Skip to main content

कल्लोळ..!!

लेखक राघव यांनी सोमवार, 16/09/2013 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळजाला समेचा दिलासा.. मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला! तसे बंध कुठले-कधी जाणिवेला ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला! नको तेच कडवे मनी आळविले! हृदया ’कळा’या तरी वेळ गेला.. असे काय होते उरी प्राक्तनाच्या.. अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..! अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले.. मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!! राघव
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2182
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

" नको तेच कडवे मनी आळविले! हृदया ’कळा’या तरी वेळ गेला " सुरेख ! आवडली कविता ! !