मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा दूर गेली फूल पाने एकटा मी हा असा जन्मता मी खूष झाले का बरे गणगोतही जीव होता पुरुष माझा नवस जन्माचा तसा देवही ना जाणतो तो मुकुटचोरी जाहली मी सदा डोकावतो झोळीत माझ्या का असा मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला राव असता मान होता आदबीचा या बसा

वाचने 1504 वाचनखूण प्रतिक्रिया 2

अत्रुप्त आत्मा 23/11/2011 - 01:15
विदेशराव झ्याक जमलय बर का...प्रत्येक शेरागणीक भाऊसाहेबांची अठवण येत ह्रायली हो राव... @-मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा.... फिदा झालो राव...येकदम मस्त मस्त मस्त...

मिसळलेला काव्यप्रेमी 23/11/2011 - 10:54
मस्त, आवडली.खुप आवडली.