तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां
तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां
मी आज दवाखाना उघडा ठेवला होता
आज दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन त्यामुळे आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर ठणाणा बोंबलणारे कर्णे आणि धडा धडा वाजणारे ढोल ताशे याच्या आवाजाची कटकट होणार होती ती टळली. मी थोड्या विचारात होतो संपादक मंडळाने व्यनि करून एक लेख लिहिण्यास सांगितले होते. मुळात मी काही सिद्ध हस्त लेखक नाही तेंव्हा असा मनात आला की लेख लिहिणे माझ्याच्याने जमणारे नव्हते. चार पाच मिनिटे विचार करून डोके शिणले तेंव्हा म्हटले कि गाणी लावावी.
विशेष
मिसळपाव