Skip to main content

कोण होती ती.... (२)

लेखक फिझा यांनी बुधवार, 23/11/2011 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
कोण होती ती.... (२) सांज जवळ आली होती.. आता तिची सावली पण थकली होती .. काय हवे होते तिला ... जाऊन विचारावे का ...धीर होत नव्हता पण ती तिथेच उभी होती....तशीच ..... आता ढग गच्च गच्च भरले होते पापणी लावतेच तोच बरसतील रप रप चालू झाली लगेच मी छत्री उगडली नि रस्त्याच्या कडेला थांबलो न भिजता सुरक्षित स्थळी पोचलो... .... ती ? ..... ती तिथेच उभी होती....तशीच ..... ढग कडाडून उतरू लागले आणि मनात विचारांचे काहूर उठले तशातच मी गाडी काढली आणि निघालो घराच्या दिशेने .... पण ती तिथेच उभी होती....तशीच .....
लेखनविषय:

वाचने 836
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया