मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोळा भात

मधुरा देशपांडे ·
मिपाच्या पाककृती विभागात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील पाककृती नेहमीच सादर होत असतात. असाच एक विदर्भात केला जाणारा पदार्थ म्हणजे गोळा भात. विशेषतः वर्धा-नागपूर या बाजूला केला जाणारा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा सगळे नातलग एकत्र येतात तेव्हा गोळा भात हमखास केला जातो. आज खास मिपाकर खवय्यांसाठी ही पाकृ.

निवडणूका जवळ आल्या सारखे वाटतंय

निलरंजन ·
लेखनविषय:
काव्यरस
निवडणूका जवळ आल्यासारखे वाटतंय गरीबांची कणव करणारे गल्लोगल्लीत जमलेयं कैवारी जो तो जनतेचा बनू पाहतोय पोटात एक ओठात एक अन मनात काही वेगळच साचलयं पोस्टर फलक बोर्ड नाक्यानाक्यावर लागलेत इच्छुक आणि समर्थक आता आपले घोडे दामटू लागलेत निवडून येण्याची स्वप्न आता घडोघडी पडू लागल्यात जिकण्यासाठीचा हिशेब जे ते ठेवू लागलेत उमेदवारीच्या खेळात आता वजन आपले लावू लागलेत हा आपला हा परका डाव पुन्हा नव्याने मांडू लागलेत आपआपला सवतासुभा मतदार आपले राखू लागलेत मिटींगा मेऴावे भाषण सभा चौकाचौकात घडू लागलेत म्हणूनच म्हणतो निवडणूका जवळ येऊ लागल्यात

खान्देशी पद्धतीची शेवभाजी ,अंडाकरी आणि भरली वांगी

आरोही ·
मागच्या आठवड्यात भावाकडे गेले होते तेथे गावावरून आई आली होती मग काय पूर्ण ७-८ महिन्यांनतर आईचे हातचे जेवण मिळणार होते मग सोडणार कोण .मस्त पैकी तिच्या हातची शेवभाजी (खान्देशी शेवभाजी)बनवायला सांगितले .अहाहा काय चव होती ..काहीही केले तरी ती चव कुठेच पुन्हा मिळत नाही ..अगदी मी त्याच पद्धतीने करून बघते पण ती चव खरच येत नाही हे खरेच आहे.. नवऱ्याला हि माझ्या आईच्या हातची त्याच मसाल्यातील कुठलीही भाजी खूप आवडते ..या वेळेस तो सोबत आला नसल्याने त्याला ती खायला मिळाली नाही ...मग काय त्याने फोन करून आईच्या हात चा मसाला बनवून आणायला सांगितले ..मग काय जावयाची इच्छा म्हटल्यावर आईने अगदी अर्ध्या तासात आम्हा

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

प्रकाश घाटपांडे ·
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. .

चालत राहणार

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
काव्यरस
चालणे प्रवाह जीवनाचा थांबणे मरण यातना पर्याय नाही दुसरा शिवाय चालण्याचा. चालता चालता भेटले वाटेत जे सगे-सोयरे अनोखळी वाटसरू निघाले. क्षणभराची साथ तयांची देऊन गेली अनेक जखमा कवटाळूनी त्या जखमांना एकटाच मी चालत राहणार. दमलेल्या शरीरानी थकलेल्या मनांनी निरुदेश्य मी भटकत राहणार. चालत राहणार, चालत राहणार.

अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार? काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.

बौद्धिक कृष्णविवर

माहितगार ·
बौद्धिक कृष्णविवर: लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते. बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४] युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात.