आज चॅनेल सर्फिंग करता करता एक धक्कादायक अनुभव आला. मिपावाचकांना याविषयी सांगणे आवश्यक वाटले, किंबहुना सर्वांच्या नजरेस आणून द्यावेसे वाटले म्हणून...........
कलर्स चॅनेलवर "वीर शिवाजी" नावाची एक मालिका चालू आहे.रोज ८.३० ते ९.०० सायंकाळी.
महाराजांच्या बद्दल आजपर्यंत कधीही वाचण्यात / ऐकण्यात न आलेल्या अशा अतर्क्य घटना त्यात दाखविल्या आहेत.
माझ्या मते शिवचरित्राला अक्षरशः विटंबित करण्यात आले आहे. या चॅनेल द्वारे ही मालिका जगभरात प्रसारित होत असणार...
उदाहरणादाखल : (१) मियां रहीम नावाच्या कुठल्याश्या खानाच्या गोटातील एक बाई शिवाजी राजांना मारायचा कट करते आहे. महाराज दिवाळी साजरी करीत असताना ही त्यांच्या आसनाखाली टोपली भरून फटाके ठेवते, म्हणजे इतर कोणी फटाके लावले की त्या टोपलीचा मोठा स्फोट होईल....आणि फटाक्याच्या दारूची लाईन तिथपासून समोर लावल्या जाणार्या अनार पर्यंत असते (म्हणजे एखाद्या सिनेमात पेट्रोल काडी टाकून पेटवतात आनि त्याची लाईन जळत जाऊन पुढची गाडी वा घर जळते ...तसे टेक्निक !). हा खानही तिथे पाहुणा म्हणून आलेला असतो. मग एकदा राजे, तर एकदा खान त्या आसनवर बसतात .. नेमके स्फोटाच्या वेळी कोण बसलेले असणार्...हा टिपिकल क्लायमॅक्स्...शेवटी खान बसलेला असताना ती दारू पेटत जाते...आणि तीच बाई घागरभर पाणी ओतून पुढचा अनर्थ टाळते. (आणि महाराजांची शाबासकी मिळवते)
(२) हीच बाई सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई वगैरेंमधे अनेक गैरसमज - भांडणेही लावत असते (सास बहू स्टाईल)
(३) जिजाबाईंची व्यक्तिरेखासुद्धा सास बहू स्टाईल आहे. त्या आपल्या सुनांना "करम जली" वगैरे म्हणताना दाखवल्या आहेत.
(४) शिवाजी अजून "बाल शिवाजी" आहे ... पण जिजाऊ एकदम वयस्कर आहेत...
मी आजपर्यंत दोनच भाग पाहिले. एका क्षणाचाही आपण सर्वांना माहीत असलेल्या शिवचरित्राशी ताळमेळ लागत नाही. अत्यंत "डिस्टॉर्टेड" असे सारे काही दाखवले आहे.....पुढचा भाग पहायची इच्छा आणि धाडसही झाले नाही.
अशा मालिकांना मान्यता कशी काय मिळू शकते ? आपल्या सर्वांना मिळून काही करता येईल काय ?
वाचने
6660
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉलींग "आम्हाघरीधन"...
ह्या मालिकेत अत्यंत अतर्क्य
ह्या मालिकेत अत्यंत अतर्क्य
In reply to ह्या मालिकेत अत्यंत अतर्क्य by विश्वनाथ मेहेंदळे
अशा प्रकारे इथेच लिहिण्याच्या
In reply to ह्या मालिकेत अत्यंत अतर्क्य by मृगनयनी
इथेच म्हणजे याच धाग्यावर हो.
In reply to अशा प्रकारे इथेच लिहिण्याच्या by प्रास
इथेच म्हणजे याच धाग्यावर हो.
In reply to अशा प्रकारे इथेच लिहिण्याच्या by प्रास
सविस्तर प्रतिसादासाठी उठसुठ
In reply to इथेच म्हणजे याच धाग्यावर हो. by विश्वनाथ मेहेंदळे
कलर्स या चॅनेलचे वैशिष्ठ्य
मान्यता
ह्म्म... असे असेल तर हे लगेच
Emotional Atyachaar
In reply to ह्म्म... असे असेल तर हे लगेच by मदनबाण
आम्हा अल्पसंख्य व अल्पबळ
In reply to Emotional Atyachaar by मन१
हो.
In reply to आम्हा अल्पसंख्य व अल्पबळ by llपुण्याचे पेशवेll
हम्म
अगदी सहमत! अनेक प्रसंग असे
बनवणार्यांची
या मालिकेचे प्रोमोज पाहिलेत
अनुमान क्र. १ वरून असं
In reply to या मालिकेचे प्रोमोज पाहिलेत by मस्त कलंदर
आनंद आहे!
माजघरी कावे हा हा हा....
In reply to आनंद आहे! by धमाल मुलगा
हि सिरीयल अभिमन्यू सिंगची आहे
In reply to आनंद आहे! by धमाल मुलगा
तिथेही आनंद आहे
In reply to आनंद आहे! by धमाल मुलगा
चॅनल, कार्यक्रम आणि आवड
मालिका आणि इतिहास
असहमत. इमॅजिनवर दाखवली जाणारी
In reply to मालिका आणि इतिहास by मी_ओंकार
या मालिकेनं एक गोष्ट सिद्ध
पर्या कुठे आहेस रे? इतिहास
In reply to या मालिकेनं एक गोष्ट सिद्ध by रेवती
कोण पुप्या का ?
In reply to पर्या कुठे आहेस रे? इतिहास by llपुण्याचे पेशवेll