Skip to main content

ओरिसा : २ : रेलवे, रायपूर आणि ओरिसा

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 15/09/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
ओरिसा : २ : रेलवे, रायपूर आणि ओरिसा १५-११-२०११. आता वेध लागले होते ओरिसाचे. तिथल्या नागरी मंदीरस्थापत्यशैलीतल्या ‘रेखा देऊळ’चे. जालावरून, इथून तिथून सचित्र आणि चित्रविचित्र माहिती काढून सर्व सदस्यांना चित्रांसह वाचायला दिली होती. त्यमुळे सर्वांची उत्कंठा वाढली होती. गणपती, नवरात्रांचे धूमधडाक्याचे दिवस नेहमीप्रमाणे वाजतगाजत आले आणि गेले. दिवाळी पण नेहमीप्रमाणे वाजतगाजत आली आणि गेली. दिवाळीचे कवित्व केव्हाच संपले होते. सहलीबद्दल ज्याला ज्याला कळे तो पहिला मलाच उलट सुनवायचा. अरे मूर्खा, रायपूर ओरिसात नाही, छत्तीसगडमध्ये आहे. आणि ओरिसात आहे काय बघण्यासारखे? नेहमी आपले पूर नाहीतर दुष्काळ?

ओदिशा - १ : पूर्वरंग

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 15/09/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
ओदिशा : १ : पूर्वरंग एकदा अचानक नव्या मुंबईतला आमचा मित्र बाळ्या टेलर ऊर्फ टकल्या आणि त्याची सौ. प्रियांका ऊर्फ जखीण पुण्याला आमच्या घरी आले. अर्थात आयत्या वेळी अगोदर दूरध्वनी करून आम्ही घरी आहोत की नाही याची खात्री करून. जखीण फार म्हणजे फारच रागावली होती. तिचा आणि आमच्या सौ. चा वाढदिवस दोनतीन दिवसांच्या अंतराने येतो. "२०१० मध्ये दोन्ही वाढदिवस कुठे तरी दूर, रम्य अशा पर्यटनस्थळी साजरे करावेत, तेव्हा ताबडतोब पर्यटनाचा आराखडा काढा, कुठेही दूर तुमच्या आवडत्या स्थळी; अशी तिने दीडेक वर्षापूर्वी सूचना केली होती." जखिणीचीच सूचना ती! पाळायलाच पाहिजे. आराखडा न बनवून मी सांगतो कोणाला?

हिवाळ्यातला स्वित्झर्लंड

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 15/09/2013 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्वित्झर्लंड या देशात भर उन्हाळ्यात बर्फाच्छादित हिमशिखरे असणार्‍या जगातल्या फार थोड्या पर्वतराजींपैकी आल्प्स पर्वत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही या देशात बर्फ आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरदर्‍या यांचा संगम असलेले निसर्गाचे रूप पाहायला मिळते.शिवाय कडक हिवाळ्याचा धसका असलेल्या बहुसंख्य प्रवासी मंडळींनाही स्वित्झर्लंड म्हटले की उन्हाळ्याची सफरच बरी वाटते. परंतू स्वित्झर्लंड त्याच्या अनेक नैसर्गिक हिमद्यांवर आणि मानवनिर्मित सोयीने तयार केलेल्या ठिकाणांवर उपलब्ध असणार्‍या अनेक हिवाळी खेळांसाठीही जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे तो देश वर्षभर प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेला असतो.

राणीछाप पैसे कुठे गेले?

लेखक उद्दाम यांनी शनिवार, 14/09/2013 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी देशात लंडनच्या राणीबाई छापाची नाणी आणि नोटा होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाचे चलन बदलले. राणीछापी पैसे बदलून एका रात्रीत आपले पैसे कसे आणले गेले? लोकांच्याकडे जे पैसे होते ते त्यान्नी कसे बदलले? याबाबत नेमका जुन्या लोकांचा कसा अनुभव होता? लोकांकडून जुने पैसे घेऊन नवीन पैसे दिले काय? मग ते जुने पैसे घेतले त्याचे सरकारने काय केले? नवीन पैसे लगेच कसे छापले? इ .इ इ. याबद्दल कुतुहल आहे. त्याच्या चर्चेसाठी हा धागा. ( जुन्या पैशाचे फोटू असतील तर इथे दाखवायला लाजू नये. )

