Skip to main content

गेले ते दिन गेले...!!

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 17/09/2013 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
काय सांगु मंडळी! काय दिवस होते!! अर्थात आमच्या लहाणपणीचे. लहाणपणीची गोष्ट्च निराळी. सारेच अनुभव नवे! सारं विश्वच नवलाईने भरलेले. सुदैवाने माझा जन्म नव्या टेक्नॉलॉजीला फास्ट ट्रॅक लाभायच्या आधीचा. साधासा रेडीओ बरंचस मनोरंजन अन खुप सारी माहीती घेउन यायचा. बुधवारचं, अन शनिवारच पण बहुतेक, रेडीओवरच नाटक ऐकायला मंडळी आतुर असायची. घरातल्यांच्या शांत वातावरणात कोपर्‍यात कुठेतरी रेडीओची हळुवार गाणी लागायची, अथवा बातम्या सुरु असायच्या. असा ढणाणा आवाज करत फारच थोड्यावेळा रेडीओ लावला जायचा.

कॅलिग्राफी ऑन टीशर्टस्

लेखक एस यांनी मंगळवार, 17/09/2013 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलिग्राफी ऑन टीशर्टस् काही नम्र सूचना: १. खालील वाक्यांचा अर्थ विचारू नये. आम्ही क्लायंटला विचारला नव्हता. २. सर्व वाक्ये त्यांच्या रिस्पेक्टीव फॉन्ट कलरसकट आमच्या क्लायंटची कॉपीराईट्स आहेत. ३. हे टीशर्ट घातलेला इसम दिसल्यास आम्हांला खव अथवा व्यनिमार्फत कळवण्याच्या भानगडीत पडू नये. ४. त्या इसमालाही हटकू नये. ५. कापडावर कुंचलाकारी करण्याची आमची पहिलीच वेळ असल्याने आणि ऐनवेळी जसे (ज्याला) सुचेल तसे बदल केल्याने त्यात सौंदर्यदृष्टी शोधत बसू नये. ६.

२०१४

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 17/09/2013 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
देशाच्या प्राक्तनाचे लिलाव जवळ येताच भावी विधात्यांची स्वप्नांची दुकानं पॉश एरीयातल्या आर्ट गॅलरीतली कोलाज बनून सजतात गूढ, अगम्य, गुंगवणारी पण प्रेक्षणीय आणि चक्क श्रवणीयही तेव्हां.. टाळ्या पिटायला आख्खी धारावी धावते आणि वाट पाहते पुढच्या शो ची पुन्हा पाच वर्षांसाठी - संध्या १७.९.१३
काव्यरस

अडगळीतल्या आठवणींचा पसारा..

लेखक शिवोऽहम् यांनी सोमवार, 16/09/2013 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
सुरवातीला मी अगदी घारीच्या नजरेनं पुस्तकं राखत असे (कारण मित्रांची बरीच पुस्तकं मी हक्कानं ढापलीत). पण आताशा तेवढा आग्रह राहिला नाही. त्यामुळे पुस्तकांना पाय फुटले आणि आवडीची बरीच पुस्तकं परागंदा झाली. उरलेली पुस्तकं थोडी कपाटात, तर बाकीची घरात इकडे, तिकडे, चोहीकडे पसरलेली असतात. त्यात निवांत बसून पुस्तकं वाचायचं ठिकाण म्हणजे टॉयलेट असा माझा ठाम विश्वास. त्यामुळे तिथेही एखाद्-दुसरे पुस्तक सापडलं की आई आणि हिचा ओरडा खावा लागतो. म्हणून एक शनिवार कपाटं आवरण्यासाठी सार्थकी लावायचा ठरवला. बरेच दिवस न आवरल्यानं वरच्या कप्प्यातल्या पुस्तकांवर धूळ साचुन राहिलेली. आधी ती झटकायला घेतली.

