Skip to main content

'छूकर मेरे मन को'

लेखक हर्षद खुस्पे यांनी शनिवार, 18/05/2013 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मला 'छूकर मेरे मन को' या गाण्याबद्द्ल ऐकले की हे गाणे (कविता) रविंन्द्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे या गाण्याची गोष्ट मोठी रंजक आहे. रविंन्द्रनाथ टागोर दररोज सकाळी फ़िरायला जात असत तेव्हा एक वेडसर दिसणारा माणुस येउन त्यांच्या छातीला हात लावुन म्हणत असे " काही तरी आहे इथे" आणि निघुन जात असे। असा क्रम बरेच दिवस चाले.

समीर.प्रिया.तेजस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 18/05/2013 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
समीर हा जानकिबा‌ई व रामभा‌ऊ जोश्यांचा एकुलता एक लेक. घरची परिस्थिती बेताची.. रामभा‌ऊ औरंगाबाद मध्ये नगर पालिकेत लिपिक होते. वडलोपार्जित २ खोल्यांत संसार थाटलेला ..समीर एकुलता एक मुलगा पण समीर खूप हुशार व बुद्धिमान होता १२ वीला टॉपर लिस्ट मध्ये आला अन पुण्याच्या ईंजीनीरिंग च्या कॉलेज मधे त्याला प्रवेश मिळाला... खरं तर कॉलेज चा खर्च राम भा‌ऊंना तसा जडच होता पण त्यांनी तो पार पाडला. समीर ने पण अभ्यास करून खर्चाचे चीज केले ..व अव्वल दर्ज्यात पास झाला अन एका मल्टी नॅशनल आय टी कंपनीत त्याला नोकरी लागली .. अन सुखाचे दिवस आले भरपूर पगार..

अंकानाम वामतो गति:

लेखक शरद यांनी शनिवार, 18/05/2013 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
अंकानाम वामतो गति: " उर्दू-फारसी-अरबी ." या धाग्यावर लिहीतांना श्री. बॅटमन लिहीतात "अक्षरन अक्षर उजवीकडून डावीकडे लावत जायचे. आता यात अजून एक मजा अशी, की उर्दू-फारशी-अरबी लिहीतांना आकडे मात्र डावीकडून उजवीकडे लिहतात...भारतीय पद्धत ढापल्यामुळे श्री. इस्पिकचा एक्का ... हा एक मोठा पुरावा असे म्हणतात व त्यावर परत श्री. बॅटमन +११११११११११११११ असा मोठा पाठिंबा देतात. आता खरी गम्मत पहा. प्राचीन भारतात आकडे उजवीकडून डावीकडे लिहीत, आज आपण लिहिते त्याच्या बरोबर उलटे. षड् द्विक पंच् द्वि असे लिहले तर त्याचा अर्थ २५२६ . अंकानाम वामनो गती हा नियम. प्राचीन संस्कृतात हीच पद्धत वापरेली आपणास आढळेल.

<नौर्‍याची व्य्था!!>

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 18/05/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
खालिल कविता पूजाबै हीस सप्रेम अर्पण ************************************************* ती माऊली आली होती मझाकडे आज एकदम खुशित, हिने तिचे एकदम हसत स्वागत केले. हि तिला म्हनाली " सासुबै ,मि काहिहि करेन तुमाला हसत पाहन्यासाटि, तुमी फक्त एकदा हो म्हना हो " तिनेही हसत उत्तर दिले " हो गं सुनबै, तुझ्या घोडचुका मि पाण्याच्या घोटासकट गिळल्यात गं, काय करणार , माझ्या लेकाला तुझि गरज आहे गं " (मनातः त्यानं झक मारली आणि तुझ्याशी पाट लावला नं!!) आनि तिच्या कुशित ही विरुन गेली आता ही सुन राहिली नवती ,ती सासु राहिली नवती , (असं हिला आपलं उगीचच वाटलं!!!) लगेचच मग हिने चिकन बिर्यानीची ऑर्डर सांगितली

अमानवीय- मला पडलेले काही प्रश्न?

