Skip to main content

तू

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 15/04/2014 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी तुझी याद....संधीप्रकाशात आणि मग खळबळ....कुठेतरी आत चिंब जणू तू....चिंब पावसात ओला ओला शहारा....चिंब शरीरात उरी काहिली काहिली....जरी चांदरात होई काळीज निखारा....तुझ्या विरहात मन पाखरू पाखरू....फडफडे पिंज-यात आणि पिंज-याची चावी....जगाच्या हातात कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत कधी माझी लाट....नेई तुला सागरात दूर देशी तू....तरीही मनात ठायी ठायी तूच....मन-देश अंतरात

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ४

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 15/04/2014 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
टँगची पुढची टॉर्पेडो रूम अर्धवर्तुळाकार होती. नौसेनीक मॉमसेन लंग्ज चढवत असतानाच पॉल लार्सन आपल्या जखमी सहका-यांवर उपचार करण्यात मग्न होता. सुदैवाने टॉर्पेडो रुममध्ये त्याला जास्तीचं मेडीकल किट सापडलं होतं. पाणबुडीतील हवा झपाट्याने दुषीत होत होती. दृष्यमानताही काही फूट अंतरापर्यंतच उरली होती. बॅट-यांमध्ये हळूहळू पाणी झिरपू लागलं होतं. इमर्जन्सी दिवेही मध्येच बंद पडू लागले होते. लेफ्टनंट मेल एनॉसच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना चमकली. कंट्रोल रूममध्ये पाणबुडीच्या तोफेकडे जाणारी हॅच उघडता आली तर बाहेर पडणं शक्यं होतं.

कोकिळ कुहू कुहू बोले...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 15/04/2014 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
कोकिळ कुहू कुहू बोले... कोकिळाचा फक्त आवाज मंजूळ असून चालत नाही. त्याचे अन्य वर्तन तसेच लाघवी व हवे हवेसे वाटावे असे असले तर त्या कूजनला दाद मिळते. 2 निसर्गतः काही वैशिष्ठ्ये प्रत्येकाला मिळालेली आहेत. त्यात कोकिळा आपली अंडी इतर पक्षांच्या खोप्यात सोडून ती वाढवण्याची जबाबदारी परस्पर सोपवण्याच्या कृतीतून अगोचरपणाची झाक दिसते. मित्रांनो, सोबतच्या या चित्र फितीतून जीवन संघर्ष प्रवृत्ती जन्मजात कशी असते याचे उदाहरण डकवले आहे.

आडनावाच्या आडून...

लेखक मार्मिक गोडसे यांनी सोमवार, 14/04/2014 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेचा पहिला दिवस. ५ वी चा वर्ग. वर्गशिक्षिका जोशीबाई. वर्गाची 'ओळखपरेड' चालू होती.एक-एक विद्यार्थी उभे राहून आपली ओळख करून देत होता.मी उभा राहीलो (उंची कमी असल्यामुळे उभा आहे का बसलेला आहे ह्यात विशेष फरक पडत नव्हता व बाकहि उंच होते.) मीही माझी ओळख करून दिली. सगळ्या वर्गाची ओळखपरेड पूर्ण झाल्यावर बाईंनी माझ्याकडे बघितले व म्हणाल्या 'गोडसे' माझ्यासमोरील पहिल्या बाकावर बस. पुढून तिसर्या बाकावरून थेट मी पहील्या बाकावर आलो. पहिल्या बाकावरचा हुशार शिंदे तिसर्या बाकावर फेकला गेला. सापशिडीचा खेळ म्हणावा तर मी कोणतेही फासे टाकले नव्ह्ते. उंचिचे म्हणावे तर तोही माझ्याइतकाच उंचीचा होता.

खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा

लेखक माहितगार यांनी सोमवार, 14/04/2014 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
खाली काही मराठी लिहिण्याचा प्रयास झालेली साधी वाक्ये आहेत. त्यात सुधारणा सुचवून हव्या आहेत पण मुख्य म्हणजे मराठी व्याकरणाच्या अंगाने विश्लेषण करून हवे आहे. १) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणारी अभिनेत्री आहेत । २) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक द स्कॉटिश कवी होता. ३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होता. ४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स.

