देशाच्या प्राक्तनाचे
लिलाव जवळ येताच
भावी विधात्यांची
स्वप्नांची दुकानं
पॉश एरीयातल्या
आर्ट गॅलरीतली
कोलाज बनून सजतात
गूढ, अगम्य, गुंगवणारी
पण प्रेक्षणीय
आणि चक्क श्रवणीयही
तेव्हां..
टाळ्या पिटायला
आख्खी धारावी धावते
आणि वाट पाहते
पुढच्या शो ची
पुन्हा पाच वर्षांसाठी
- संध्या
१७.९.१३
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2305
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
@आणि वाट पाहते
एकदम विद्रोही वगैरे?
आपल्या हाती फक्त मतदान!
जाउ द्या हो. चालायचंच.
ब-याच
व्वाह!!
कविता वाचुन सुन्न झालो.