ. संजय ओक

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 07/04/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज ७ एप्रिल २०१२. जागतिक आरोग्यदिन. ह्या दिवशी आयुर्विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्यनिगा ह्यांबाबतच्या आपल्या धोरणांची चर्चा होणे क्रमप्राप्तच आहे. आपली अशी धोरणे कोण निश्चित करते? कोण राबवते? ह्याबाबत आपली माहिती कायमच कमी असते. धोरणे निर्धारित करणारे अपात्र आहेत की राबवणारे, त्यांचे प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच कोण स्वाहा करत आहेत, ह्याविषयी आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपल्यांत वाखाणण्यासारखे लोक कोण आहेत ह्याचा सगळ्यांनीच शोध घ्यायला हवा.

काळ कोठडी (भाग -२)

लेखक हर्षद आनंदी यांनी शुक्रवार, 06/04/2012 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग अजून राहुलला जगायचे होते.. वर्षानुवर्षे जगायचे होते.. नियती पुढचा खेळ मांडत होती, साऱ्या सोंगट्या आत्ता जवळ येत होत्या..... "बेटी, बहोत दर्द है क्या जीवन में ..मुक्ती चाहिये?".. अनाहूत प्रश्नांनी उषा भानावर आली. विचार करता करता त्या रस्त्यावरच्या बाकड्यावर तिचा डोळा लागला होता.तिचीच तिला लाज वाटली. पदर सावरून घेत तिने समोर पहिले. तिची धांदल पाहून तो म्हातारा गालातल्या गालात हसत होता. ती फणकारयाने म्हणाली.. "आप की कुछ तकलीफ, अपना रस्ता नापो, चलो बडे आये मुक्ती देणे वाले" .. आणि निघणार तोच म्हाताऱ्याने तिचा हात पकडला..

मारवा !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 06/04/2012 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर, आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सीडीवर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी. मन हळवं झालं होतं.

असीर

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 06/04/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद, वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला। -'जलाल' लखनवी एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही.

उगाच काहीतरी...

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 06/04/2012 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
उगाच काहीतरी... प्रश्नांची जेव्हा उत्तरे मिळाली तेव्हा प्रश्नच जवळचे वाटले गर्दीमध्ये वावरताना एकटेपण आपुलकीने भेटले नात्यांना जपता जपता अपेक्षांच्या जाळ्यात गुंतत गेलो मग स्वप्नांच्या बाजारात मात्र स्वतःला विकून बसलो भिजण्याच्या भीतीने आडोश्याला लपून बसलो मग पाउस पाहताना मात्र आतून कोरडा पडलो कधीतरी वाटत कि आपल्यासाठीही कधी मोगरा फुलवा आपल्या आठवणींनी कोणाच्या डोळ्याचा काठ ओलावा सगळ्यांसमोर हसून मी स्वतःला रोज फसवतो घरी आल्यावर मात्र आठवणींच्या कुशीत विसावतो तुझ्या आठवणी अजूनही डोळ्यात दाटून येतात... पावसासारख्या पडून मग रोम रोम भिजूवून जातात... गर्दीत कसाबसा लपतो मी स्वतःपासून प
काव्यरस

(( आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला)) जा मना तू दिल्या गावी तू सुखी रहा

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/04/2012 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
जा दिल्या घरी तू सुखी रहाच्या चालीवर..... मुळा मुठा या डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा. वटवट ही तुझी आठवता बाळा तरूणपण आले खाता चिकन मसाला आठवले पराठे सारे, गहिवरले आत्मेऽऽऽ कढ कढीचे तुला सांगती जा... दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा.... दारात उभी राहिली तुझी बुलेट दुचाकी ती. बघ डोळे मित्रांचेऽऽऽ तुझ्याच जाण्यावरती.. पुस रे डोळे या फडक्याने लपव ही गाडी गाडी येथे तू मला ठेऊनी जाऽऽऽऽऽ..... दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा.... साहेब तू रे आयटी हमालांचा मानाचा हसतील ती पंजाबी, बंगाली जाटेऽऽऽऽऽ. बघू नकोस मागे मागे वेड्या बघ पुढे ऽ नकोस विसरू परी खादाडीला जा...ऽऽऽऽ. मुळा मुठा ड

ए सुमनांचे राणी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 06/04/2012 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
ए सुमनांचे राणी, बहर स्वामिनी तू तुझे स्मितहास्य, कहर जाहले न मन शुद्धीवर अन्, नसे शुद्धीवर मी कटाक्षांचे मिलन, कहर जाहले तुझे ओठ की, पद्म कोमल गुलाबी ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू की त्या पाकळ्यांनी, तव स्नेहार्द्र गूज मला ऐकविणे, कहर जाहले कधी मुक्त मिलन, कधी संकोचणे ते कधी चालतांना, बिथरणे, उसळणे हे भुवयांची महिरप, चढवून उतरणे उतरून चढविणे, कहर जाहले ही थंडी हवेतील, वयातील ही रात्र तुझ्या कुंतलांची, कृपा केवढी ही ही प्रत्येक बट जणू, शत गंधकोशी तुझे धुंद होणे, कहर जाहले ह्या गाण्यातली बहार अनुभवलेल्यांना गीतकार ओळखता यावा नाही का!
काव्यरस