भ्रमणकक्षा.
लाल मुंडासे घातलेल्या धनगराच्या पोराने आपली मेंढरे पुढे काढण्यासाठी हाळी घालावी तसे त्या कंडक्टरने ८ जानेवारी १९८० रोजी त्या बसमधील मेंढरांना हाळी दिली “ चला स्वारगेट्ला उतरणार्यांना पुढे येऊ देत. चला ! लवकर !
टिंग टिंग आवाज झाला आणि बस थांबल्यावर अनेक मेंढराच्या मागे अजित प्रधान अलगद त्या बसमधून जमिनीवर आला. शांतपणे त्याने रिक्षाच्या दिशेने पावले टाकली. त्याच्या दररोजच्या दैनंदिन जीवनाच्या शब्दकोशात “कदाचित” हा शब्दच नव्हता असे म्हणायला हरकत नाही. कदाचित असे होईल, कदाचित तसे होईल, कदाचित रिक्षा मिळणार नाही, कदाचित मिळेल असे अनिश्चित त्याच्या आयुष्यात काही राहिलेले नव्हते.
मिसळपाव

६ मार्च २०१२, सकाळी आठच्या सुमारास आम्ही कल्याणला, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसमध्ये, एस-४ डब्यात आपल्या आरक्षित बैठकांवर स्थानापन्न झालो. गाडी सुटली. कामाचा दिवस आणि उलटी दिशा, ह्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. कशाला उगाच आरक्षणाचा खर्च केला, त्यासाठी उगाचच जिवाचा आटापिटा केला असे वाटायला लागले. नेहमी शनिवार-रविवार-सुट्टीचे पुण्याला जाणारे आम्ही.