शिवरायांची भवानी तलवार चाले -
जिने हिंदुधर्माचे रक्षण केले ,
निराधार प्रजेला संरक्षण दिले
निष्पाप प्रजेला भयमुक्त केले.
बलाढ्य औरंगजेबाला भयग्रस्त केले ,
अशी ही शिवरायाची भवानी तलवार चाले .
मोगलाई बरखास्त झाली,
स्थापला महाराष्ट्र धर्म ,
लोकशाहीची तुतार फुंकली ,
सरंजामशाहीच्या अन्याया विरुद्ध बंड पुकारले ,
अशी ही शिवरायाची भिवानी तलवार चाले .
बलाढ्य अफजल खानाचा वध झाला,झाले शीर धडा वेगळे ,
प्रराक्रमी किती ते शिवराय अन मावळे ,
किती एक गड किल्ले काबीज केले.
अशी ही शिवरायांची भवानी तलवार चाले .
स्थापिले स्वराज्य झाला शिवबाला राज्याभिषेक,
डोळ्याचे पारणे फिटले जिजाईचे ,अन आशीर्वाद
लाभले भवानी मातेचे ,
अशी ही शिवरायाची भवानी तलवार असे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2737
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
भवानी तलवार
भवानी तलवारीबद्दलः
https://shivsankalp.wordpress.com/2012/10/17/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B…
हा कवितेचा कोणता प्रकार आहे?
ही वाक्य एकापुढे एक लिहीली की गद्य पॅरा होईल.
:प!
In reply to हा कवितेचा कोणता प्रकार आहे? by संजय क्षीरसागर
:प!
हा कवितेचा आधुनिक प्रकार आहे.
In reply to हा कवितेचा कोणता प्रकार आहे? by संजय क्षीरसागर
हा कवितेचा आधुनिक प्रकार आहे.
शिर्षक धरुन पंच्च्याण्णव
शिर्षक धरुन पंच्च्याण्णव शब्दकथा!!
असं आहे होय,
In reply to शिर्षक धरुन पंच्च्याण्णव by स्पंदना
मग शहाण्णव तरी करायचे.
(No subject)
In reply to असं आहे होय, by संजय क्षीरसागर
:-D
अगागागागागा =))
In reply to असं आहे होय, by संजय क्षीरसागर
अगागागागागा =)) =))
या ओळी कुणी लिहिल्या आहेत?
In reply to शिर्षक धरुन पंच्च्याण्णव by स्पंदना
या ओळी कुणी लिहिल्या आहेत?
तलवारीबद्दल आणि त्याप्रत
तलवारीबद्दल आणि त्याप्रत तुमच्या भावनेबद्दल मनापासून आदर!
पण तलवार कशी अशी खच्च कन एक घाव दोन तुकडे करते ना; तसं झालं नाही वाचून. या कवितेत बारीक बारीक तुकड्यांचं सॅलड झालंय असं वाटलं!
हा हा...
कवितेत शिवरायांपेक्षा भवानी तलवारीचच कौतिक आहे की.
यावरून आठवलं. त्या अलिफ लैला मधला कर्तुत्वशुन्य लठ्ठ हिरो 'नेक बंदा' असल्यामुळे कुठलाही व्हिलन आला की वर आभाळाकडे बघून हात पसरून 'या अल्ला, कर मदत' म्हणत असे. आणि मग कुठल्यातरी 'तिलिस्मी ताकदीमुळे' तो त्यातून सहिसलामत सुटत असे.
(No subject)
In reply to हा हा... by दादा कोंडके
:))
आणि हो, शीर्षकातील 'चि' दुसरी
आणि हो, शीर्षकातील 'चि' दुसरी असायला हवी.
भवानी
बलाढ्य खानाचा वध म्हाराजानीच केला. पण शीर वेगळे मात्र मावळ्यानी नंतर केले. ( बरोबर ना? )
अशी ही शिवरायाची भवानी तलवार असे.
ते 'असे' वाचून बाँड / वकिली नोटिसा लिवणार्यांची आठवण आली. म्हणून नोटीस दिली असे. शेवटी असे लिहितात.
म्हणजे
In reply to भवानी by उद्दाम
महाराज मावळ्यांना नोटीस देतायंत.... असं म्हणायचंय का कवियत्रीला?