झुक्या चे अभंग

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 16/09/2013 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मांडीयेला फेसबुके घाई, नाचती फेसबुके भाई रे क्रोध अभिमान भिने त्यांच्या मनी, एक एका पकडति गळा रे कुणी धर्माभिमानी, कुणी पुरिगामी. द्वेशाच्या माळा, लाईक्स मिरविती गळा शिव्या शापाची घाई, गाली वर्षाव, अनुपम्य फेसबुक सोहळा रे वर्ण अभिमान मिरवति जाती, एक एका लोटांगणी जाती भेसळ चित्ते झाली नवसागर, पाषाणा हृदयी कलहती रे होतो जयजयकार गर्जत फेसबुक, मातले हे फेसबुके वीर रे झुक्या म्हणे सोपी केली पायवाट, समाज नेई स्मशान घाट रे.. अवि

शिवबाचि तलवार

लेखक kalpana joshi यांनी सोमवार, 16/09/2013 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
शिवरायांची भवानी तलवार चाले - जिने हिंदुधर्माचे रक्षण केले , निराधार प्रजेला संरक्षण दिले निष्पाप प्रजेला भयमुक्त केले. बलाढ्य औरंगजेबाला भयग्रस्त केले , अशी ही शिवरायाची भवानी तलवार चाले . मोगलाई बरखास्त झाली, स्थापला महाराष्ट्र धर्म , लोकशाहीची तुतार फुंकली , सरंजामशाहीच्या अन्याया विरुद्ध बंड पुकारले , अशी ही शिवरायाची भिवानी तलवार चाले . बलाढ्य अफजल खानाचा वध झाला,झाले शीर धडा वेगळे , प्रराक्रमी किती ते शिवराय अन मावळे , किती एक गड किल्ले काबीज केले. अशी ही शिवरायांची भवानी तलवार चाले .

नर्मदेच्या खो-यातून ....(२)

लेखक आतिवास यांनी सोमवार, 16/09/2013 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुनर्वसन नेमकं किती कुटुंबाचं करायचं यामध्ये अजून घोळ आहेत. ‘घोषित’ कुटुंबांची मध्य प्रदेशमधली संख्या आहे ५२५७; पण यात सरकारने ‘वयस्क पुत्र’ (१८ वर्षांवरील मुलगे) धरलेले नाहीत. यातही सरकारने आकड्यांचा खेळ केला आहे. उदाहरणार्थ भिताडा गाव प्रत्यक्ष पाण्याखाली गेलं ते २००६ मध्ये पण तिथलं ‘कट ऑफ’ वर्ष आहे १९९३. म्हणजे १९९३ ची कुटुंबं २००६ सालीही तशीच आणि तेवढीच राहायला हवीत सरकारच्या मते. मुलगे मोठे होणार, त्यांची लग्न होणार, त्यांना मुलबाळं होणार, ते वेगळं घर करणार – या शक्यता सरकारने कधी गृहित धरल्याच नाहीत!

डिजिटल

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 16/09/2013 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
डीजीटल ................................................................................. "नीट बे, नीट घे खाल्लाकडली टोकं. झूम करु का अजून नेऊनशानी? शिंगम म्हणजे शिंगम पायजे. जराबी गंगाजल झाला का, मागची उधारी बी इसरायची." पाटलाचा अज्या वारकाच्या दुकानात आईन्यात पाहात बोंबलत होता. अन लक्ष्या वारीक अशा कीती दाढ्या कराव्यात तवा अज्यासारखा ग्यालक्षी घेता येईल हा विचार करत अज्याच्या मिशा कोरत होता. चार चमच्याच्या सल्ल्याने सिंघम स्टाइल मिशा, दाढी मसाज उरकून अज्याने परटाच्या दुकानात मुक्काम हलिवला. "ते बामन आला नाय बे अजून. बोर्डावरला मायना तर त्येच लिव्हतय ना.

कल्लोळ..!!

लेखक राघव यांनी सोमवार, 16/09/2013 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळजाला समेचा दिलासा.. मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला! तसे बंध कुठले-कधी जाणिवेला ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला! नको तेच कडवे मनी आळविले! हृदया ’कळा’या तरी वेळ गेला.. असे काय होते उरी प्राक्तनाच्या.. अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..! अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले.. मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!! राघव
काव्यरस

झिम्माड पाउस...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 15/09/2013 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
झिम्माड पाउस... अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झिम्माड पावसाला झाली सुरुवात ... भेटण्यासाठी अधीर झाले समुद्रकिना-यावर धावत गेले... तुफान सरी बेभान वारा बेधुंद झाला आसमंत सारा... अंगाशी झोंबत होता लडीवाळ वारा... मस्तीत स्पर्शून जात होत्या फेसाळणा-या लाटा... बेधुंद होउन मी मजेत गात होते... लाटांच्या संगीतावरही थिरकत होते... मनाला चिंब भिजवणा-या पावसात मनसोक्त भिजावेसे वाटत होते...