Skip to main content

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०१ : तयारी आणि ऑकलंडकडे प्रयाण

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 30/04/2013 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

समृद्ध भारत

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची समृद्धी रस्त्यांच्या कडे,कडे,ने दिसते, पूर्वी टिन चे डब्बे घेवून बसत , आता स्टील ची लोटी दिसते
काव्यरस

स्वीट एन स्पाईसी मँगो करी

लेखक मनिष यांनी मंगळवार, 30/04/2013 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याच्या दिवसात आवर्जुन करावी अशी सोपी पण चविष्ट पाककृती, २-३ वर्षापुर्वी फेसबुकवर वाचली आणि तेंव्हापासून आंब्याच्या दिवसात 'मस्ट' असलेली पाककृती. साहित्य - २ घट्ट गराचे पिकलेले गोड आंबे फोडी करुन (बदामी, लंगडा किंवा हौस असल्यास हापूस, पण पायरी किंवा तत्सम रसाचे आंबे नको) ३-४ सुक्या लाल मिरच्या ५-६ टेबलस्पून तीळ १ कप चिंचेचा कोळ थोडा गुळ (२-२.५ टेबलस्पून) - साखर नको.

मरणे कठीण झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 30/04/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला

दृष्टी दोष

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
बदलली नजर तुझी लेन्स लावूनी, हसत होतीस त्या आधी मला बघोनी, नयनात तुझ्या सदा मी होतो आधी , जडली कशी तुज नजरेची व्याधी लावलास जसा तू कॉनट्याक्त लेन्स नजरेत तुझ्या झालो मी नोन्सेन्स . ,
काव्यरस

एकलम खाजा, धोबी राजा.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 30/04/2013 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली च्यामारी गोटे कुठेच मिळत नाहीत.. आमच्या लहानपणी गोटे मिळायचे.. गोट्या नव्हेत.. गोटे. छानसे सिमेन्टने बनवलेले गोल, गु़ळगुळीत गोटे..त्यांना 'ढप' असेही म्हणत..आम्ही सताठ जण मग रोज गोटे खेळायचो.. मातीतच गोट्याच्या आकाराची आणि तेवढीच खोल अशी लहानशी गोलाकार खळी खणायची. त्याला गल किंवा गली म्हणत.. मग सर्वांनी एका ठराविक अंतरावरून त्या गलीच्या दिशेने चकायचं.. ज्याचा गोटा गलीच्या जास्ती जवळ जाईल त्याची पहिली पाळी.. सुरवातीची एकलम खाजाची गल कंपलसरी.. एकलम करण्यापूर्वी वीतेला परवानगी नाही..एकलम झाल्यानंतर मग वीत घेऊन गोटा मारायला परवानगी.. त्यातदेखील वीत ढापणं हा प्रकार असे.

ओले काजु आणि मॅन्गो मार्गारीटा

लेखक स्पा यांनी मंगळवार, 30/04/2013 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहजच पराण्णांना भेटायला सौंदर्य फुफाट्यात गेलो होतो. बाहेरच्या खोलीत पराण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे कि बोर्ड दाबत मिपावर कुणाची तरी खेचत होते .. "काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाकुर्लीहून.." असे जुजबी प्रश्न पराण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे सोत्री आले. सोकाजीराव त्रिलोकेकर. पूर्वीचे मुंबईकर . पुण्यातल्या मिपा कट्ट्या मध्ये पराण्णा आणि त्यांची ओळख झाली स्वतः सोत्री मद्याचे भोक्ते.

ट्रेफिक सेन्स

लेखक राजा सोव्नी यांनी सोमवार, 29/04/2013 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
सखे पाहून तुज साडीत लाल, थांबलो,जाहलो मी बेहाल, पाहून तनास हळद पिवळी, सावरलो नजर झाली बावळी , पाहून हातात चुडा हिरवा, भासलीस मज तू ट्रेफिक सिग्नलच नवा, चाललो पुढे मी आधार शोधण्या नवा

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 29/04/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रहो, आजपासून युद्धकथेच्या मालिकेत सातवे पुष्प गुंफत आहे...............हा लेख बराच मोठा असणार आहे कारण पर्ल हार्बरची पूर्ण कहाणी सांगायचा विचार आहे....आपल्या शंकांना मी उत्तरे सगळ्यात शेवटी देईन-अर्थात मला माहीत असली तर......आजचा भाग छोटा आहे कारण बाण सुटला आहे............त्या बाणाच्या प्रवासाची ही कहाणी मला तरी रोमांचकारक वाटली......आपल्यालाही ती तशी वाटेल अशी आशा आहे..........

काळ्या वाटाण्यांची उसळ

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 29/04/2013 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
Kale-Vatane-Usal साहित्यः काळे वाटाणे - २ वाट्या तिखट - १ लहान चमचा (टी स्पून) आख्खे धणे - १ मोठा चमचा (टेबल स्पून) काळी मिरी - ५ नग लवंग - ३ नग दालचिनी - १ इंच खसखस - १ लहान चमचा जायपत्री - १ फूल हळद - १/४ लहान चमचा खवलेला नारळ - अर्धा आमसुले - ३ नग कांदा - १ मध्यम, उभा चिरुन. मीठ - चवीनुसार तेल - अर्धी वाटी. काळे वाटाणे रात्रभर भरपूर पाण्यात भिजत टाकून सका