मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज तुम याद बेहिसाब आये …

सुज्ञ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खूप प्रकाश आहे … अनेक दिवे झगमगत आहेत …. अशातच एखादी दीपमाळ लक्ष वेधून घेते कारण नसत …. पण काहीतरी सुंदर वाटतं … एखादी सामायोसुचीत हालचाल … कुठलातरी रंग … जेंव्हा सगळंच चवदार वाटायला लागतं तेंव्हा एकच पदार्थ असा असतो कि जो आवडून जातो बेगम अख्तरी बाई अशाच … मी त्यांना प्रत्यक्ष बघितलाय किंवा ऐकलंय असं घडणच शक्य नाही … माझं तेवढं नशिबही बलवत्तर नाही … पण जगजीत सिंग , गुलाम अली साहेब , मेहेंदी हसन खान साहेब या अनेक लोकांच्या प्रकाशमालेतुन हा दिवा चटकन खुलून येतो ….

कैरीची कढी (raw mango curry )

आरोही ·
काल मला बाजारात मस्त कैऱ्या मिळाल्या अजिबात विचार न करता घेतल्या ..कारण हि तसेच आहे मला कैरीपासून बनविलेली एक केरला पद्धतीची कढी खूप आवडते ,अर्थात बनविण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक आहेच ,पण माझ्या पद्धतीने बनविली आहे ...तीच रेसिपी येथे देत आहे ... साहित्य :कैरी १ साधारण तिचे अर्धी वाटी काप व्हायला हवेत अशी ,दही अर्धी वाटी ,ओलं खोबर अर्धी वाटी,हिरव्या मिरच्या ४,कढीपत्ता ६-७ पाने,लाल सुक्या मिरच्या २,पाव चमचा हळद ,पाव चमचा मेथी पावडर ,अर्धा चमचा मोहरी,मीठ चवीनुसार,तेल ३ चमचे,पाणी आवश्यते नुसार कृती : सर्व प्रथम कैरीला सोलून तिचे काप करून घ्या .

सावित्रीच्या लेकी - महिला दिना निमित्त

नेत्रा वैद्य ·
लेखनविषय:
महिला दिना निमित्त हातावर पोट घेऊन जगणार्‍या कष्टकरी महिलांची स्थिती दर्शविणारी एक कविता : सावित्रीच्या लेकी, आम्ही सावीत्रीच्या लेकी घेऊनिया पोट हाती, जगू पा़खरांच्या साठी आम्ही सावित्रीच्या लेकी बालपण गरीबीतूनी, हौस परि शिकण्याची निरागस बालपणी, गाठ लग्नबंधनाची नाही तमा उन्हाची ती, नाही पायी वहाणाही संसाराचा भार माथी, वाटचाल एकटीची कोवळ्या त्या वयातूनी, ल्याली मातॄत्वाची लेणी तिला उमगलं नाही, ते वरदान कि शापचि बासनात पुस्तक पाटी, डाव संसार मांडूनी वणवण पोटासाठी, एक हाती दुजे पोटी जीवा ओढ खोपट्याची, चूल तीन दगडांची खापराचा तवा भांडी, असे तिची ही संपत्ती अठरा विश्वे दारिद्र्याची, भ्रांत

घर खरेदी-विक्री व्यवहाराविषयी मदत हवी आहे

पुण्याचे वटवाघूळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरांनो, शक्यतो मी "मदत हवी आहे" असे लेख लिहित नाही पण माझ्या एका परिचितासाठी मदत हवी आहे. त्याचे झाले असे की त्यांनी एके ठिकाणी विकत घ्यायला एक घर बघितले.ते त्यांना आवडले आणि मागच्या शनीवारी त्यांनी त्यासाठीची टोकन रक्कम घरमालकाला दिली.२०% स्वतःचे पैसे आणि ८०% कर्ज असे नेहमीचे गणित होतेच.त्या २०% साठी त्यांच्या पालकांकडून आणि सासुरवाडीकडून काही पैसे उसने घ्यायचा त्यांचा इरादा होता.