दुधी - सोडे (ड्राय प्रॉन्स) रस्सा

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 14/04/2014 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
सोडे (ड्राय प्रॉन्स): Sode रस्सा: Rassa साहित्यः १. दुधी - १/२ कि. २. सोडे - १ वाटि ३. कांदा उभा चीरुन - १ मध्यम ४. ओलं खोबरं - १/२ वाटि ५. लसुण पाकळ्या - ४ ६. आख्खे धणे - १ चमचा ७. जीरं - १/२ चमचा ८. सुख्या लाल मिरच्या - २ ९. हळद - १/२ चमचा १०. मसाला - २ चमचे (टिप नं १ बघा) ११. तेल १२.

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ३

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 14/04/2014 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
टँगमधून निघालेला शेवटचा चोवीसावा टॉर्पेडॉ परत फिरला होता आणि आता भस्मासुराप्रमाणे टँगच्याच दिशेने झेपावत होता ! काहीतरी भयानक घोटाळा झाला होता. टॉर्पेडोचं रडार जाम झालं असावं किंवा त्याच्या दिशादर्शक यंत्रणेत असलेला गायरोस्कोप बिघडला असावा. काहीही असलं तरी त्याच्या तडाख्यातून पाणबुडी वाचवणं हे आद्य कर्तव्य होतं ! " इमर्जन्सी स्पीड !" ओ'केनने आज्ञा सोडली, " ऑल अहेड इमर्जन्सी ! राईट फुल रडार ! पाणबुडी वळवा ! पूर्ण वळवा !" इंजीनरुम मध्ये चीफ इलेक्ट्रीशियन जेम्स कल्प पाणबुडी वळ्वण्यासाठी लागणारी आवश्यक विद्युत शक्ती पुरवण्याचा आकांती प्रयत्न करु लागला !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लेखक सचिन७३८ यांनी सोमवार, 14/04/2014 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम. जय भीम !!! उध्दरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे ।। Babasaheb

युरोपांश - स्विट्झर्लंड

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 14/04/2014 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवस पॅरीस मध्ये येता-जाता आयफेल टॉवर नजरेस पडत होता. आज पॅरीस सोडताना सारखी त्याची बिचार्‍याची आठवण येत होती. पण थांबणं शक्य नव्हतं. आता स्विट्झर्लंड बोलावत होतं. पॅरीसच्या गॅरे दे लिऑन रेल्वे स्टेशनावरून प्रवास सुरु होणार होता. युरेल पास कार्यांन्वित करावयाचा होता. युरोपातील सर्वच मुख्य स्थानकं एखाद्या ऐतिहासिक वास्तूप्रमाणे भव्य आणि दिव्य आहेत. स्थानकावरील स्वच्छ्ता, प्रवाशांच्या सेवा सुविधा आणि मुख्य म्हणजे दिशादर्शक पाट्या वाखाणण्याजोग्या आहेत. हल्ली बरेच दिवसांत बोरिबंदर स्थानकावर जाण्याचा प्रसंग आला नाही पण लहानपणी पाहिलेले बोरीबंदर स्थानक आठवते.

मुलायम मेणाहूनी!

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 14/04/2014 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
थोर धर्मनिरपेक्ष समाजवादी नेते मुलायम सिन्ग यादव यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केले. शक्ती मिल परिसरातील बलात्काराचा आरोप असणार्‍या बहुतेक आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्या पार्श्वभूमीवर सिंग साहेबांनी अशी मुक्ताफळे उधळली की लडके तो लडके है. ऐसी गलतियां हो जाती है. उनके लिये फासी की सजा गलत है. अर्थात अशा चुका मुलांकडून होतातच. त्याकरता फाशी देणे चूक आहे. हे असले विचार करताना त्या मुलीचे आयुष्य विनाकारण उध्वस्त झाले आहे वगैरे विचार का नाही झाला ते कळले नाही.