१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ८
नील बिडलमन ११ मे च्या संध्याकाळीच आपल्या तुकडीतील सदस्यांसह साऊथ कोल उतरुन कँप ३ वर पोहोचला होता. सुमारे २५००० फूट उंचीवर पोहोचल्यावर त्याने सँडी हिलला डेक्सामेथासनचं आणखीन एक इंजेक्शन दिलं. ल्होत्से धारेच्या खालच्या उतारांवर ते पोहोचत असताना त्यांच्या मदतीला येत असलेल्या बेपाळी मोहीमेतील शेर्पांशी त्यांची गाठ पडली. त्या शेर्पाच्या सहाय्याने ते खाली उतरत असतानाच अनपेक्षीतपणे संत्र्याच्या आकाराच्या दगडांचा एक लोंढाच ल्होत्से धारेच्या वरच्या उतारांवरून गडगडत आला !
त्यातील एक दगड नेमका एका शेर्पाच्या डोक्यावर येऊन आदळला ! त्या आघातामुळे तो शेर्पा तत्काळ बेशुध्द झाला आणि उतारावर घसरू लागला !
मिसळपाव
पडोसन मधील स्वामी पिलैची सूर पकडायची तारांबळ आठवते. त्याची तिरपिट झालेली पाहून...
आजकाल एकेकाळी विलक्षण लोकप्रिय नेत्यांची तळ्यात का मळ्यात अशी नाचानाच पाहून मजा वाटते.
नातवंडांना पंचवंडांना खेळवायच्या आयुष्याच्या वळणावर पुन्हा विवाहाची हुक्की येणारा बाप जसा घरच्यांच्या अवमानाला कारणीभूत होतो तसेच काहीसे - इतके करून जर पदरात काही पडले नसेत तर - हे नाचरेपण वाटते.
बर या अशा धेंडांना नव्या मंत्रीमंडळात खाती तरी कुठली देणार?