Skip to main content

सत्यनारायणजी गोयंका यांचे निधन.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 01/10/2013 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
विपश्यना या तंत्राला भारतात आणण्याचे आणि त्याचे पूर्णपणे भारतीय करणारे श्री गोयंका गुरुजी यांचे निधन झाले आहे. प्रामाणिकपणा आणि सचोटी याच्या बळावर जग विधायक पद्धतीने बदलता येते याचा आदर्श म्हणून मी गोयंका गुरुजी यांच्याकडे पाहतो. विपश्यना या तंत्राचा सर्वलोकांना लाभ होवो हिच गुरुजींना श्रध्दांजली असेल.

रसिकांतले काही 'अग्रणी'

लेखक तिमा यांनी सोमवार, 30/09/2013 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच, पार्ल्याच्या एका संस्थेत, लताच्या रागदारीवर आधारलेल्या गाण्यांवर एक सुंदर कार्यक्रम झाला. सादर करणारे , स्वतः रागदारी गाणारे होते. एकेक राग थोडक्यांत गाऊन, त्यानंतर त्यावर आधारित लताचे हिंदी चित्रपटातील एक गाणे लावत होते. हजार रसिकांचा श्रोतुवर्ग, तल्लीन होऊन कार्यक्रमाचा एक भागच बनले होते. अतिशय सुंदर अनुभव होता तो. माझ्या बाजूला एक वृद्ध सरदार बसले होते. निव्वळ गाण्याच्या आवडीने ते लांबून आले होते. रागाचे नांव सांगितले की, कुठले गाणे लावणार, याचा त्यांचा अंदाज वाखाणण्यासारखा होता. काहीही ओळखपाळख नसताना ते माझ्याशी मोकळेपणे संवाद साधत होते.

राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक एच्टूओ यांनी सोमवार, 30/09/2013 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!

सुपर स्ट्रेसबस्टर

लेखक तिमा यांनी सोमवार, 30/09/2013 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझा भाचा, गेले वर्षभर कुठलातरी संगणक कार्यक्रम लिहित होता. काय ते पत्ता लागू देत नव्हता. परवा माझ्या वाढदिवसाला तो आला आणि एक छोटा पेन ड्राइव्ह भेट देऊ लागला. मी विचारले, " हे काय आहे ?", त्यावर तो हंसून म्हणाला," मामा, तुला ही सरप्राइज गिफ्ट आहे. हल्लीच्या आसपासच्या अनेक घटनांमुळे तू वैतागलेला असतोस ना ? म्हणून तुझ्यासाठी हा स्ट्रेस्-बस्टर गेम आहे. तू वापरुन बघ, तुला आवडला तर तुझ्या वयाच्या लोकांसाठी मी तो लाँच करीन." दुसर्‍या दिवशी मी तो संगणकावर उतरवला. बरोबर एक त्रिमिती दिसावे, म्हणून डोळ्यावर चढवण्याचा एक स्पेशल गॉगलही होता. त्याच्या वायर्स संगणकाला जोडल्या. व्वा! काय छान प्रकार होता.

टाईम पास

लेखक विश्वास कल्याणकर यांनी सोमवार, 30/09/2013 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम पास आपल्याला आपल्या सभोवती असे बरेच लोक दिसतात ज्यांना "काय कस काय" असे विचारल्यास " काही नाही यार कसातरी टाईम पास सुरु आहे. वेळच जात नाही, बोअर होते. काय करावे कळत नाही, कुठे जावे, कसेबसे दिवस ढकलणे सुरु आहे." असे उत्तर मिळते. याचा अर्थ त्यांच्या साठी वेळ कसा घालवावा हीच मोठी समस्या आहे. मग अशावेळी हे लोक पत्ते कुटत बसतात, मोबाईल वर गाणे ऐकत बसतात किंवा गेम्स खेळत बसतात. तासन तास टि.व्ही बघत बसतात किंवा चार लोक जमवुन कट्टयावर गप्पा छाटत बसतात. किंवा कुणाच्या घरी जावुन तिथे गप्पा मारतात. किंवा फालतु आणि निरर्थक गोष्टींमध्ये वेळ घालवतात.

