माध्यमे आणि मोदीविरोध
मी दररोज मटा, लोकसत्ता आणि सकाळ (लोकसत्ता प्रामुख्याने) हि वृत्तपत्रे वाचतो/चाळतो. त्यातले मटा हे लेटेस्ट बातम्यांसाठी ('बातम्या' या शब्दाबद्दल मतभेद मान्य), सकाळ हे पत्रकारितेतल्या पक्षपातीपणाच्या प्रत्ययांसाठी आणि लोकसत्ता तुलनात्मक दर्जासाठी वाचत असतो. बातम्यांमधील मजकुरातून राजकीय पक्षांच्या धोरणात्मक हालचालीतून प्रेरित केली जात असणारी विधाने, कुरघोड्या, मारलेल्या कोलांट्या उड्या आणि उधळलेली मुक्ताफळे यातले भेद आणि समयोचित संधिसाधुपणा या गोष्टी मला track करायला आवडतात.
पण गेल्या काही दिवसात माध्यमांमधील पक्षपातीपणा अचानक नागडेपणाने समोर येवू लागला आहे. असं मला वाटतं.
मिसळपाव