सहप्रवासी
अर्धवट झोपेत होतो.
कविच्या आत ...
कवीच्या आत कधी उतरतांना
सहजच दिसेल तुम्हाला आत
ऊन सावलीचा होणारा खेळ
तो मात्र शांत, हे सार बघतांना
धुक्याच्या अवजड भिंती
आपल्या कल्पकतेने तोडून
थेट प्रकाशाकडे झेपावत
दिसेलच तो संवाद साधतांना
मानवी आरश्या समोर राहून उभं
नित्याचंच ते मंद मंद हसणं
दिवा प्रकाशाच्या भित्तीछाया
दिसेल कदाचित त्यांच्याशी बोलतांना
कोणाच्या मुद्द्यांशी लोळण घेत
विचारांच्या पुंजक्यांशी भाडतांना
सळसळणारे जीवनं धमन्यांतून वाहत
दिसेल नावीन्याचा प्रवास करतांना
श्रावण बाळ
तो बसला होता …. हताश ….
विक्रांत वरील आयुष्य ५--पुढे
याचा अगोदरचा भाग http://www.misalpav.com/node/24854
वर झालेल्या अपघाताच्या दुसर्या दिवशी हा तंत्रज्ञ माझ्या दवाखान्यात भरती होता त्याला पाहायला आलेला एक सैनिक मला म्हणाला सर आपला न्हावी आंधळा झाला आहे. मी त्याला विचारले कि हे तुला कोणी सांगितले तर तो म्हणाला कि मी सकाळी केस कापायला गेलो तर न्हाव्याचे दुकान बंद होते. मी आजूबाजूला विचारले तर ते म्हणाले कि त्याला दिसत नाही त्यामुळे त्याने दुकान उघडले नाही.
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ५
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४
क्लोंडायकला जाणारा समुद्रीमार्ग लांब पल्ल्याचा आणि खर्चिक असल्या कारणाने बर्या
चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-३ (अंतीम)
यापूर्वीचे भागः
चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-१
चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-२
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपघातानंतर लगेचच जमिनीवर आणि समुद्रात शोध कार्य हाती घेतले गेले. त्यावेळी ही सर्वात मोठी शोध मोहीम होती मात्र अवकाशातून यानाचे मोठे अवशेष कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन विमाने आणि जहाजांना एक तासापर्यंत रोखून ठेवण्यात आले होते.
शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |
शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ।
"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात,
"देशपरत्वे व धर्मपरत्वे उत्तरक्रियांचे अनेक प्रकार आहेत.मेलेल्या माणसाच्या प्रेताचा चटदिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणालाही म्हणता येत नाही.शवाचा निकाल लावला म्हणजे हे काम आटोपते तर त्याविषयी विशेष चर्चा करण्याची गरज पडती ना.पण या दु:खदायक कामामागे त्याहूनही क्लेशकारक अशा विधींचे दुट्टें प्रत्येक धर्माने लावून दिले आहे.
पाकिस्तान एक प्रगतीशील राष्ट्र
पाकीस्तान -
पाक म्हणजे पवित्र.
पाकीस्तान म्हणजे पवित्र भूमी किंवा पुण्यवंतांचा देश.
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. येथील भारतीय जनता स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढत होती.
पण याच वेळी काही लोक हा विचार करीत होते की केवळ इंग्रजांपासून मुक्ती पुरेशी नाही तर आपल्याला भारतापासूनही स्वातंत्र्य आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला आपली प्रगती साधता येणार नाही आणि मग सुरू झाला प्रयत्न हरतर्हेने.
विशेषतः आजच्या सीमाभागात तत्वासाठी लढणारे योद्धे लढू लागले. ध्येय ठरल्यावर मग त्या दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते. हेच ध्येयनिष्ठ माणसाचे प्रमुख लक्षण आहे.
मिसळपाव