मन खट्टु झाले.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 30/09/2013 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, दूरवर बसलेल्या माणसांशी काही तरी वाद - संवाद घडेल आणि दुरून का होईना थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, आशिर्वाद , लाभेल या हेतूने इथे आलो. पण इथे टंकन करण्या संबधी कोणी मदत करीत नही असे दिसले. अगदी पहिल्या पासून माझे ३ mail हे सांकेतिक शब्द परत परत मागायला लागतो अशी तक्रार करून झाले पण काही नाहि. साधी त्या e-mail ची पोच सुद्धा कोणी देत नाही. माझ्या वैयक्तिक email id वरून सुद्धा मी नीलकांत यांना आणि admin ला सन्देश पाठवून झाले. काहीच उत्तर नाही. कोणी दादच देत नाही. तात्या अभ्यंकर या भल्या माणसास भेटायचे आहे म्हणून त्यांचा फोन नं.

मोनार्क - २

लेखक किलमाऊस्की यांनी सोमवार, 30/09/2013 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
मोनार्क - १ https://lh3.googleusercontent.com/-V5aZEmPOayk/UjfJaqwTZPI/AAAAAAAABeM/nBrR6d-pU-g/w567-h32-no/butterfly+line+divider+R.png कॅनडात जन्मलेला छोटा फ्रेडी म्हणजेच प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड ऊर्कहट(Dr. Fred Urquhart). खिडकीत तासनतास बसून पक्षी आणि किटकांना न्याहाळणारा फ्रेडी हळूहळू भीड चेपल्यावर किडे पकडू लागला.

निळारंभ

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 24/09/2013 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
हे निळारंभ मुक्तसे काही मला खुणावे बोलेल जरी मजपाशी मन करीन मोकळे ll १ ll माझ्या उरात दाटे व्यथा बरे कशाची करतील दूर काय तिज मेघ सावळे ll २ ll बोलू कसा तयाला? जीव आर्त गुदमरे संकेत विहंग सांगे घे भरारी अवखळे ll ३ ll मी बोलता जरासा तोही भरून आला तळमळ झुगारुनी तो विजेत विरघळे ll ४ ll हा पाऊस आसवांचा वाहून हर्ष त्याला मी ही भिजून चिंब दु:ख सारे निमाले ll ५ ll - सार्थबोध

रिझर्व बॅंकेचे नवे गव्हर्नर रघुराम राजन यांची Monetary Policy आणि त्यांच्याकडूनच्या अपेक्षा

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 23/09/2013 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
५ सप्टेंबरला रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांची नियुक्ती झाली.

Posted Speed

लेखक rakhee यांनी सोमवार, 23/09/2013 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
Posted Speed सकाळी उशिरा जाग आली आणि सगळ्या गोष्टीना उशिर झाला. लेकिचि शाळेचि बस येते मी तिला घाई करु लागले ...उशीर जसा व्हायला लागला तशी माझी चिडचिड होऊ लागली ...अग लवकर ब्रश कर...किति वेळ करतेस अन्घोळ कर पट्पट ..बस जाइल.. मला राग यायला लागला तशी मी तिच्या्वर ओरडू लागले.ती बिचारी रडवेली होउन म्हणाली "करते ग मम्मा प्लिज" ..माझा नवरा हे सगळ पहत होता.कसतरी करुन लेक शाळेला निघालि माझ्या चिड्ण्यामुळे रड्वेलि होतच बस स्टोप वर गेली नशीब बस मिळालि.मी इरिटेटिन्ग मूड मधेच होते.घरी आल्यावर नवरा म्हणाला "अग किति मागे लागतेस तिच्या ?