Skip to main content

तिहेरी शतशब्दकथा - लाडका - लाडका - लाडकी

लेखक साळसकर यांनी सोमवार, 23/09/2013 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
लाडका तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. अभ्यासात हुशार म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची, बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमधल्या बॉसचाही लाडका न झाल्यास नवलच..!! एक दिवस पुढे आलेल्या पोटावरून हात फिरवत बायको म्हणाली, इथेही आईपेक्षा बाबाच जास्त लाडके होणार वाटते..

' अधांतरी ..'

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 23/09/2013 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण कुंद कुंद दाटून येते. अनावर ठसठसते, रक्तासारखी ठिबकते. दिशांच्या कोनात विझून गेलेले हळवे पक्षी जागे होतात, उगाच चिवचिवतात, श्वासांच्या फांदीवर घट्ट रुतून बसतात. क्षितिजावर सांडलेले रंग सुटतात ; अलवार आकाशावर दिशाहीन फुटतात. तुझे भास प्राणांतून विजेसारखे लखलखतात, धारदार पात्यासारखे आरपार जाणिवेवर फिरतात. तूझ्या असण्याच्या शक्यतांच्या सीमारेषेवर जीव इंद्रधनुष्यासारखा सततच अधांतरी ..! - डॉ. सुनील अहिरराव

ताळेबंद

लेखक देवांग यांनी सोमवार, 23/09/2013 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्यावरचं कर्जाचं ओझं जड झालं की आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य संपवणं , हा अलीकडे सोपा इलाज होऊ लागला आहे. पण आयुष्य मौल्यवान असतं , आपलं आणि आपल्याशी जोडलेल्या कुटुंबाचंही. ते ' अर्थपूर्ण ' करणं अधिक सोपं आहे , संपवण्यापेक्षा. .......... गेल्या आठवड्यात एका बातमीने सगळं मुंबई शहर हादरून गेलं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या कर्जबाजारी बापानं मुलांचा खून केला आणि नंतर पत्नीसह आत्महत्या केली. दोन दिवसांनी घरातून कुजलेले मृतदेह बाहेर काढावे लागले! खरंतर अशा बातम्या महिन्या दोन महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या शहरातून येत असतात. तपशील बदलतात ... कहाणी एकच असते. कर्जात आकंठ बुडालेलं कुटुंब.

छायाचित्रण भाग ५. अ‍ॅक्सेसरीज्

लेखक एस यांनी सोमवार, 23/09/2013 14:50 या दिवशी प्रकाशित केले.

सैतानाचा आरसा - शतशब्दकथा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 23/09/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एखाद्या पिसाटा सारखा बेफाम धावत होतो. पुढे ती जीवाच्या आकांताने सैरावैरा पळात होती. माझ्या नजरेत विखार होता. तिला मी रोज पहायचो. आज तिला सोडायचे नाही असा निर्धारच मी केला होता. रडत, धडपडत, अडखळत, भेलकांडत धावताना ती मदतीसाठी केविलवाणे किंचाळत होती. एका क्षणी मी अगदी जवळ पोचून निर्दयपणे तिची ओढणी खेचली. ती घाबरुन अजूनच जोरात धावायला लागली. तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला अडखळलो, तेवढ्यात ती एका बंगल्यात घूसली. गेट लावायची तिची धडपड सुरु असतानाच मी तिथे पोचलो आणि चवताळून त्या दिशेने झेप टाकली. तिने धाडकन गेट बंद केले.

नवीन नाटक - अलिबाबा आणि चाळीशीतले चोर

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 23/09/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाजपेयी, मुशर्रफ, माधुरी दिक्षीत आणि मार्गारेट थॅचर रेल्वेच्या एकाच बोगीतून प्रवास करत असतात. सर्वजण प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि त्यातले तिघेजण राजकारणी. त्यामुळे ते अतिशय प्रगल्भपणे व राजकीयदृष्ट्या योग्य भूमिका घेउन गप्पा मारत असतात. अचानक एक मोठा बोगदा येतो. रेल्वे बोगद्यात शिरल्यावर डब्यात अंधार येतो आणि अचानक डब्यातले दिवे जातात. आता पूर्ण अंधार झालेला असतो. अचानक कोणीतरी कोणाचे तरी चुंबन घेतल्याचा आवाज येतो व त्यापाठोपाठ कोणीतरी कोणाच्या तरी जोरात थोबाडीत मारल्याचा आवाज येतो. नंतर एकदम शांतता पसरते. बोगदा संपतो आणि डब्यात उजेड येतो. सर्वांना मुशर्रफचा गाल लाल झालेला दिसतो.

