डिजिटल
विशेष
डीजीटल
.................................................................................
"नीट बे, नीट घे खाल्लाकडली टोकं. झूम करु का अजून नेऊनशानी?
शिंगम म्हणजे शिंगम पायजे. जराबी गंगाजल झाला का, मागची उधारी बी इसरायची."
पाटलाचा अज्या वारकाच्या दुकानात आईन्यात पाहात बोंबलत होता.
अन लक्ष्या वारीक अशा कीती दाढ्या कराव्यात तवा अज्यासारखा ग्यालक्षी घेता येईल हा विचार करत अज्याच्या मिशा कोरत होता.
चार चमच्याच्या सल्ल्याने सिंघम स्टाइल मिशा, दाढी मसाज उरकून अज्याने परटाच्या दुकानात मुक्काम हलिवला.
"ते बामन आला नाय बे अजून. बोर्डावरला मायना तर त्येच लिव्हतय ना. सच्या लाव बे तेला मिस्कॉल"
चार नंबरातला एक नंबर वाजत असतानाच कुलकर्ण्याचा दिप्या पळत आला.
"या देवा, कुठं हायेत चरणकमल? ते सोडा, बोर्डाचा मायना कुठं हाय?"
"मजकूर होय, असतोय की रेडी त्या डीजीट्ल वाल्याकडं"
"यवढं सांगायला चार पुड्या लागत्येत व्हय रं? येकतर ब्ल्याकनं आणताव त्या बी अशा खाऊन थुकताव का बे?"
एवढे बोलत अज्यानं खिसं चाचपलं, व्हय तालुक्याला कमी पडायला नको. तितं मिळनार बी नाहीत ओळखीशिवाय.
.
.
यंदाच्या गणपतीत डिजीटल लावायचं आसं ठरल्यापासूनच अज्याची तयारी सुरु होती. तालुक्याचे डिजीटल पाह्यल्यापासून अज्यालापण आपण बी असं नेतेस्टाइल झळकावं अशी लै तमन्ना होती. नशीबानं अज्याचा वाढदिवस बी चतुर्थीचाच. बाकी पोरावांनी पैसे दिले नाही तरी स्वतःचे थोडे पैसे घालून अन वर्गणीचा आधार घेऊन बोर्ड चढवायचाच हे त्याने फिक्स केले. मुख्य उत्सवमूर्ती जरा लहान झाली तरी हरकत नव्हती पण पाठबळ दाखवायसाठी तरी चार कार्यकर्त्याची फौज पायजे होती. फुकटात झळकायला तयार पोरांनी लगेच माना डोलावल्या.
मंडप मारला की बोर्ड आणायला तालुक्याला जायचं अन हिकडं नाग्या मंडपवाल्यानं परांचा उभारायचा असा प्लान होता.
नान्या, पंक्या, वाश्या असे एकेक नग जमा होत शेवटी बोर्डावर झळकणारी दहा टाळकी अन तीन मोटारसायकलीचं जुगाड जमले. पोटात अन गाड्यात पेट्रोल भरुन तालुक्याला पोचायलाच दुपार झालेली.
डिजीटलवाल्याकडं ही गर्दी. कसबसं घुसून अज्यानं मालकाला गाठलं.
" मालक डिजीटल छापायचय"
"कीती फूट?"
"सोयरे, डिजीटल मोठं आन कलर्फुल्ल पायजे एकदम"
"फूटात साइज सांगा हो. कीती जण आहेत फोटोत?"
"गणपती आन आमी धा जण. अध्यक्षाचा फोटो मोटा पायजे."
"बर बर, फोटो आणलेत का?"
"मोबाईलात हायेत की, चालतेत का?"
"द्या आत ऑपरेटरकडं अन आडव्हान्स माझ्याकडं"
ऑपरेटर नशीबानं शेजारच्या गावातला निघाला. एका आरएमडीवर फोटो गोरे करुन घ्यायचे म्हणजे अज्याला लैच स्वस्तात सौदा वाटला. निदान लक्ष्या वारकाच्या उधारीपेक्षा.
"सोयरे जरा माजा फोटो वरच्या साईडला घेताव का? मंजे हिक्डं गनपती अन हिक्डं मी."
"ह्या नान्याशेजारी मी नगं. आमच्या भैनीमागं लागलय चिनालीचं"
"वाश्या तूच माज्या बायकोचा कलवरा रे. लाजू नगस"
"ते अजयराजे लिव्हा खाली भगव्या कलरमध्ये"
मंडळाच्या चर्चा अन सूचना ऐकून वैतागलेल्या डीटीपी ऑप्रेटरने एका कागदावर सगळा मजकूर अन फोटोचा क्रम लिहून बाहेरचा रस्ता दाखवला.
.
.
चार तासानी बोर्ड हातात पडणार आणि अज्याचा बड्डे शेलेब्रेशन म्हणून मंडळाचा मोर्चा बारकडे वळला. जमा वर्गणीतला अर्धी रक्कम अन चार तास तिथं खर्चून मंडळ उठलं. गठ्ठा बांधलेल्या डिजीटलवर मंडळाचं नाव लिहिलेलं होतं, उरलेली रक्कम अदा झाली की नीट गावाचाकडचा रस्ता दिसू लागला.