सरडा आणि इतर क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 14/09/2013 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
सरड्यांकरता आता सुगीचे (निवडणुकीचे) दिवस आले आहे: लाल-पिवळा, हिरवा-निळा सरडा तुझा रंग कोणता? ज्या रंगाचा किडा, त्या रंगाचा चोला. शिकारी मी आला, रंगनिरपेक्षवाला. *चोला = वस्त्र **आला = मोठा (उदा: आला अधिकारी) (२) डोळे झाले अधू दिसत नाही दिल्ली. मिळेल कुठे तो जादूचा चश्मा दावेल मला जो लालकिल्ला. (३) द्विभाषिक क्षणिका शरीर असले जरी म्हातारे दिल अभी जवान है. वरेल का मला ती सुंदरी उम्मीद अभी कायम है.
काव्यरस

सुखकर्ता दुखहर्ता - एक विचार

लेखक प्यारे१ यांनी शनिवार, 14/09/2013 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम सर्व मिपाकरांना श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! भारतीय तत्वज्ञानामध्ये भगवद्प्राप्तीच्या अनेक मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. ह्या भक्तीमार्गामध्ये श्रवण, कीर्तन, नामस्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य नि आत्मनिवेदन अशा नऊ प्रकारच्या भक्ती किंवा मार्ग सांगितले गेले आहेत.

निर्भया

लेखक देशपांडे विनायक यांनी शुक्रवार, 13/09/2013 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
TV वर बातमी पाहिली . निर्भया ला न्याय मिळाला PIFF मध्ये पाहिलेला 38 WITNESSESसिनेमाची आठवण झाली एका CRIME चा उपयोग करून घेऊन , एका महान सत्याची प्रचीती शेवटच्या एका दृश्याने घडवणे,एका थ्रिलर सिनेमाचे रुपांतर एका वैचारिक सिनेमात करणे स्तिमित करून जाते . 38 WITNESSES ची गोष्ट [मला जशी समजली तशी ] पुढील प्रमाणे सोसायटीच्या समोरील रस्त्यावर रात्री एका तरुणीचा खून होतो . त्या तरुणीचे ओरडणे हिरो ऐकतो . हिरोची बायको बाहेर गावी गेलेली असते ती येते तेंव्हा तिला खुनाबद्दल कळते . नवरा तिला सांगतो कि तो खून झाला त्या वेळेस घरी नव्हता . कामावर गेलेला होता . पोलिसांना तो हेच सांगतो .

गणेशाची स्थापना. मूर्ती एक की दोन ? लहान की मोठी ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 13/09/2013 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषणे. ज्याच्या नामामधे विघ्नसमुद्राचे अगस्तीप्रमाणे शोषण करण्याचे सामर्थ्य आहे आणि वेदान्ताचे ज्ञानही जो करुन देतो असे मानले जाते त्या गणपतीचा वार्षिक उत्सव सर्वत्र भक्तीभावाने साजरा होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळापासून ते घरगुती गणेशाच्या स्थापनेपर्यंत सर्वत्र आनंदी आनंद आहे गणेशोत्सवाच्या विविध परंपरा श्रद्धेने श्रद्धाळू पाळत असतात. गणपतीच्या उत्त्पत्तीबाबत अनेक कथा पुराणात सापडतात.

सिरीया (contains some disturbing images)

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 13/09/2013 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जगभर गाजत असलेल्या सिरियन यादवी युद्धाची काही छायाचित्रे देत आहे. सूचना :खालील काही छायाचित्रे डिस्टर्बिंग आहेत, जे भीषण चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सिरियन सिव्हिल वॉर ची सद्यस्थिती map असद समर्थक - दमास्कस मध्ये map अमेरिकाविरोधी घोषणा द

कॉकटेल लाउंज : कलुआ अ‍ॅलेक्झांडर

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 13/09/2013 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे कलुआ अ‍ॅलेक्झांडर पार्श्वभूमी:

बायकोकडून गीफ्ट मिळालेल्या कोन्यॅकचा वापर आतापर्यंत फक्त 2-3 मित्रांना टेस्ट करून देण्यापुरताच झाला होता. स्निफ्टर ग्लास आणि क्युबन सिगार नसल्याने मीही अजुन म्हणावी तशी कोन्यॅक चाखलीच नाहीयेय. कोन्यॅक वापरून कॉकटेल बनवायचे मनात होते पण योग जुळून येत नव्हता. आज बाजारात गेल्यावर अमुल फ्रेश क्रीम दिसले आणि एकदम कलुआ आणि कोन्यॅक (ब्रॅन्डी) आठवली. लगेच अमुल फ्रेश विकत घेतले आणि कलुआ अ‍ॅलेक्झांडर करायचे ठरवले.