असले कसले जेवण केले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 22/09/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
असले कसले जेवण केले जेवण केले अन हात धुतले धुतलेले हात टॉवेलला पुसले घरी येतांना खुप भुक लागली लगेच आयत्या ताटावरती बसले आमटीत होते पाणीच पाणी जळक्या पोळ्यांचेही आकार कसले! ईईई आळणी भेंडी करपा भात तसेच खावून उपाशी मी उठले काय नशिबी आले माझ्या जेवण हे बेचव असले कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला तेथेच आयटीतली बाई मी फसले सांगितले कितीदातरी त्याला नको बनवूस जेवण असले कसले पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच करायचे लग्न मनी ठसले एकदाचे जेवण केले अन हात धुतले धुतलेले हात टॉवेलला पुसले - डू द लुंगीडान्स, पाभे
------------------------ दिर
काव्यरस

लंच बॉक्स !

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 22/09/2013 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
… खूप दिवसांनी एक खल्लास सिनेमा बघितला. लंच बॉक्स. मस्त आहे. आजवर मी बघितलेल्या लव स्टोरी मधली एकदम हळुवार स्टोरी आहे. अगदी अंगावरून मोरपीस फिरवणारी. गुदगुल्या आणि रोमांच. यांचा एकत्रित लेप धमाल आणतो की नाई? अगदी तसं वाटतं लंच बॉक्स बघताना .रितेश बत्रा नावाचा कुणीतरी दिग्दर्शक आहे. नवखा आहे. त्याचा पहिलाच पिक्चर. या पिक्चरची आणखी एक गंमत आहे. नट नट्या पेक्षा निर्मात्यांची संख्या ज्यास्त आहे.

नोकरी कि धंदा ?

लेखक स्वतन्त्र यांनी रविवार, 22/09/2013 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझ्या घराचे बांधकाम चालू आहे.मी बर्याच ठेकेदारा मार्फत काम करून घेतले.उदा. टाइल बसवणारे लोक UP मधून आलेले आहेत. त्यांचा ठेकेदार साधारण १७ वर्ष पुण्यात आहे. सुरवातीला बिगारी काम करून ३-४ वर्षातच ठेकेदारी करू लागला. शिवाय तिकडून येथे मजुरी काम करायला येणारे लोक बरेच असल्यामुळे त्यांना मजूर मिळवायला विशेष अडचण येत नाही. काही लोक जे इथे ३० -३५ वर्ष आहेत त्यंनी तर इतकी संपत्ती साठवून ठेवली आहे कि आपण सामान्य माणस फक्त कल्पनाच करू शकतो. या वरून मला पडलेले काही प्रश्न. सध्या अधिक पैसा कशात आहे ?

॥ नामा म्हणे प्रदक्षिणा ॥

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 21/09/2013 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावरील कादंबरी वाचन श्री पद्माकर गोवईकर यांनी "मुंगी उडाली आकाशी " या ध्वनिफितीत अतिशय सुंदर केले होते. मी ते सतरा अठरा वर्ष्याचा असताना ऐकले होते. आणि वारंवार ऐकत होतो. त्यामध्ये एक प्रसंग होता की आळंदीच्या ब्राम्हणांच्या छळाला कंटाळून विठ्ठल पंत मुलांना घेऊन ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करायला त्य्रंबकेश्वर येथे जातात व ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करतात. तेथे असा उल्लेख केलेला ऐकला होता कि ब्रम्हगिरिचि प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. कारण ब्रम्हगिरीचा पर्वत म्हणजे साक्षात शंकर आहे.