लळा

समान्तर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"ती, सपरा कडची माझी." - बहिरा बापू एका फांदी कडे बोट दाखवत म्हणाला. "हा, अन ती आमच्या घरावरची हाय का, ती माझी"- शिरपा आबा एका फांदीला दाखवत म्हणाला. "पण , आबा ती तर लैच बारीक है, निट न्हाय जळायचा तू?"- बापूने (माझे आजोबा) आबाला विचारलं. "आबा तरी कुठं लय जाड है तवा"- काकू (माझी आजी) आबाच्या काटकुळ्या शरीरावर टोमणा मारीत म्हणाली. हे सगळे आमच्या घराच्या ओसरीवर बसून समोरच्या लींबाच्या फांद्यांची आपसात वाटप करून घ्यायचे. दर उरुसाला हे असेच जमायचे अन त्यांच्या इतक्याच जुन्या असलेल्या त्या लिंबाकडे बघत ह्या असल्या गप्पा रंगवायचे.

पौरुषी...

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
काव्यरस
मुक्त मोहिनी श्यामल नयनी सुंदर साधी पवित्र तू ही तुझ्या उदरीचे पवित्र फल मी बीजानेही तुझाच मी ही कधि भासिशी सुंदर शीला कधि मोहिनी तू मधुशाला तुझ्याच साठी आसुसलेला मी ही येथे रिताच प्याला धाक तुझाही हवा वाटतो पत्नी म्हणूनी माता म्हणूनी प्रेम तुझेही हवे वाटते कधि सखी तू कधी कामिनी धर्माचेही तुटले बंधन संस्कृतिचेही सुटले कोंदण अंगण झाले कधि नभी ते नभही झाले कधी..च अंगण आता आहे पुढेच सारे जिंकायाचे...चाखायाचे स्वातंत्र्याचे मिळता सोने जपून ते हि राखायाचे.

आदिशक्ती....

स्मिता श्रीपाद ·
लेखनविषय:
काव्यरस
गेल्या नवरात्री मद्धे अचानक सुचलेली ही कविता... आज अचानक हाती आली.... माझे आयुष्य घडवणार्या, माझ्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होणार्या स्त्री शक्तीला.... उद्याच्या महिला दिनासाठी माझ्याकडुन....प्रेमपुर्वक..... नऊ नावे नऊ रुपे नऊ तुझे अवतार, संकटहारिणी भवभयतारिणी तुला नमस्कार..!! आईच्या रुपात भासतो प्रेमाचा सागर, माया ममता किती लुटु मी, त्याला अंत ना पार...!! आज्जीचे हे रुप असे जणु समईच्या वाती, उधळुन देइ अमुच्यावरती संस्कारांचे मोती...!! कन्या रुप हे असे भासते जणु भाग्याचा ठेवा, किती लोभस किती गोंडस,पाहिजे तितका लुटावा...!! बहिण लाडकी हक्काची,ठेव जशी बालपणीची, कधी भांडणे कधी प्रेमाने जपून

२०१४ इलेक्शन स्पेशल - चार ओळी

अमोल केळकर ·
लेखनविषय:
लोकसभेच्या निवडणूकीच्या जाहीर झाल्या तारखा काही दिवस तरी कमी होईल नेत्यांची खा.खा..... :) ---------------------------------------- आधी बोलवत होतो तेंव्हा केलीत तुम्ही ना ना तिकडे तिकीट न मिळता इकडे लगेच आलात ना.... :) ---------------------------------------- विकासाची मोजदाद करायला सोळा प्रश्णांची प्रश्णावली. येणारी निवडणूकच सांगेल कुणी कुणाची वाट लावली. दिल्लीहून खास गुरुजी पेपर तपासायला आले गुजरातच्या विद्यार्थांना वाटले नाहीत ते 'आप'ले :) --------------------------------------- अमोल केळकर ७/३/१४ www.poertymazi.blogspot.in

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा आणि मराठी विकिपीडिया संपादनेथॉन

माहितगार ·
नमस्कार , ८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. त्या निमीत्त हार्दीक शुभेच्छा. ज्ञानक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा असे विकिपीडिया ज्ञानकोशाचा कणा असलेल्या विकिमीडिया फाऊंडेशनचे एक महत्वपूर्ण ध्येय आहे. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे.