भयाची सुरवात झाली
ग्रिष्माच्या शुक्ल पक्षात....
थांबली दाराशी रुग्नवाहिका
दिव्याचि निळ्या अल्पतात,
चार पाऊंड घेउन अधिकचे
उतरली विव्हळंत माय माझी....
सुखद, दुखद, वेदनेचि ति बळी,
सोबतीला गनगोत माझे फक्त
सुखद वेदनेचेच सोबती...
निघाले सारे प्रसुतीग्रुहाकडे
तयारी जन्माची, मरणाची..
लागला दिवा लाल
बंद दारावर...
स्मशान शांतता..
चालले आत, काही केल्या कळेना
वेदनेच्या आंर्त हाकि काही केल्या उमजेना
टवकारले काने ,सारीच
रडण्याच्या त्या मंगल वाटेवर
पण, आज अगा घडले असे नवलंच
नि मी जन्मलो हसत,हसतच...
ऐकता आवाज ,भांबवले सारेच
माय वेदनोत्तर झाली शांत,
बाप झाला घामाघूम...