Skip to main content

तुझ्या प्रेमात सजणा

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 04/04/2012 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ असूनही तुझ्यापासून मी खूप दूर आहे राहवत ना मुळी म्हणून ऐकवते हा सल आहे तुझ्या प्रेमात सजणा, झाले मन हे किती बेज़ार कोणी पाहो वा ना पाहो ईश्वर पाहतो आहे अंतरी तुझी मूर्ती स्थापित, झाली जेव्हापासून आहे शप्पथ एकही रात्र न मला, झोप लागली फार आहे हवा हवासा दर्द आहे, निश्वासही माझा सर्द आहे, चेहराही माझा जर्द आहे, न कळे कुठला रंग रंगवे तुझी पाहणे वाट तूच माझा जीव आहेस, तू ची आहेस प्राणही मला मिळावास तू, हीच मनात एकची आसही संगतीस तू साथ हो, काही मना-मनाची बात हो, गुजगोष्टी दिलखुलास हो, गाणीही गावी प्रेमाची छेडावी मनची तार ओवाळीन मी जीव तुझ्यावर, भग्न हृदय हे सांध तू नजरांमधला दूर दुरावा नजर
काव्यरस

प्रार्थना

लेखक पेशवा यांनी बुधवार, 04/04/2012 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रार्थनेचे हात जुने होत नाहीत, विटत नाहीत, विरत नाहीत धोकादायक वस्तूंची विल्हेवाट कशी लावतात? चंद्र उगवलेल्या रात्रीत मल्हार ऐकताना पाऊस बनून कोसळावेसे वाटते आहे माझी म्हणावी अशी जमीन उरलेली नाही माझे म्हणावे असे आकाश उरलेले नाही वीजा, ढग, सोसाट्याचा वारा ह्यांचा वरखर्च... रकाने मारलेल्या मन-देहाला झंकारणे झेपणार की नाही?
काव्यरस

वारणम आयीराम

लेखक अँग्री बर्ड यांनी बुधवार, 04/04/2012 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
first
तेलगु पिक्चर बघायची हौस दांडगी आहे, शक्यतो जो येईल तो बघितला असे मी करत नाही, कारण त्यातून काहीतरी चांगले निघेल ह्याची वाट बघत धीरोदत्तपणे चित्रपट पाहण्याएवढे patience माझ्याकडे मुळीच नाहीत.

मराठीभाषेचे सरलीकरण का दुर्बलीकरण

लेखक अमोल सहस्रबुद्धे यांनी मंगळवार, 03/04/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी वाचनात आले की आपल्या मायबाप सरकारनी शैक्षणिक धोरणांतर्गत असा नियम केला आहे की मराठी लिहितांना -हस्व दीर्घ म्हणजे फक्त पहिले अक्षर -हस्व त्यापुढील अक्षर दीर्घ करावे म्हणजे शुध्द आहे असे मानावे. उदा.. सूचना असे न लिहिता सुचना असे लिहिले तरी शुध्द आहे असे गृहीत धरावे . साधारणपणे मराठी लेखन हे उच्चारानुसार लिहिले तरी बरोबर होते त्यात आंग्ल लिपिसारखे शब्द पाठ करावे लागत नाही तरी हा नियम का?

अष्टभूजा...की....अष्टावधानी की....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 03/04/2012 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक वर्ष झाले आणि आम्हाला घरी जायची ओढ लागली..कंपनीत रीतसर अर्ज केला आणि तिकीटाची वाट बघत बसलो... घरी तशी कल्पना दिली आणि घात झाला.. दुसऱ्या दिवसापासून बायकोने सामानाची यादी द्यायला सुरुवात केली...ह्या वेळी सुका-मेव्या शिवाय इतरही यादी खूप होती...मी पण खूपच चिडलो आणि बायकोसाठी काहीच खरेदी करायची नाही असे ठरवले... एक दिवस रजेचा अर्ज मंजूर झाला आणि मी विनंती केल्याप्रमाणे दुबई थांबा असलेले तिकीट पण मिळाले... चला आता पूर्ण १ महिना फक्त आराम...

किल्ले पुरंदर

लेखक मनराव यांनी मंगळवार, 03/04/2012 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही दोघांनी नवीन गाडी घेऊन महिना झाला होता पण अजून बाहेर हिंडायला गेलो नव्हतो, म्हणून गेल्या शनिवारी तुषारला फोन केला मी: काय रे काय करतोयस ? तुषार: काही नाही रे !!! आराम चालू आहे. मी: चल मग उद्या कुठे तरी लांब भटकून येऊ. पालीला जाऊन येऊ. तुषार: थांब जरा, तुला संध्याकाळी फोन करून सांगतो. मी: ठीके !!! आमच्या आळशी गड्याने (तुषार) संध्याकाळी फोन तर केला पण म्हणाला पाली नको, जवळच्या जवळ नारायणपूरला जाऊन येऊ. मी म्हणालो ठीके हे नाही तर ते.

दुबाई....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी मंगळवार, 03/04/2012 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच दुबाई शहरास भेट दिली होती. तेंव्हा बुर्ज खलीफा (खलीफा टॉवर ऑफ दुबाई) आणि परीसराची तसेच बुर्ज खलीफावरून दुबाई शहराची काही छायाचित्रे घेतली होती. बुर्ज खलीफा हे एक आकाशाच्या दिशेने वसवलेले 'शहर' आहे. इंग्रजीत ज्याला 'व्हर्टीकल सीटी' असे नांव आहे. ह्यात राहायला घरे, दुकाने, कचेर्‍या, व्यायामशाळा, खेळाची मैदाने, चित्रपटगृहे इ.इ. आहेत. वेळ रात्री १०.३० ची आहे.

रोजच उशीर होतो!

लेखक रसप यांनी मंगळवार, 03/04/2012 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
किरकिर किरकिर गजर वाजतो भल्या पहाटे 'पिडतो' 'स्नूझ' करुन मी परत झोपतो रोजच उशीर होतो..! खडबडून मग उठतो आणिक किती धावपळ करतो नाश्ता सोडुन देतो कारण रोजच उशीर होतो.. कापुन घेतो हनुवटीस मी पटपट दाढी करतो पाणी ओतुन बदाबदा मी 'बुडबुड गंगे' म्हणतो! इस्त्री करतो शर्टाला अन तशीच पँट चढवतो सॉक्स घालतो पुन्हा कालचे, रोजच उशीर होतो ! खिश्यात केवळ चिल्लर असून रिक्शाला थांबवतो पुन्हा पुन्हा मी घड्याळ बघतो अन सुस्कारे देतो कसाबसा तो चुकवून ट्रॅफिक स्टेशनला पोचतो रुपया-रुपया मोजुन देता रोजच उशीर होतो तोबा गर्दी भरलेली, मी पुन्हा पुन्हा चेंगरतो गाडी माझी निघून जाते हताश मीही बघतो लगडुन येते पुढची गाडी मी