लेखक चिखल्या यांनी शुक्रवार, 17/05/2013 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या काही दिवसात भरपुर भुतं स्वप्नात आली आणि आमच्यावर संशोधन करा, लेख पाडा असं म्हणु लागली, अर्थात तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही याचा मला विश्वास आहेच. पण जौद्या आता भुतच मानगुटीवर बसल्यावर लेख तर लिहावाच लागणार आणि पाडायचं मी तुमच्यावर सोडुन देतो. कसं? नक्की कुठली व्यक्ती कोणते भुत होणार हे कसं ठरवलं जातं? पिशाच्च, देवचार, भुत, हडळ, डाकीण हे वर्गीकरण नक्की कोणत्या आधारावर होते? नक्की कोणत्या बायका हडळ होतात? म्ह्ण्जे हडळ व्हायचं काय क्वालिफिकेशन असावं?

चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-१

लेखक लाल टोपी यांनी शुक्रवार, 17/05/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
१९७६ मध्ये अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्राने एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली. अंतराळात पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखे मनुष्य घेऊन जाणारे अंतरीक्ष यान बनवण्याची ही कल्पना त्यावेळी फारच नाविन्यपूर्ण होती, नासाने या प्रकल्पाला 'स्पेस शटल' हे नांव दिले होते. अनेकांना ही कल्पना अशक्यप्राय वाटत होती मात्र पांचच वर्षात 'कोलंबिया' या स्पेस शटलने उड्डाण केले ५४ तांस पृथ्वीच्या कक्षेबाहेर भ्रमण करून नियोजित कार्यक्रमानुसार फायर इंजीनाचा वेग कमी करून हळूहळू पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आणि एखाद्या ग्लायडर प्रमाणे नियोजित तळावर सुखरूप उतरले. एक स्वप्नवत प्रवास मानवाच्या आवाक्यात आला होता.

प्रेमाचि व्य्था

लेखक सुदेश यांनी शुक्रवार, 17/05/2013 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
ति आलि होति मझाकडे आज एकदम खुशित, मि हि तिचे एकदम हसत स्वागत केले. मि तिला म्हनालो " सखे मि काहिहि करेन तुला हसत पाहन्यासाटि, तु फक्त एकदा हो म्हन ग" तिने हि हसत उत्तर दिले " हो रे सखा आत मि तुझिच आहे रे , मझा स्वासाला गरज तुझिच आहे रे .." आनि ति माझा मिटित विरुन गेलि , आता मि मि राहिलो नवतो .

गणराया चरणी मंत्र्याचं साकडं

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 17/05/2013 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे गणराया पडतो मी पाया,निवडून येऊ दे...। निवडून येऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥धॄ॥ मी निवडुन आल्यावर । करेन जनतेचा उध्दार । बंगला बांधीन एक सुंदर । तो तुमच्याच पैशावर । दारामध्ये फॉरच्युन गाडी ऊभी राहु दे...। ऊभी राहु दे...मला मंत्री होऊ दे...॥१॥ मग जाईन दिल्लीला । पी.एम्.ला भेटण्याला । मंत्री पद मागण्याला । दिल्या वचना जागण्याला । राजभवनावर मंत्रीपदाची शपथ घेऊ दे...। शपथ घेऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥२॥ मंत्री पद मिळाल्यावरी । करीन परदेशाची वारी । सर्व काँट्रॅक्ट माझ्याच घरी । मलाई एकटाच खाईन सारी । आदर्श घोटाळ्याची मला सवय होऊ दे...। सवय होऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥३॥ भ्रष्टाचाराचा तोड

बालक पालक आणि मी

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 17/05/2013 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
बाप हे दोन प्रकारचे असतात...!! एक बाप तो असतो जो घरी यायची वेळ होताच मुले त्याच्या धाकाने खेळमस्ती दंगागाणी बंद करून अभ्यासाचे पुस्तक उघडून बसतात. तर एक बाप तो असतो जो घरात शिरताक्षणीच त्याची मुले आनंदाने नाचत बागडत येऊन त्याला बिलगतात. शेवटी आपले स्वत:लाच ठरवायचे असते की आपल्याला यातला कोणता बाप बनायचे आहे....!! .............मी एका तत्ववेत्याचा आव आणत, सहा घरची पोरे सांभाळली आहेत अश्या आविर्भावात बायकोला प्रवचन देत होतो. मात्र तिला माझी ही बकबक नाही तर माझ्या तोंडून माझे लहाणपणीचे किस्से ऐकायचे होते. चूक माझीच होती.