अज्याकडून व्याजाने पैसे घेतलेले असल्याने मंडपवाला नाग्या इमानदारीनं बांबूचा अन दंट्याचा परांचा बांधून लोडशेडींगला शिव्या देत बोर्डाचीच वाट पाहात होता.
पंग झालेलं मंडळ अन बोर्डाचा गठ्ठा नाग्यासमोर एकदमच आदळले.
रात्रीच्या अंधारात, मोबाइलच्या उजेडात अन जितंवर पोहोचतेत तितक्या ऊंच गाड्याच्या हेडलाईटात नाग्यानं बोर्ड चढविला.
दुसर्या दिवशी सक्काळसकाळी तोंडात ब्रश घोळवत बनियन टॉवेल वर अज्या चौकात आला.
.
.
बोर्डावर गणपतीबाप्पा मजेत हाती मोदक घेऊन बसले होते.
आणि बाप्पांना तुमच्यासाठी कायपण म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार्या कार्यकर्त्यात कोपर्यात कुठेतरी अज्या सिंघमकट मिशात हसत होता.
वाचने
42775
वाचनखूण
प्रतिक्रिया
59
भारी ष्टुरी
हशा आणी टाळ्या!
हाहाहा.
In reply to हाहाहा. by प्रचेतस
सोलापुराकडची भाषा लै आवडली
In reply to सोलापुराकडची भाषा लै आवडली by अभ्या..
हायला.
एकच लंबर! मिरासदार, शंकर
In reply to एकच लंबर! मिरासदार, शंकर by आदूबाळ
+१११११११
ह्याह्याह्या.. लैच भारी..
In reply to ह्याह्याह्या.. लैच भारी.. by कोमल
पुन्ह्यांदा येकदा धा डाव +१
धण्यवाद!
In reply to पुन्ह्यांदा येकदा धा डाव +१ by अत्रुप्त आत्मा
सोलापुर फुड नळदुर्गला
In reply to सोलापुर फुड नळदुर्गला by अभ्या..
@करु काय तुमचे बी डीजीटल? >>>
In reply to @करु काय तुमचे बी डीजीटल? >>> by अत्रुप्त आत्मा
आत्मूस गेमाडपंथी आहेत ही
In reply to @करु काय तुमचे बी डीजीटल? >>> by अत्रुप्त आत्मा
मंजे "नाद केल्यास बाद करण्यात
In reply to मंजे "नाद केल्यास बाद करण्यात by अभ्या..
१. नाद केलिया बाद केले जाल
In reply to १. नाद केलिया बाद केले जाल by बॅटमॅन
ब्येस्ट आपी.
In reply to ब्येस्ट आपी. by अभ्या..
हाहाहा अगदी
In reply to हाहाहा अगदी by बॅटमॅन
हा हा हा...
In reply to हा हा हा... by चिगो
(No subject)
In reply to हा हा हा... by चिगो
अगागागागागा =))
In reply to हाहाहा अगदी by बॅटमॅन
ताकाचा विषय कशाला काढला बे
In reply to ताकाचा विषय कशाला काढला बे by मालोजीराव
दुदुदुदुदुदुदु माऽलोऽजीऽऽ =)
मस्त लिहीले आहे..
हा हा हा हा
मस्त लिहिलं आहे - सगळ्या
लै भारी ष्टूरी !
"लिहित का नाहीस बे सारखा सारखा?"ला अणुमोदण !लई झ्याक!! कदी न्हवं त्ये
हे तर अगदी बिनपाण्याची
चेष्टा करतो काय रे बंटीची ?
हे आंग आशी बगा… फर्मास लिहिली
हा हा हा. भारी! हे असं
अगायायायाया........शिंगम तर
ख्या ख्या ख्या ख्या!
हा हा हा मस्तच!
यकदम रापचिक
जबरा रे भौ जबरा
मस्त. पुढचा भाग कधी?
In reply to मस्त. पुढचा भाग कधी? by कवितानागेश
ओ ताई, संपली ना गोष्ट आता.
In reply to ओ ताई, संपली ना गोष्ट आता. by पाषाणभेद
अहो, पुढचा भाग आहे की अजून...
हा हा !
भारी ..
अभ्या मर्दा भारी लिवलयस की..
(No subject)
In reply to (No subject) by जेनी...
अभ्याच्या पावरफुल धाग्यावर
In reply to अभ्याच्या पावरफुल धाग्यावर by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to (No subject) by जेनी...
बघ...रुसली कशी ती पुन्हा! पण
छान प्रयत्न . पुलेशु
हाहाहाहाहाहाह! सुसाट.
मस्त स्टुरी...
झक्कास!
छान
आवरा...
फोटु का दिसत न्हाईत ?
लै दिसानी कडक स्टोरी वाचायला
(No subject)
In reply to (No subject) by विटेकर
अच्छा हाच तो वरिजिनल सोर्स
व्हाया वॉशिंग्टनपुर
झक्कास!
अजुन एक..
यंदा नाय का भाऊ डिजिटल?