Skip to main content

सिमोल्लंघनी ट्रेक

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 31/03/2012 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदर्शनचे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर, विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव २१ मार्च रोजी प्रतिनिधी, मुंबई सुचेता मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीतर्फे दरवर्षी देण्यात येणारे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा पुरस्कार बुधवार, २१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता दूरदर्शन केंद्राच्या वरळी येथील प्रांगणात आयोजित केला आहे.

विडंबन करुक अक्खो दिवस जाय...

लेखक निश यांनी शनिवार, 31/03/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन करुक पडत्याती कष्ट, दुसर्‍यांच्या जीवावर बांडगुळा होती धष्टपुष्ट. विडंबन करुन थकुन जाय चांगली कविता ह्यांच्या डोक्यावरुन जाय. ह्यांका घरात नसा मान विडंबना करुन नवकवीक म्हणतत, ह्यांची कविता असता घाण. घरचो राग कवितेत काढतत नवकवींच्या जीवावर आपलो धंदो चालवतत. चोरलेल्या कोंबड्या अन उधारीचो मसालो म्हणुन ह्यांच्या कवितेत असता टमरेल चाळो. जाउन जाउन हे लोका जाती खय स्वताक झाकायचा सोडुन दुसर्‍यांक उघडो बघुची सवय. ऑफीसातला काम ह्यांका येणा नाय एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय. एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय

डॉ. आनन्दीबाई गोपाळराव जोशी

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 31/03/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज ३१ मार्च्.. ह्याच दिवशी १८६५ रोजी ह्यान्चा जन्म झाला.. ज्या वेळी स्त्रियान्ना परदेशी एकट्याने, प्रवास करणे तर सोडाच, पण शिकायला पण बन्दी होती...त्या काळात एक स्त्री फक्त शिकतच नाही तर अजुन पुढे शिकायला म्हणुन थेट एकटी अमेरिकेत जाते काय आणि इथल्या स्त्रियान्चे भले व्हावे, त्याना योग्य ते औषधोपचार वेळेवर मिळावेत म्हणुन प्रसुती शास्त्राची डॉ.

प्रवास जीवनाचा...!

लेखक वेणू यांनी शनिवार, 31/03/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्याची लय गवसली, असं जाणवताच सर्वांग सरसावतं ठेका धरायला.... 'पण-परंतू' येणारच आडवे.....! खाच-खळग्यांशिवाय मजा ती कसली? अपरिहार्य प्रवासातलं- ठेचकाळणं, बांधीलच जणू! बिघडतोच ठेकाही! प्रवास मात्र, तसाच अखंडित.. त्याच्याच गतीचा...!! येणार खळगे, विस्कटणार सूरही.. तालास लयीची भेट घडवून आणण्याची कसरत आणि जिम्मा, फक्त आपलाच! जगणं असं स्विकारलं ना की मग सहज जमतं, लयीत ठेचकाळायला.... -बागेश्री (पूर्वप्रकाशित- दीपज्योती दिवाळी अंक २०११ - http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_09.html)

"......आर्जव ....."

लेखक जेनी... यांनी शनिवार, 31/03/2012 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
रागा रागानं घरातून बाहेर पडलेलं त्याच पाऊल मला अस्वस्थ करत होत .

दिवसेंदिवस

लेखक शरद यांनी शनिवार, 31/03/2012 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसेंदिवस अनुराधा पाटील यांचा पहिला कवितासंग्रह "दिगन्त" १९८१ ला प्रसिद्ध झाला. दुसरा "तरीही" ८५ ला व तिसरा "दिवसेंदिवस" ९१ ला. आजच्या तरुण वाचकांना हे नाव कदाचित माहीतही नसेल पण २५-३० वर्षांपूर्वी समीक्षकांनी, लेखकांनी व कवींनी, हो, कवींनीही, त्यांच्या कवितेचे पोट भरभरून कौतुक केले होते. आज माझ्यासमोर आहे "दिवसेंदिवस". कविता वाचतांना आठवण येते पावसाळ्यात ढग दाटून आलेल्या संध्याकाळातील विषण्णतेची. अशा वेळी तुम्ही एकटे असतांना आठवणी जागृत होतात त्या बहुदा आल्हादकारक नसतातच. आणि त्यात तुमचा स्वभाव अंतर्मुख असेल तर जखमा भळाभळा वाहू लागतात.

(कुठून येते प्रेरणा आणि अशी का विडंबने पडतात)

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 31/03/2012 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मी गेले १५ दिवसा पुण्याबाहेर रहात आहे. पुण्यातल्या नोकरीची शस्त्रक्रिया झाली म्हणून पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चेन्नैत येऊन राहिलो. वेळ मिपावर काही काळ येऊन विरंगुळा शोधण्याची होती. मिपावरती कवितांच्या विडंबनांच्या जिलब्या वाचून मन चलबिचल व्हायचे. मिपावर रोज १-२ नवकवी अतृप्त आत्म्याच्या विडंबनाच्या धडकेने/चित्र विचीत्र स्मायल्यांनी खिन्न होत आहेत. कुठे इथे नवकवींना साधी कौतुकाची थापही मिळत नाही. पण इकडे अतृप्त आत्म्याकडे खूप प्रेरणा आहे.

ए माझे संजीवनी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 30/03/2012 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा ते कटाक्ष, ती चपळाई अन् जी तुझ्यात असे, नसे कुठे ती कला मनास मोहवी जी तुझ्यात असे, नसे कुठे मी तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात पावलो सर्व जगा तू मधुर जे बोल बोलशी हसून जराही सुंदरी तर अजूनही स्पंदने नशेत धुंद रंगती ए परी, ए परी, मी तुझा कायमच ग खुळा वक्त चित्रपटात बलराज सहानी असा दावा करतात की वय झाले तर काय झाले, अजूनही सारे कसे शाबूत आहे. तसेच. पूर्वीसारखे. शब्द पुरवले आहेत साहिर लुधियानवी ह्यांनी. अर्थातच हे गीत माझे नाही. हा आविष्कार मात्र माझाच आहे.
काव्यरस