Skip to main content

कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 15/05/2013 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो. 'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे). साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ? ब्रम्हदेव हा सृष्टीचा निर्माता. सृजनाचा देव.

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४

लेखक किलमाऊस्की यांनी बुधवार, 15/05/2013 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १ क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २ क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३ क्लोंडायकला पोचण्यासाठी त्यातल्या त्यात सुरक्षित पण तितकाच महागडा मार्ग होता 'समुद्रीमार्ग'.

एक प्रेम दोन प्रेम तीन प्रेम चार!

लेखक इनिगोय यांनी बुधवार, 15/05/2013 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं शिडीवर चढता चढता सापानं गिळायचा गेम असतं. याच नावाने प्रदर्शित झालेला मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा या विकांताला अखेर पाहिला. गेल्या काही काळात आलेला वैवाहिक नातेसंबंधावर उत्तम भाष्य करणारा हा दुसरा मराठी सिनेमा. . ही अनुश्री, केदार, डॉक्टर रोहित आणि प्रज्ञा या चौघांची गोष्ट आहे.

किवी आणि कांगारूंच्या देशांत १० : महान् महासागरी रस्ता आणि १२ भक्त (The Great Ocean Road and 12 Apostles)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 14/05/2013 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

रॅन्बॅक्सी अपराधी

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 14/05/2013 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
बीबीसी आणि इतर वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय जेनेरीक औषधकंपनी रॅनबॅक्सीला ५०० मिलियन डॉलर्सचा दंड झाला आहे. http://www.bbc.co.uk/news/world-asia-india-22520953 हा आजवर कोणत्याही जेनेरीक कंपनीला झालेल्या दंडामध्ये सर्वात जास्त आहे. रॅनबॅक्सीला अनुचित पद्धतीने उत्पादन आणि साठा आणि तिच्या भारतातील दोन फॅक्टरँमध्ये केलेल्या चाचण्यांविषयी खोटी माहिती दिल्याबद्दल हा दंड झालेला आहे. रॅनबॅक्सीने अशुद्ध औषधं विकल्याचा अपराध मान्य केला आहे. तरी त्यांच्या आर्थिक स्थितीवर याचा फार बोजा पडणार नाही अशी माहिती दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था कर ( एलबीटी )

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 14/05/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा कर लागू होताना इतका धुरळा उडालेला मी तर कदाचित पाहिल्यांदाच पहात आहे. औरंगजेबाने जिझीया कर लावला तेव्हा कदाचित असे झाले असण्याची शक्यता आहे. (अर्थात दोघांची तुलना हा उद्देश येथे नाही). स्थानिक स्वराज्य संस्था कर ( एलबीटी ) म्हणजे काय ? पुर्वी कोणत्याही नगरपालिका / महानगरपालिका हद्दीत प्रवेश करतांना जकात भरावा लागत असे. उदाहरणार्थ मी एक संगणक विक्रेता आहे आणी मी जर रु. २५,०००० किमतीचा संगणक मुंबईत विकत घेतला व तो ठाण्यात नेला तर मला त्या किमतीवर ५ ट्क्के जकात द्यावी लागत असे. म्हणजे माझी खरेदी किंमत रु. २६,२५०.०० झाली.

रेघ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 14/05/2013 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
पिकासोपासून हुसेनपर्यंत कोणाचेही कुठलेही चित्र ऊचलून पहावे प्रत्येक चित्रात एक विविक्षित रेघ असते खरं तर भव्य कॅनव्हासवर ती अगदीच लहानशी असते अहो ते पिकासो अन् हुसेनही जाऊ दे मोरपीस पाहिलयं कधी निरखुन? त्या सुंदर रंगसंगतीतही एक बारीक रेघ असते पिसाच्या बरोब्बर मधोमध बर्‍याचदा या रेघेचा संदर्भ चित्रकारालासुद्धा समजलेलाच असतो असेही नाही पण त्या रेघेशिवाय चित्र मात्र अपूर्ण असते माझ्या असण्यामध्ये तुझे अस्तित्व त्या रेघेसारखे आहे ---- एकाकी तळ्याच्या नितळ पाण्यात दिसण्यार्‍या सूर्याच्या प्रतिबिंबासारखी आहेस तू सूर्यचं पण तरी शितल, पाण्यात आहे ना... सुस्पष्ट, स्वच्छ, निव्वळ तेज अन् याच तेजाने ऊजळ
काव्यरस

रुसवा

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 14/05/2013 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
कबूल नाही नसलेपण तव निगूत जपले आहे वैभव सरले ऋतू कितीक युगाब्धे हिरमुसले ना जीवन लाघव अदृष्यातिल दृष्य आभासे चंचल डोळ्यांमधील बारव स्मितरेषा गालांवर अंकित खोल खळ्या ओठांचे पल्लव भल्या किनारी रुसवा फसवा अबोल्यात वठले गुंजारव आभास; विझल्या खुणा सणाच्या भिजले काळिज हसले शैशव ............................अज्ञात
काव्यरस

आपला जल्मोजल्मी ऋणी आहे

लेखक देशपांडे विनायक यांनी मंगळवार, 14/05/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
मोठ्या ,प्रसिद्ध ,VIP अशा लोकांचा परिचय वाचताना ते लोक किती DOWN TO EARTH आहेत याचा उल्लेख येतोच . ही व्यक्ती विशेष नसून त्यांच्या गुणांनी नम्र आहे हे दाखविण्याचा तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न असतो . मध्यम वर्गातील माणूस विशेष कोणीतरी बनण्याचे गुण अंगी असूनही आहे तसाच राहिलेला दिसतो . मध्यम वर्गात जन्म घेतलेला ,मध्यम वर्गाचे संस्कार पाळणारा माणूस विशेष कसा बनणार ?तो तसाच राहणे हे खरे मध्यमवर्गीय संस्कार लक्षण .