जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ४ : अंगकोर थोमची राजमंदिरे (बायोन आणि बाफून)
==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
...चला, आता निघूया हा सगळा खजीना पहायला. अर्थातच सर्व जागा पाहणे तेथे बराच काळ ठिय्या मारून बसल्याशिवाय बघणे शक्यच नाही. तसेच तेथे खरंच काय आहे याची पूर्ण कल्पना स्वतः भेट देऊन डोळ्यानी पाहिल्याशिवाय येणे शक्य नाही. मात्र आमच्या चार दिवसांच्या धावत्या भेटीत बघितलेल्या मुख्य ठिकाणांना एक एक करत माझ्या तुटपुंजा शब्दसंपत्तीतून आणि कॅमेर्याच्या डोळ्यातून जेवढे जमेल तसे पहायला पुढच्या भागापासून सुरूवात करूया.
अंगकोर वट वरून पुढे जाता जराशी नाराजी वाटलीच. पण जास्तित जास्त आकर्षणे कमीत कमी वेळात बघण्यासाठी योग्य तोच आराखडा केला आहे ह्या मार्गदर्शकाच्या आश्वासनाने जरा बरे वाटले.
अंगकोर थोम
सर्वात प्रथम आम्ही अंगकोर थोमला भेट दिली. ख्मेर भाषेत अंगकोर थोम म्हणजे महानगर (Great City). बाराव्या शतकाच्या शेवटाला सातव्या जयवर्मनने वसवलेले हे शहर खेर साम्राज्याचे शेवटचे आणि सर्वात जास्त काळ राजधानीचे ठिकाण होते. ह्याचे अवशेष एकूण नऊ चौ किमी क्षेत्रफळावर आहेत. अंगकोर थोम, तिच्या पूर्वीची राजधानी यशोधरापूर आणि तिच्या नंतरच्या राजधान्यां यांची क्षेत्रे एकमेकात मिसळलेली आहेत. त्यामुळे, अंगकोर थोममध्ये सातव्या जयवर्मनने बांधलेल्या इमारतींबरोबर त्याच्या पूर्वजांनी आणि वंशजांनी बांधलेल्या अनेक इमारतीही आहेत. यातील बायोन (Bayon) राजमंदिर सर्वात महत्वाचे मानले गेले असले तरी बाफून (Baphuon) राजमंदिर, फिमिनाकास (Phimeanakas) राजमंदिरासारखी स्थळेही आपले वेगळेपण आणि महत्व राखून आहेत.
अंगकोर थोमच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा (जालावरून साभार)
...
अंगकोरच्या दक्षिण व्दारासमोरील समुद्रमंथन शिल्प
अंगकोर थोमचे दक्षिण व्दार
बायोन राजमंदिर ०१
बायोन राजमंदिर ०२
बायोन राजमंदिर ०३
बायोन राजमंदिर ०४
बायोन राजमंदिर ०५
बायोन राजमंदिर ०६
बायोन राजमंदिर ०७ : नृत्यांगना
ख्मेर भूदल
.
चंपा आणि ख्मेर नौदलाचे युद्ध
.
अंगकोरचा बाजार
(वरची तीन चित्रे जालावरून साभार)
या मंदिरावरचे चेहरे अनेक चित्रपटांत आलेले आहेत. त्यातले काही...
१. Lara Croft: Tomb Raider
२. Patlabor the Movie 2
३. Civilization IV: Beyond the Sword
४. Eternal Darkness: Sanity's Requiem, इ.
तसेच ते काही कादंबर्यांतही आलेले आहेत. त्यातल्या काही...
१. The Judas Strain (James Rollins)
२. The Golden Pagans (Peter Bourne c.1956), इ.
सुरुवात तर छान झाली होती. अंगकोर वटचे चित्र डोळ्यासमोर होतेच. पण आता तेथे जाण्याअगोदर अजून काय काय अनपेक्षित बघायला मिळते आहे याचीही उत्सुकता वाटू लागली होती !
बाफून राजमंदिर
बायोन पासून चालत थोड्याच अंतरावर असलेल्या बाफून राजमंदिराकडे गेलो. हे मंदिर सम्राट उदयादित्यवर्मनने (इ स १०५० - १०६६) अकराव्या शतकाच्या मध्यात बांधले. हे तीन स्तरांच्या पर्वताकारात (पिरॅमिडसारखे) बांधलेले शिवमंदिर आहे. मंदिराला लागूनच राजप्रासाद आहे. ही १२० मीटर X १०० मीटर आकाराची इमारत पारंपारिक बाफून ख्मेर शैलीत बांधलेली आहे. तिची सद्याची उंची ३४ मीटर आहे आणि तिच्या (आता नष्ट झालेल्या) शिखरासकट अंदाजे ५० मीटर ऊंच असावी. ख्मेर दरबारातल्या चीन सम्राटाच्या वकिलाने त्या आता नष्ट झालेल्या कासे (ब्राँझ) वापरून बनवलेल्या चित्ताकर्षक शिखराचे वर्णन लिहून ठेवले आहे. शिखराच्या बुंध्यात दहा खोल्या होत्या, इतका तो मोठा होता. पंधराव्या शतकाच्या शेवटी हे मंदिर बुद्धमंदिरात रुपांतरीत करण्यात आले, पहुडलेल्या बुद्धाची मुर्ती बसविण्याकरिता ते शिखर तोडले असावा असा अंदाज आहे.
बाफून राजमंदिराच्या आवारात ०१
बाफून राजमंदिराच्या आवारात ०२
बाफून मंदिराच्या अर्ध्या उंचीवरून दिसणारे मदिराचे आवार आणि पूर्वे दिशेचे गोपूर
जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०१
जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०२
जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०३
...
वृक्षराजांबरोबर फोटोसंधी
वाचने
13814
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
हाही भाग अप्रतिम
मस्तच ! पु.भा. प्र....
अविश्वसनीय वाटते असते पण फोटो
हा पण भाग मस्त....
अंगकोर मधील डायनोसोर चे शिल्प
In reply to अंगकोर मधील डायनोसोर चे शिल्प by चित्रगुप्त
धन्यवाद !
(No subject)
जबरदस्त......................
काय अफाट आणि अचाट काम आहे.
जबरदस्त!
अप्रतिम... शब्द नाहीत कौतुक
धन्स
आपण आपलाच इतिहास एका वेगळ्या
पु भा प्र
अप्रतिम
धन्यवाद !
अप्रतिम!!!!! अजून फटू हवे
In reply to अप्रतिम!!!!! अजून फटू हवे by बॅटमॅन
धन्यवाद !
या मालिकेतला हा भाग ...
In reply to या मालिकेतला हा भाग ... by सुधीर कांदळकर
धन्यवाद !
इतिहासाला जपण्याच्या सुंदर
क्लास!
धन्यवाद !