बौद्धिक कृष्णविवर
बौद्धिक कृष्णविवर:
लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते.
बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४]
युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात. कोंडी करणाऱ्या तर्कास आणि युक्तिवादास 'ती एक निराळी श्रद्धा प्रणाली आहे' असे सांगून बोळवण करून स्वतःची सुटका करून घेण्याचा असतो. या कॢप्तीत सर्व युक्तिवाद, श्रद्धा, विचारधारा एकाच पातळीवर असून सरसकट (equally) "सयुक्तिक (reasonable)" अथवा "असयुक्तिक (unreasonable)" असल्याचा आभास निर्माण केला जातो. [५].'तुमचा विश्वास जेवढा योग्य आहे तेवढाच माझा विश्वास योग्य आहे' असे दाखवण्याचा प्रयास करत वेळ मारून नेत स्वतःची हार होतानासुद्धा ताठ मानेने बाहेर पडण्याच्या प्रयत्नास Stephen Law न्युक्लिअर बटन म्हणजे शेवटचा सुटकेचा मार्ग म्हणतात ज्यात तत्त्वज्ञानातील प्रॉब्लेमला smokescreen[मराठी शब्द सुचवा](धूम्रावरण/धुराचा पडदा) म्हणून वापरले जाते, त्यामुळे त्यांचा तर्कांबद्दल संशय विशुद्ध ठरत नाही. .[६]
विशिष्ट विचारधारेसच बांधिलकी कायम ठेवण्यास चुकीची बौद्धिक दिशा आणि कॢप्त्या स्वीकारणे, कोणत्याही तर्कसंगत (रॅशनल) युक्तिवादास दुर्लक्षित करणे अथवा त्याला वळसा घालण्याचे कारस्थान करणाऱ्या संशयवादींच्या सहभागाचा प्रयत्न कोणत्याही तर्कसंगत चर्चेमुळे साध्य होत नाही. [७]
तर्कशास्त्र सुचविते की, अशा कारस्थान-सिद्धान्तवादी लोकांना(किंवा अशा प्रकारच्या धारणेकडे घसरलेल्या/झुकलेल्या लोकांना) बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे असा की त्यांच्या विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधणे, न की त्यांच्या विधानांच्या अर्थाकडे. (बहुतेक लोक नंतरचेच काम करतात).[८]
संदर्भ तार्किक उणीवा. (२०१३, जुलै ८). विकिपीडिया, एक मुक्त ज्ञानकोश.
Retrieved ०९:००, मार्च १, २०१४ from http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%89%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE&oldid=1188521
मराठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.धागा विकिपीडियाकरता असल्यामुळे नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकार मुक्त होत आहे. विषयांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी आपणा सर्वांना धन्यवाद
वाचने
5784
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
मराठी ब्लॉगवर काही विचारांचा अल्प प्रयास
छान छान !
खूपच इनत्रेस्तिंग! येउद्या
तुम्ही पण ना ? बिंधास्त इंग्रजी शब्द वापरा हो.
In reply to तुम्ही पण ना ? बिंधास्त इंग्रजी शब्द वापरा हो. by आत्मशून्य
भोकात जाणे/जाऊदेणे
शंका आहे
In reply to शंका आहे by पैसा
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by धन्या
+१११
In reply to सहमत आहे. by धन्या
;)
In reply to ;) by आत्मशून्य
लगे रहो ?
In reply to लगे रहो ? by माहितगार
तर्कशास्त्र प्रकल्प करता
In reply to तर्कशास्त्र प्रकल्प करता by आत्मशून्य
यू आर मोस्ट वेलकम सर
In reply to यू आर मोस्ट वेलकम सर by माहितगार
नक्किच सहभागी व्हायला आवडेल!
In reply to शंका आहे by पैसा
चर्चा सहभागा करीता धन्यवाद
पोच