मुक्त मोहिनी श्यामल नयनी
सुंदर साधी पवित्र तू ही
तुझ्या उदरीचे पवित्र फल मी
बीजानेही तुझाच मी ही
कधि भासिशी सुंदर शीला
कधि मोहिनी तू मधुशाला
तुझ्याच साठी आसुसलेला
मी ही येथे रिताच प्याला
धाक तुझाही हवा वाटतो
पत्नी म्हणूनी माता म्हणूनी
प्रेम तुझेही हवे वाटते
कधि सखी तू कधी कामिनी
धर्माचेही तुटले बंधन
संस्कृतिचेही सुटले कोंदण
अंगण झाले कधि नभी ते
नभही झाले कधी..च अंगण
आता आहे पुढेच सारे
जिंकायाचे...चाखायाचे
स्वातंत्र्याचे मिळता सोने
जपून ते हि राखायाचे.
सांगायाचे इतुके सांगून
मी ही येथे जरा थांबतो
मज बुद्धिने दिली-पौरुषी
कशी वाटते तुला पहातो.
०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०
:) सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. :)
०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6163
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला
सुरेख कविता.
सुंदर कविता !!!
असेच बोलतो.
In reply to सुंदर कविता !!! by धन्या
सुंदर!
खूप सुन्दर!!!
In reply to सुंदर! by पैसा
व्वा आत्मुस! मस्त!
पौरुषी...
म्हणजे "पुरुषापासून झालेली".
In reply to पौरुषी... by आत्मशून्य
@ पौरुषी... म्हणजे नक्की काय
In reply to पौरुषी... by आत्मशून्य
ओके,
In reply to @ पौरुषी... म्हणजे नक्की काय by अत्रुप्त आत्मा
मस्त हो 'अतृप्त'.
मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्
सुंदर रांगोळी आणि तेव्ह्ढीच
भन्नाट आवडली
सर्व वाचक,प्रतिसादकांना
In reply to भन्नाट आवडली by लीलाधर
झक्क्कास.. खुप मस्स्त
In reply to सर्व वाचक,प्रतिसादकांना by अत्रुप्त आत्मा
मस्तं आत्मू , आवडली..
वाह
Too good!!!!!! Sundar sundar
आज पुन्हा वाचली. आज पुन्हा
महिला दिना निमित्त , पुन्हा एकदा !