Skip to main content

ओले अंजीर आणि बेळगावी कुंदा...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 28/04/2013 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहजच अण्णांना भेटायला कलाश्रीमध्ये गेलो होतो. बाहेरच्या खोलीत अण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे पानाचा डबा होता.. इब्राहमी तंबाखूवाला.. "काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाण्याहून.." असे जुजबी प्रश्न अण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे वत्सलाताई आल्या. वत्सलाताई जोशी. माहेरच्या वत्सला मुधोळकर. भाग्यश्री या कानडी नाटकांच्या तालमीदरम्यान त्यांचं आणि अण्णांचं जमलं. स्वतः वत्सलाताई चांगल्या गात असत.

एक सिगारेट पिणारी मुलगी

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 28/04/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी.. ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत.. वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच.

याद हमारी मिटा न देना...!

लेखक सस्नेह यांनी रविवार, 28/04/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली ते सातवी सकाळची शाळा असायची. दप्तर सांभाळत शाळेच्या रस्त्यावरून जाताना घरोघरी सिलोन रेडिओवर ‘पुरानी फिल्मोंके गीत’ वाजत असायचे. लतादीदी आशा यांच्या सुरेल गीतांच्या मध्येच एक वेगळाच खडा सूर ठेक्यात कानाची पकड घेई अन नकळत पाय त्या स्वरांच्या तालावर झूम उठत. ..’बूझ मेरा क्या नाव रे नदी किनारे गाव रे.. पिपल झुमे मोरे आंगना ठंडी ठंडी छाव रे ...’ ..सुरुवाती-सुरुवातीला बाई गातेय का पुरुष असा प्रश्न पडायचा.

पोटॅटो स्ट्यू अँड रोटी जाला

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 28/04/2013 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
ही पाककृती मास्टरशेफ इंडिया किचन के सूपरस्टार्स मध्ये पाहीली आणी बनवून बघीतल्याशिवाय राहवले नाही :) सिंगापूर , मलेशियाची खास पाककृती आहे. स्ट्यूमध्ये फरसबी, मटार मी घातले आहे मूळ पाककृतीत बटाटा, गाजर होते (त्यात शेफने सांगितले होते इतर भाज्या घालू शकता म्हणून :) ) पोटॅटो स्ट्यूची पाककृती खादाडा अमिताने दिलेल्या व्हेजिटेबल स्ट्यूसारखीच आहे, किरकोळ बदल आहेत तरीही देत आहे कृती.

अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/04/2013 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट: खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे. बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः १. लठ्ठपणा, फाजील वजन. २. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे. ३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे ४.

अव्यक्त…

लेखक मेघनाद यांनी शनिवार, 27/04/2013 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
ललित लिहीण्यासारख काहीस करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, माहित नाही कसा झाला आहे. जाणकारांनी समजून घ्यावे व जे चुकले असेल राहून गेले असेल ते समजवावे……. मेघनाद… --------------------------------------------------------------------------------- कोकणातलं घर पण अगदी जुन्या पद्धतीच म्हणजे मातीच्या भिंतीचं किंवा शेणाने सारवलेल्या जमिनींच नव्हत, तर व्यवस्थित रंगवलेल, पांढरी-काळी फरशी असलेलं आणि ऐसपैस जागा असलेल अस. ह्या घरामध्ये बरीच धामधूम सुरु होती कारण होते ते त्या घरातील मोठ्या मुलाच दोन दिवसात होणार असलेल लग्न.

मिपाच्या पाकृ अनुदिनीची (ब्लॉग) कल्पना...

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 27/04/2013 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या सर्व दालनांपैकी एक अतिशय समृद्ध दालन म्हणजे मिपाचं रसोईघर, अर्थातच मिपाचा पाककृती विभाग.. कुणाही शब्दप्रभुचे शब्द केवळ तोकडे पडावेत इतकं सुरेख, इतकं प्रेक्षणीय असं हे मिपाचं रसोईघर..नानाविध शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची अक्षरशः रेलचेल..सोबत त्या त्या पाकृंची दृष्ट लागावीत अशी एकापेक्षा एक सुरेख छायाचित्रं..! हा विभाग चाळत असताना एक कल्पना सुचली ती येथे मांडतो.. गणपासारख्या अधिकारी व्यक्तिने अथवा अन्य कुणीतरी वेळात वेळ काढून मिपाच्या या सर्व पाककृतींचा एखादा सुरेख ब्लॉग बनवावा.

कोलंबी पुलाव

लेखक जागु यांनी शनिवार, 27/04/2013 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ वाटे कोलंबी सोलून. २-३ कांदे उभे चिरुन ३ टोमॅटोंची मिस्करमधून काढलेली प्युरी १ बटाट्याच्या किंवा गरजेनुसार बटाट्याच्या फोडी बासमती किंवा कोणताही जुना तांदूळ ४ वाट्या.

प्रेमाची चाणक्यनीती (अर्थात मुली पटवायचे डावपेच)

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 27/04/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक राजा चाणक्यनीती प्रेमात येते कशी उपयोगी प्रेम जरी ह्रुदयाचा खेळ खेळता डोक्याने यश निर्भेळ चाणक्य सांगतो काही युक्त्या येती फळा जर भावना सच्च्या सर्वात आधी हे जाण तू प्रेमास तुझिया प्रमाण तू दुसरा करीतो म्हणोनी केले प्रेमवीर असे पराभूत झाले जी तुला बहू आवडे प्रेमाचे तिला असे वावडे काय करशील अश्या प्रसंगी? ऐक सांगतो युक्ति जंगी विषय हलके टाळ तू बुद्धिचातुर्य दाव तू स्वप्निल गोष्टीस नकोच थारा जुळतात कुठे त्या शोध तारा असेल काय जे प्रिय तिला त्यात असावी गति तुला काम जरासे वेळ घेते जुळता तारा गति येते स्वप्नील पाखरू जर असेल ते कविता करायचे शिकून घे कार्य समजू नको सोपे स्वप्ने आवरणे काम मोठे ये
काव्यरस

मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा

लेखक राजघराणं यांनी शनिवार, 27/04/2013 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त तमाम मराठि बंधु भगिनी आणि मातांसाठी खास घरचा आहेर :- मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा a मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा खरतर लिहायची होती एक रटरटुन उकळती कविता ज्यात असतील गरुड , ज्वालामुखी आणि भवानी तलवार छातीचा कोट , दर्यादिली आणि पोलादी मनगटे उचलती भार उत्तुंग ध्येयांची हंड्या झुंबरं - सह्याद्री , समुद्र आणि शिवराय कारण माय मराठीचे अभिजात शब्दवैभव